' विठुराया! आस्तिक-नास्तिक गरीब-श्रीमंत, सर्व भेदांपलीकडचा सर्वांचा "देव"

विठुराया! आस्तिक-नास्तिक गरीब-श्रीमंत, सर्व भेदांपलीकडचा सर्वांचा “देव”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक: पुष्कर देशमुख

===

“प्रपंचात सुखी रहा पण पांडुरंगाला विसरू नका!”

आई असं नेहमी म्हणते. तिनेही ऐकलेलंच होतं कुठेतरी. पण तरी तिच्या बोलण्यातला विश्वास काही अंशी का होईना “कुठेतरी कुणीतरी आपल्याला वरतून पाहतंय” असा आभास निर्माण करत होता.

मी बघितला नाहीए आणखीन त्याला.

पण फक्त एक काळ्या रंगाची मूर्ती माहितेय मला. ज्याला सगळे “विठ्ठल” म्हणतात.

 

vithoba vitthal inmarathi

 

१४ विद्या ४ वेद ४ उपवेद ६ वेदांग हे २८ योग घेऊन तो युगानयुगे विटेवर अचल उभा आहे. आपलं मागणं, आपली गाऱ्हाणी घेऊन लोक त्याच्या उंबरठ्यावर जातात. तो बिचारा आधीच विटेवर उभा आहे आणि त्यात ही असली अपेक्षा घेऊन येणारी लाखो लोक! पण तरी तो अगदी निश्चिंत असतो. ना आश्वासन देतो ना अपेक्षा भंग करतो.

पण जे देतो ते असतं आंतरिक सुख! एक निरागस हसु उमटतं…

लहान बाळापासून ते कणा मोडलेल्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरसुध्दा

फक्त “विठ्ठल विठ्ठल” म्हटलं की…!

कधी प्राक्तनांचे पुरावे नाहीत आणि कधी भविष्याचे देखावे नाहीत. अगदी सारं काही विसरून उभा “माणूसरूपी” धर्म “वारकरी” नावाच्या छाटीखाली जमतो “आषाढी एकादशीला”. आणि त्या चंद्रभागेत स्नान करून “पुण्य मिळालं” म्हणत निघतो परतीच्या वाटेने.

आता खरंच पुण्य मिळतं का, तेही त्यालाच ठाऊक.

विठ्ठलावर लिहीताना मी आस्तिक आहे की नास्तिक हा प्रश्न मला आजतागायत पडला नाही. कारण अध्यात्माच्या पलीकडे जाऊन जाती धर्म झुगारुन वर्ण वंश पैसा ह्या सगळ्याना तिलांजलि देऊन “एक माणूस रूपी अभंग रचलाय” त्या पांडुरंगाने. ज्याला आपण “वारकरी” म्हणतो.

 

warkari inmarathi

हे ही वाचा – विठ्ठलाचे वारकरी विरुद्ध शिवप्रतिष्ठान चे धारकरी? – सत्य काय आहे हे वाचा

संस्कृती ने नटलेल्या माझ्या महाराष्ट्रात जातीपातीचा विसर पडून सगळे एकमेकांना माणूस म्हणून वंदन करतात. असा हा वारकरी सम्प्रदाय त्या विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातो…!

कधीकधी प्रचंड हेवा वाटतो मला त्याचा, कीअसलं काय रसायन आहे हा विठ्ठल! जिथे जात ही लोप पावते आणि धर्म ही विरघळून जातो… अन प्रत्येक पावलागणिक माणूस एकमेकांजवळ येऊ लागतो…!

आभाळाकडे डोळे लावून पाहणारा माझा शेतकरी त्याच आशेने त्या चंद्रभागेच्या तीरावर बसलेल्या विठोबा रखुमाईच्या मुर्तिकडे पाहतो. तेव्हा त्यांच्या डोळ्यांतलं दुःख एका क्षणात पळवून नेतो हा! जणू काही तुझं पुढलं वर्ष भरभराटीचं असेल अशी पोचपावती देतो हा त्यांना.

ना उनपावसाची तमा ना उद्याची भ्रांत. सगळं काही घराच्या चार भिंतीत सोडून हा वारकरी मैलौनमैल माती तुडवत आषाढीला निघतो. त्याच्या विठूरायाच्या चरणी नतमस्तक व्हायला.

तसा तो अनेकांना मुखदर्शनाने परत पाठवतो…पण त्यासाठी त्याच्यावर कुणी रूसल्याच ऐकला नाही मी कधी…!

कधी राजा पांडुरंग तर् कधी वेडा कुम्भार. कधी कधी तर नाथाच्या घरी नाचणारा सखा म्हणून हा नेहमीच भावून जातो. अशा अगणित उपमांचा धनी असलेला माझा विठ्ठल, त्याच्यावर लिहिलेल्या प्रत्येक अभंगाची खोली प्रत्येक वारकर्याला भान विसरून नाचायला भाग पाडते.

टाळमृदंगाच्या गजरात सगळी मराठीमाती त्याच्या गजरात हरवून जाते.

तसा हा विठोबा कधी वादात पडत नाही. कारण त्याला एकच धर्म माहितेय “माणूस”…!

त्यामु़ळेच की काय तो बाकी देवांपेक्षा वेगळा भासतो. आणि तो तसाच रहावा ही त्याच्याच चरणी प्रार्थना पण करावीशी वाटत रहाते!

एक वेगळीच अनुभूती आहे हा “काळा विठ्ठल”

कुणाचा सखा
कुणाचा वाली
तर…
उभ्या जगाची माऊली…!

उभ्या माणुसकीचं सुखदुःख, कमरेवर हात ठेवून पाठीराखे म्हणून, त्या दोघांनी झेलावी आणि माझ्या महाराष्ट्राला एकसंध आणी सुखी ठेवावा हीच खरी आषाढी.

ह्या एकादशीला पुन्हा त्या खऱ्या धर्माला, आणि ज्याचं “तीर्थ विठ्ठल आहे आणि क्षेत्र देखील विठ्ठल आहे”, अश्या प्रत्येक वारकऱ्याला एकादशीच्या शुभेच्छा…!

विठ्ठल…विठ्ठल…विठ्ठल…!

 

vitthal rukmini pandharpur inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?