' तिनं इतरांकडे पाहायला नकोय, तर मग नवरे मंडळींनी "या" गोष्टी करायला हव्यात!

तिनं इतरांकडे पाहायला नकोय, तर मग नवरे मंडळींनी “या” गोष्टी करायला हव्यात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एकेकाळी असे मानले जायचे एक पुरुषच नेहमी स्त्रीचा विश्वासघात करू शकतो. पत्नीची फसवणूक करू शकतो, चूल आणि मूल या चौकटीत अडकलेल्या स्त्रियांवरच याचं खापर फोडलं जायचं.

संस्कृती, रुढी, आईवडिलांची शिकवण यांमुळे पतीशिवाय अन्य पुरुषांचा विचार करायला या स्त्रिया कधीही धजावायच्या नाहीत.

 

husband housework-inmarathi05

 

नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या वाढत्या संख्येने आज पती-पत्नीच्या या नात्याला देखील एका समान पातळीवर आणले आहे. आता पत्नी जर बाहेर जाऊन नोकरी करत असेल, कम असेल तर पती देखील तिची घरकामात मदत करताना दिसतो.

पण हे दृश्य आपल्याला सर्वत्र बघायला मिळत नाही. खूप कमी पुरुष असे आहेत, जे नोकरी करत असलेल्या आपल्या पत्नीची घरकामात मदत करतात.

जे पती त्यांची मदत न करता सर्वकाही त्यांनीच करावे अशी अपेक्षा ठेवतात अशा पुरुषांच्या पत्नी त्यांना धोका देताना, त्यांचा विश्वासघात करताना जराही विचार करत नाहीत.

 

indian helping guy inmarathi

 

हे आम्ही नाही तर एक रिसर्च सांगत आहे. नुकत्याच झालेल्या एका फ्रेंच संशोधनानुसार जर एखादा पती आपल्या पत्नीची घरकामात मदत करत नसेल, तर ती आपल्या पतीला धोका देऊ शकते.

पण हे आपल्या देशात तर शक्यच नाही. कारण पुरुषाने बाहेरचे काम करावे, पैसे कमवावे आणि स्त्रियांनी घरकाम करावे अशीच आपली संस्कृती आहे. ही परिस्थिती आजही काही प्रमाणात अशीच आहे.

आज जरी स्त्रिया घरातून बाहेर पडून नोकरी करत असल्या, तरी पुरुष मात्र अजूनही हव्या त्या प्रमाणात घरकामात सहभागी झालेले भारतात तरी बघायला मिळत नाही.

 

man helping house work domestik work house husband inmarathi

 

फ्रान्समध्ये झालेला हा रिसर्च एका एक्स्ट्रा मॅॅरिटल डेटिंग वेबसाइट ग्लाइडनने स्त्रियांवर केला होता. या रिसर्च दरम्यान स्त्रियांनी सांगितले की, जर त्यांचे पती त्यांना घरकामात म्हणजेच बाथरूम स्वच्छ करणे, वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणे इत्यादी सर्व कामात त्यांची मदत करत नसतील, तर त्या कदाचित त्यांचा विश्वासघात करू शकतात.

या रिसर्च दरम्यान पुरुषांना घरातील साफ-सफाई तसेच भांडी वगैरे घासून स्त्रियांची माने जिंकण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

 

husband housework-inmarathi03

 

फ्रान्समध्ये झालेला हा अभ्यास भारतात कितपत ग्राह्य धरला जाऊ शकतो यावर प्रश्नचिन्ह तर आहेच. भारतातील सामाजिक स्थिती बघता, हा

तरी जर स्त्रियाही नोकरी करत असतील तर प्रत्येक पुरुषाची ही जबाबदारी आहे, की त्याने आपल्या पत्नीची घरकामात मदत करावी, जेणेकरून त्यांना देखील स्वतःसाठी जरा वेळ मिळू शकेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “तिनं इतरांकडे पाहायला नकोय, तर मग नवरे मंडळींनी “या” गोष्टी करायला हव्यात!

  • July 26, 2018 at 12:09 pm
    Permalink

    Agreed Correct

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?