' आता केवळ ३० मिनिटांत होणार कॅन्सरचे निदान !

आता केवळ ३० मिनिटांत होणार कॅन्सरचे निदान !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

कॅन्सर हा रोग तसा भयानक ! अजूनही या रोगावर म्हणावी तशी ठोस आणि प्रभावी उपचारपद्धती उपलब्ध नाही. याच कॅन्सर रोगाचे निदान वेळेवर झाले तर मात्र योग्य उपचारपद्धती करून त्यापासून मुक्ती मिळवता येऊ शकते. यासाठी जगभरात अनेक शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत. भारतामध्ये देखील कोचीच्या शास्त्रज्ञांचे या विषयावर संशोधन सुरु होते आणि त्यात त्यांना यश देखील मिळाले आहे. त्यांनी असा शोध लावला आहे की ज्या माध्यमातून अवघ्या ३० मिनिटांमध्ये एखाद्या व्यक्तीला कॅन्सर आहे किंवा नाही त्याचे निदान करता येते.

cancer-invention-kochi-marathipizza01

स्रोत

चार वर्षांपूर्वी शांताकुमार व्ही. नायर आणि मंजूर कोयाकुट्टी हे कोची मधील अमृता युनिव्हर्सिटीचे नॅनो मेडिसिन सेंटरचे शास्त्रज्ञ अन्नपदार्थांमध्ये असणाऱ्या दुषित घटकांचा शोध लावण्यासाठी लेजरचा उपयोग करत होते. यावर संशोधन करताना त्यांनी अन्नपदार्थांमधील दुषित घटक लेजरच्या माध्यमातून शोधता येऊ शकतात असा निष्कर्ष काढला. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की मानवी शरीरामधील दुषित पेशी शोधण्यासाठी लेजरची मदत होऊ शकते का? विशेषकरून कॅन्सर पेशी शोधण्यासाठी हे माध्यम उपयुक्त ठरू शकते का?

या गोष्टीवर दोघा शास्त्रज्ञांनी भरपूर मेहनत घेतली. आणि लेजरवर आधरित एक असे उपकरण बनवले ज्याच्या सहाय्याने अवघ्या ३० मिनिटांत व्यक्तीला कॅन्सर आहे किंवा नाही त्याचे निदान केले जाऊ शकते. अजूनही या उपकरणामध्ये सुधारणा करण्याचे काम सुरु असून, दोन वर्षांनी हे उपकरण वैद्यकीय क्षेत्रात सादर केले जाईल.

cancer-invention-kochi-marathipizza02

स्रोत

या कॅन्सर डिक्टेशन पद्धतीमध्ये लेजर आणि नॅनो सबस्ट्रॅकचा वापर करण्यात येईल. ज्याच्या सहाय्याने कॅन्सर पेशींचा तपास करणे सोपे होईल. अर्थात लेजरच्या माध्यमातून कॅन्सर पेशींचा शोध लावण्याची पद्धती काही नवीन नाही, परंतु त्या माध्यमातून मिळणारे निष्कर्ष अतिशय कमकुवत असतात, तसेच त्यांचे विश्लेषण करणे देखील कठीण होऊन बसते. परंतु नॅनो सबस्ट्रॅमुळे मिळणारे निष्कर्ष हे अचूक असतात. ज्यामुळे निदान देखील अचूक करता येईल.

संशोधनासाठी आणि हे उपकरण निर्माण करण्यासाठी अमृता युनिव्हर्सिटीकडून ६० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. जेव्हा हे उपकरण तयार होईल तेव्हा याची किंमत जवळपास १० लाख इतकी असेल.

cancer-invention-kochi-marathipizza03

स्रोत

जर हे संशोधन पूर्णत्वास गेलं तर भारतीय शास्त्रज्ञांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये लावलेला हा सर्वात मोठा शोध ठरू शकतो !

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?