' हनुमानाचा “द्वेष” करणाऱ्या या गावात लाल रंगाचा झेंडा लावणेही अमान्य आहे! कारण वाचा.. – InMarathi

हनुमानाचा “द्वेष” करणाऱ्या या गावात लाल रंगाचा झेंडा लावणेही अमान्य आहे! कारण वाचा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हनुमान ह्यांना भगवान राम ह्यांचे सर्वात मोठे भक्त मानले जाते. तसेच हनुमान ह्यांचे देखील अनेक भक्त भारतातच नाही तर जगभरात आढळतात. कुठलीही समस्या संकट सामोरे आले की आपण संकट मोचन हनुमान ह्यांचीच आठवण काढतो.

पण आपल्याच भारतात एक असे गाव देखील आहे, जिथे आपल्या बजरंगबलीची पूजा-अर्चा करणे तर दूरच राहिलं त्यांचं नावही घेणे वर्ज्य आहे. तसेच ह्या गावात लाल रंगाचा झेंडा लावणे देखील अमान्य आहे.

 

dronagiri-inmarathi

 

हनुमान ह्यांच्या बाबतच्या ह्या गावकऱ्यांच्या द्वेषाचा संबध हा रामायणाशी आहे.

पण येथे का असं केलं जातं? का येथील लोकांच्या मनात हनुमानाबाबत एवढा राग आहे? का येथे लाल रंगाचा झेंडा लावला जात नाही? आज हेच सर्व आपण जाणून घेणार आहोत.

 

dronagiri-inmarathi02

 

उत्तराखंड येथील जोशीमठ प्रखंड येथील जोशीमठ नीति मार्गावर द्रोणागिरी नावाचं एक गाव आहे. हेच आहे ते गाव ज्यांचा हनुमान ह्यांच्यावर द्वेष आहे. रामायण काळात हनुमान येथे आले होते. तेव्हा असं काही झालं होत ज्यामुळे हे गावकरी हनुमान ह्यांच्यावर रागावले आहेत आणि त्या घटनेनंतर ह्या गावकऱ्यांनी त्यांची पूजा करणे बंद केले.

 

dronagiri-inmarathi01

 

रामायण काळात राम-रावण युद्धा दरम्यान जेव्हा लक्ष्मण मेघनाथच्या बाणाने बेशुद्ध झाले होते तेव्हा हनुमान ह्यांना संजीवनी बुटी आणण्याचे आदेश राम ह्यांनी दिले होते.

द्रोणागिरी गावातील लोकांच्या मते हनुमान संजीवनी बुटीसाठी जो पर्वत उचलून घेऊन गेले होते तो पर्वत ह्याच गावात होता.

ज्या पर्वतावर संजीवनी बुटी होती येथील लोक त्या पर्वताची पूजा करायचे. ह्या गावात अशी मान्यता आहे की, ज्यावेळी हनुमान ही संजीवनी बुटी घ्यायला आले होते तेव्हा पर्वत देवता साधना करत होते.

 

dronagiri-inmarathi05

 

अश्या परिस्थितीत हनुमान ह्यांना त्यांची साधना पूर्ण होण्याची वाट बघयला हवी होती. पण त्यांनी असं न करता त्यांनी पर्वत देवेतेची परवानगी न घेता पर्वताचा एक भाग स्वतःसोबत घेऊन गेले. ह्याप्रकारे हनुमान ह्यांनी पर्वत देवतेची साधना भंग केली.

गावकऱ्यांच्या मते हनुमान पर्वताचा जो भाग उचलून आपल्यासोबत घेऊन गेले, तो पर्वत देवतेचा उजवा हात होता.

 

dronagiri-inmarathi03

 

ह्या गावात अशी मान्यता आहे की, पर्वत देवतेचा एक हात नसल्याने ते आजही त्याचे कष्ट भोगत आहेत. तसेच त्यांच्या उजव्या हातातून आजही रक्त निघत असतं अशी त्यांची मान्यता आहे.

ह्याच घटनेमुळे येथील लोक हनुमान ह्यांच्यावर रागावलेले आहेत. एवढं की येथे त्याचं नावही घेतले जात नाही. तसेच येथे लाल रंगाचे झेंडे लावण्यास देखील मनाई आहे. कारण लाल रंग हा हनुमान ह्याचं प्रतिक मानले जाते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?