'पावसाळ्यात रस्ते खराब होण्यामागचं खरं कारण हे आहे...

पावसाळ्यात रस्ते खराब होण्यामागचं खरं कारण हे आहे…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

भारतात प्रत्येक पावसाळ्यानंतर रस्ते प्रचंड खराब झालेले असतात. शासन पुन्हा हे रस्ते दुरुस्त करून घेते तरीही नंतर येणाऱ्या पावसाळ्यात पुन्हा रस्ते खराब होतच राहतात. याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना शासन का करत नाही हा सर्वसामान्य माणसांना नेहमी प्रश्न पडत राहतो.
खराब मेंटेनन्स हे याचं कारण आहेच.

जे रस्ते शासन बांधतं त्यासाठी टेंडर मागवले जातात. ज्या contractor ला टेंडर मिळतं तो रस्ता बांधताना एक तर खराब मटेरियल वापरतो किंवा जरी मटेरियल चांगलं वापरलं तरी नंतर त्याची काळजी घेत नाही.

भारतातील रस्ते अॅस्फॉल्ट या खडकापासून बनवले जातात. रस्ता बनवताना त्याचे ५ थर पडतात.

 

Road-Paver-Market-inmarathi
newsprintuk.com

पहिला थर असतो बेस लाईनचा ज्याच्यामध्ये ग्राउंड लेयर येतो. हा व्यवस्थित घालणे महत्वाचे असते कारण हा रस्त्यांचा पाया असतो. त्यांच्यानंतर येतो सब ग्रेड लेयर. याच्यामध्ये खडी वापरली जाते. आणि त्याच्यावरून रोलर फिरवून पूर्णपणे त्याला पूर्ण बंदिस्त केले जाते. त्याच्यानंतर तिसरा थर येतो त्याला सब बेस कोर्स म्हणतात.

त्याच्यातही खडीच टाकतात पण त्याचा आकार दुसऱ्या थरात वापरलेल्या खडी पेक्षा लहान असतो. यावर ही पुन्हा रोलर फिरवून थर एकजीव समान केला जातो.

त्याच्यानंतर चौथा येतो बेस कोर्स यात पहिल्या तीन थरापेक्षा बारीक खडी वापरली जाते पाचवा थराला रस्त्यावर डांबर ओतले जाते.

आता जेव्हा हे पाच थर एकावर एक बनवले जातात त्यावेळी प्रत्येक थर एकसमान एकसलग बनणे आवश्यक असते. त्यासाठी काम करणाऱ्या माणसाचा अनुभव आणि कौशल्य महत्वाचे ठरते. यामध्ये कुठल्याही थरामध्ये भेगा राहिल्या तर रस्ते खडबडीत होतात किंवा लवकर खराब होतात.

 

asphalt-paving-inmarathi
xeniaword.com

याशिवाय अॅस्फॉल्ट खडकाचा मोठा शत्रू म्हणजे पाउस. सतत कोसळणारा पावूस हा रस्त्याच्या पहिल्या थरातून झिरपून आता शिरला की शेवट बेसलाईन पर्यंत कुठे कुठे अडकून पाणी साठत राहते. जर अॅस्फॉल्ट पूर्णपणे बंदिस्त केले नसेल तर त्यात पाणी झिरपत राहून त्याचे विघटन व्हायला सुरुवात होते. आणि रस्त्याला खड्डे पडतात.

खड्डे पडायला फक्त पाणी हा एकच घटक कारणीभूत नाही. आपल्याकडचे हवामान तीन ऋतू मध्ये बदलते. उन्हाळ्यात प्रसंग उष्णता असते, हिवाळ्यात थंडी आणि पावसाळ्यात पाउस.

त्यामुळे रस्त्याला जे काही मटेरियल वापरलेले असते त्याचे उष्णता, थंडी अथवा पाणी यामुळे विघटन होत राहते त्यासाठी रस्त्यांची व्यवस्थित काळजी घेवून त्याची पुर्नबांधणी करणारी व्यवस्था आपल्या कडे आपण विकसित केलेली नाही.

शिवाय भर पावसात जर खड्डे दुरुस्त करायचे ठरवले तरी त्यावर पुन्हा अॅस्फॉल्ट चा थर टाकून ते पटकन बुजवता येतात पण हे काही काळासाठी उपयोगी येणारी व्यवस्था आहे. त्यामुळे रस्ता पुन्हा उकरून त्यातील दोष पाहून ते पुन्हा नवीन बांधणे हाच पर्याय राहतो.
रस्त्यांना खड्डे पडण्याचे मुख्य कारण म्हणजे रस्त्यांवरून वाहनांची ये जा चालू राहणे, अवजड वाहने कमी क्षमतेच्या रस्त्यावरून नेणे हे देखील आहे.

 

highway-inmarathi
youtube.com

आपल्याकडे सर्व प्रकारची वाहने एकाच रस्त्यावरून जातात. पूल प्रकार किंवा ६ पदरी रस्ते आपल्याकडे नाहीत ज्याच्यामध्ये एका लेन मधून फक्त दुचाकी, एका लेन मधून तीन चाकी, एका लेन मधून चार चाकी अशा गाड्या आपल्याकडे धावत नाहीत. अवजड वाहनांसाठी वेगळी लेन, वेगळा रस्ता कुठल्याही शहरात वेगळा बांधला जात नाही.

सर्व प्रकारची वाहने एकाच रस्त्यावरून धावतात. इतकेच काय पुलावरून देखील धावतात. त्यामुळे रस्त्याची क्षमता न पाहता त्यावर सतत चालू असणारी वाहनांची वर्दळ सुद्धा रस्त्यांचे आयुष्य कमी करते.

सध्या नवीन पॅव्हमेंट पद्धतीने रस्ते बांधताना त्याचे आयुष्य कसे वाढेल तसेच आतल्या थरांमध्ये पाणी कसे साठून राहणार नाही याची काळजी घेतली जाते. याबरोबरच अॅस्फॉल्ट चे थर एकावर एक टाकून त्याची मजबूत बांधणी करणे, त्याला घट्ट करणे हा एकाच उपाय रस्त्यांचे आयुष्य वाढवू शकतो जो शासनाने रस्ते बांधताना उपयोगात आणायला हवा.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?