'अगदी ५ मिनिटांमध्ये डूप्लीकेट चावी बनवण्याची ही अजब ट्रिक नक्की ट्राय करा

अगदी ५ मिनिटांमध्ये डूप्लीकेट चावी बनवण्याची ही अजब ट्रिक नक्की ट्राय करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

 

unsplush

 

तुम्ही घराबाहेर पडलात आणि खिशात घराची चावी नाही असा अनुभव तुम्हाला कधी आला आहे?

अनेकदा गडबडीत घरातून बाहेर पडताना चावी नेण्याचा विसर पडतो. दिवसभराच्या कामाने थकून घरी आल्यानंतर दाराबाहेर ताटकळत उभं राहण्याची वेळ कधी तुमच्यावर आली आहे का?

याचंं उत्तर हो असेल, तर तुमच्या समस्यांच उत्तर मिळालं अस समजा.

कारण खिशात चावी नसेल, तर कंटाळलेल्या अवस्थेत धावतपळत चावीवाला गाठण्याची धडपड करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं चावी तयार केलीत तर?

काय, विश्वास बसत नाहीये? मग, हा लेख तुम्हाला नक्कीच दिलासा देणारा ठरेल.

 

entrepreneurial-idea

 

ओरिजिनल चावीची एकतरी डूप्लीकेट चावी असणे केव्हाही चांगलं!

डुप्लिकेट चावी तयार करण्याचा पर्याय असला, तरी अनेकदा आपल्या गरजेच्या वेळीच नेमका चावी तयार करणारी व्यक्ती नसल्याने होणारी डोकेदुखी वेगळीच असते.

त्यामुळे इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही स्वतः ही चावी कशी तयार करु शकता हे शिकणं तुमच्यासाठीही नक्कीच महत्वाचं आहे.

परंतु यापुढे असं होणार नाही, कारण यापुढे कधी डूप्लीकेट चावी बनवण्याची गरज भासली तर आम्ही सांगतोय ती ट्रिक वापरा.

यामुळे स्वत: काहीतरी हटके केल्याचं समाधान लाभेल आणि चावीवाल्याकडे जाण्याचे कष्ट वाचतील सोबतच पैसे देखील वाचतील ते वेगळेच !

एकदम सोप्पी ट्रिक आहे,

तुमचं घर असो, ऑफिस असो वा बाईक… तुम्हाला हव्या त्या ठिकाणाची चावी तुम्हाला घरच्या घरी तयार करता येणार आहे.

 

youtube

 

सगळ्यात पहिलं या गोष्टी जमा करा- ओरिजिनल चावी, लाईटर, टेप आणि टीन डब्ब्याचे झाकण किंवा पातळ पत्र्याचा तुकडा.

हे सगळ साहित्य जमा केलं की पुढे तुम्ही वेगळा प्रयोग करायला सज्ज झालात असं समजा!

पहिलं काय करायचं की ओरिजिनल चावीला लाईटरच्यावर किंवा आगीवर पकडून तोपर्यंत गरम होऊ द्यायचं जोवर चावी तापून लाल होत नाही.

duplicate-key-marathipizza01

स्रोत

त्यानंतर ती चावी टेपवर ठेवायची. चावी गरम असल्याने चवीच्या आकाराचा छाप त्या टेपवर उमटेल.

मात्र यावेळी चावीचा योग्य आकार उमटतो आहे की नाही याकडे तुमचं बारकाईनं लक्ष असणं गरजेचं आहे. कारण समजा आकार उमटण्यास थोडी जरी चुक झाली तर तुमच्या ऑरिजनल चावीची प्रतिकृती तयार होणार नाही.

मात्र चावीचा हा आकार उमटविणं फारसं कठीण नाही, त्यामुळे टेन्शन न घेता, अत्यंत सावकाशपणे ही प्रतिकृती उमटवा.

 

duplicate-key-marathipizza02

स्रोत

हा छाप टीनच्या झाकणावर किंवा पत्र्याच्या पातळ तुकड्यावर ठेवून योग्य त्या आकारात कापावा.

आकार कापतानाही हात स्थिर असणं गरजेचं आहे, कारण इथेही आकारात बारीकसाही फरक पडता कामा नये, अन्यथा तुमचे हे सगळे प्रयत्न वाया जातील.

 

duplicate-key-marathipizza03

स्रोत

 

आता तुम्ही प्रयोगाच्या शेवटच्या टप्प्यात आला आहात.

डुप्लिकेट चावीचा आकार तयार होताना त्याकडे नीट लक्ष द्या.

स्रो

बस्स! कापून झाल्यावर चावीच्या आकाराची जी वस्तू तुमच्या हाती येईल, ती म्हणजे तुमची डूप्लीकेट चावी !

 

duplicate-key-marathipizza05

स्रोत

आहे की नाही मस्त शक्कल ! जर घरी दुसरी डूप्लीकेट चावी नसेल तर पटकन कामाला लागा !

पण तुमच्याकडे जर, नव्या पद्धतीच्या डिजीटल किज् वापरत असाल, तर मात्र तुम्हाला ही क्लुप्ती वापरता येणार नाही.

सध्या नव्याने विकत घेतली जाणारी घरं, नव्या गाड्या यांना डिजीटल चाव्या देण्यावर भर दिला जातो. सुरक्षेच्या कारणांसाठी या डिजीटल चाव्या दिल्या जातात.

त्याने तुमचं घर, गाड्या यांची सुरक्षितता नक्कीच वाढते, मात्र डिजीटल चावी हरवली, तर मात्र संबंधित कंपनीकडे त्याची मागणी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.

जुन्या पद्धतीच्या चाव्यांची सुरक्षितता जेमतेम असते. मात्र ही चावी हरविली, तुटली तरी घराजवळच्या चावी तयार करणा-या व्यक्तीकडून काही वेळात दुसरी चावी तयार करता येते, किंवा आताच सांगितलेल्या प्रकारानुसार घरच्या घरीही ही चावी तयार होते.

पण ही आयडिया केवळ तुमच्या गरजेसाठीच वापरा.

कारण चोरीच्या उद्देशानेही डुप्लिकेट चावी तयार केली जाते. मात्र अशा कारणांसाठी चावी तयार करणं हा कायद्याने गुन्हा आहे. असं करणाच्यांना कठोर शिक्षाही होवु शकते.

 

ipa

 

त्यामुळे तुम्हाला सांगितलेली डुप्लिकेट चावीची आयडिया केवळ तुम्ही अडचणीत असताना, किंवा गरजेपोटीच वापरा,

इतरांना त्रास देण्यासाठी अन्यथा चोरीसारख्या कोणत्याही कारणांसाठी अशा प्रयोगांचा वापर न करणं हे अधिक शहाणपणाचं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?