दारू पिणाऱ्यांना यापुढे डॉक्टरांकडे जाताना प्रचंड सावधगिरी बाळगावी लागणार आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

तुम्ही मद्यपान करत असाल तर तुम्ही हा लेख अवश्य वाचला पाहिजे. जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारण केल्यावर तुम्ही किती मद्यसेवन करतात याची संपूर्ण माहिती द्याल. परंतु जर तुम्ही असं करत नसाल तर मात्र तुमच्या साठी एक सावधानतेचा इशारा आहे.

एका नवीन उपकरणाच्या मदतीने तुमच्या रक्त, लघवी आणि केसांचं परिक्षण केल्यावर तुम्ही मागच्या काही दिवसांतच नव्हे तर मागच्या काही आठवड्यात व महिन्यात किती मद्यपान केलं आहे, ते समजू शकणार आहे.

डॉक्टरांनी ही नवीन पद्धतीची टेस्ट मद्यपान संबंधित आजार असणाऱ्या पेशंटच्या परीक्षणासाठी वापरण्याबाबत उत्सुकता दर्शवली आहे. पण याबरोबरच नोकरदार, विमा कंपनी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी यात ऋची दाखवली आहे.

 

man-drinking-inmarathi
indianexpress.com

अनेक हवाई वाहतुक कंपन्यांनी देखील या टेस्टसाठी अर्ज केला आहे. यातून त्यांना त्यांचा कडे कार्यरत असणाऱ्या वैमानिकांची चाचणी करणे शक्य होणार आहे. जेणेकरून विमान चालवताना कुठलाही अपघात टाळता येऊ शकतो .

ही एक चाचणी नसून एक टेस्टचा सेट आहे. ज्यातून व्यक्तीच्या सातत्याने मद्यपान करणाऱ्या व्यक्तीचं चित्र उभं राहतं व त्याने शेवटी कधी मद्यसेवन केलं होतं, तो एक नियमित दारू पिणारा आहे का प्रासंगिक, हे देखील समजते.

ते पूर्ण मद्यपानाचा एक संपूर्ण तपशीलवार रिपोर्टच देते. अशी माहिती या विषयी संशोधन करणाऱ्या संस्थेचे प्रमुख फ्रेडरिक ऊर्स्ट यांनी म्हटले आहे. स्वित्झलँड मधील युनिव्हर्सिटी ऑफ बासेल आणि अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या टेस्टचा निर्मिती प्रक्रियेत सहभागी होत्या.

अल्कोहोल शरीरातून काही कालावधी नंतर नामशेष होते.

या एका पॉईंट नंतर अनेक पद्धती असतात ज्यातून व्यक्ती मद्यपान करत होता की नाही ते समजू शकते.

पण त्या सर्व पद्धती या अप्रत्यक्ष पद्धतीच्या आहेत. जसे लिव्हरमधील एंझाईमची रक्तातील मात्रा तपासणे इत्यादी. परंतु काही विषारी पदार्थ आणि गर्भधारणा यामुळे देखील त्यांची मात्रा कमी होत असते. त्यामुळे या दोन्ही टेस्टची विश्वासार्हता कमी होते.

 

wine-inmarathi
bollywoodfoodclub.files.wordpress.com

मागच्या दशकात काही वैज्ञानिक गट जगभर अल्कोहोलचं विघटीकरण करणाऱ्या युनिक तत्वांचा अभ्यास करत होते. यातील एक इंडिकेटर, इथिल ग्लुकोरोनाईड हे रक्तातील अल्कोहोलची मात्रा जसजसे कमी होते तसतसे साचत जाते असा शोध लावला आहे.

इथिल ग्लुकोरोनाईड आणि अल्कोहोलची शरीरातील कमतरता हँगओव्हरची स्टेट किती आहे हे सांगू शकते.

या इथिल ग्लुकोरोनाईड अर्थात ETG चा शरीरातील मात्रेमुळे एखाद्या अपघातात मेलेली व्यक्ती अथवा एखादा गाडी चालवणाऱ्या चालकाने मद्यपान केले होते की नाही हे समजते. जर त्यांनी काही तासाआधी जरी त्याचं सेवन केलं होतं का नाही हे देखील समजते.

ETG शरीरात दहा दिवस असते यावरून त्या व्यक्तीने दहा दिवसांत मद्यप्राशन केलं अथवा नाही हे समजून येत असतं.

आजून एक टेस्ट यासाठी केली जाते जिचं नाव आहे फॉस्फडीटील इथेनॉल ( PEth) , हि एक माध्यमिक स्तरावरील तपासणी आहे.

 

drawing-blood-inmarathi
verywellmind.com

PEth हे शरीरात तीन आठ्वड्यापर्यंत टिकून राहतं. प्रामुख्याने जो दिवसातून तीन पेक्षा जास्त वेळा बियर पितो. संशोधकांच्या टीम ने याला लिव्हर एंझाइम्स पेक्षा खूप चांगलं इंडिकेटर म्हटलं आहे. यात अपयश फार कमी येत असतं.

या दोन्ही पेक्षा जास्त चांगलं अनुमान लावण्यासाठी डोक्यातील केसांत असलेल्या फॅटी ऍसिड आणि इथिल ईस्टर ( FAEEs ) चा वापर केला जातो. यातून खूप आधी सेवन केलेल्या दारूचे देखील पुरावे भेटत असतात.

FAEEs मद्यपानानंतर शरीराच्या रक्तात १२ ते १८ तासांपर्यंत असतात. नंतर ते डोक्यातील केसांमध्ये स्टोर होत असतात.

नुकत्याच झालेल्या अभ्यासात, संशोधकांच्या टीमने ४० पेक्षा जास्त मद्यपीची चाचणी केली आणि त्यांचा केसातील FAEE ची पातळी दाखवून दिली तसेच यातून कोण जास्त मद्यपान करतो, कोण कमी करतो हे देखील सिद्ध केलं. आता मद्यप्राशन केले असल्याचा पुरावा मिटवण्यासाठी त्यांना केस छाटावे लागतील.

 

srk-wine-inmarathi
hdfinewallpapers.com

जगभरातील इतर शास्त्रज्ञांनी या संशोधनाचं स्वागत केलं आहे. अमेरिकेतील विविध संस्थांच्या प्रमुखांनी या संशोधनाबद्दल गौरावउद्गार काढले आहेत.

लवकरच डोक्यातील केसातून अल्कोहोल टेस्ट केली जाणार आहे. त्यामुळे तळीरामानी एकतर केस कापावे नाहीतर मद्यपान सोडावे हा एकच पर्याय त्यांच्यासमोर उरणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?