' हे जगभर प्रिय असे आंतरराष्ट्रीय खेळ भारताने जगाला दिलेत आणि आपल्याला त्याची कल्पनाही नाही

हे जगभर प्रिय असे आंतरराष्ट्रीय खेळ भारताने जगाला दिलेत आणि आपल्याला त्याची कल्पनाही नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपल्या देशात जेव्हा खेळाबाबत बोलले जाते तेव्हा केवळ आणि केवळ क्रिकेटचीच चर्चा होत असते. आजही अनेक लोकांना क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकी ह्याशिवाय आणखी कुठल्याही खेळाची हवी तेवढी माहिती नाही. (हॉकी केवळ ह्यासाठी कारण तो आपला राष्ट्रीय खेळ मानला जातो.)

काही खेळांचे तर कदाचित नावही त्यांनी कधी ऐकलेले नसते. मग ते खेळ आपले स्वतःचेच असले तरी.

भारतात क्रिकेट हा केवळ एक खेळ नाही तर धर्म बनला आहे, लोक ह्या क्रिकेट खेळाडूंना अक्षरशः डोक्यावर घेतात ज्यात काहीही गैर नाही.

पण ह्याच्या तुलनेत अनेक असे खेळ आहेत जे नेहेमी पडद्याआडच असतात. आज ज्या खेळांची आपल्याला नावेही माहित नाहीत अशी काही आंतरराष्ट्रीय खेळ भारताने जगाला दिले आहेत.

बुद्धिबळ :

 

Chess-inmarathi
8subjects.com

बुद्धिबळ ह्या खेळाचा जन्म देखील भारतात झाला आहे. बुद्धिबळ हा खेळ जवळपास १५०० वर्ष जुना आहे. तेव्हा ह्याला चतुरंग ह्या नावाने ओळखल्या जायचे, ज्याचा अर्थ सेनेचे चार भाग असा होतो. हा खेळ सहाच्या शतकात गुप्त साम्राज्या दरम्यान अतिशय लोकप्रिय झाला. एवढचं नाही तर सिंधू घाटीच्या सभ्यते दरम्यान देखील ह्या खेळाचे पुरावे आढळतात. आधुनिक बुद्धिबळ ही देखील भारताचीच देण आहे.

पोलो :

 

polo-inmarathi
thegentlemansjournal.com

पोलो ज्याला श्रीमंतांचा खेळ मानल्या जाते हा खेळ देखील भारतानेच जगाला दिला आहे. हा खेळ राजा-महाराजांचा खेळ म्हणून ओळखला जायचा. हा खेळ घोडेस्वारी करताना खेळला जातो. ह्यात दोन्ही टीम्समध्ये चार-चार खेळाडू असतात. आणि दोन गोल पोस्ट असतात. एका लांब लवचिक उधळपट्टीवरून लाकडी चेंडूला गोलपोस्ट पर्यंत पोहोचवावे लागते.

ह्या खेळाचा जन्म हा मणिपूर राज्यात झाला होता. १८५९ साली ब्रिटीश सेना अधिकारी आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या लोकांच्या मदतीने पोलो क्लबची स्थापना करण्यात आली होती.

त्यावेळी लेफ्टनंट जॉय शेरेर ह्यांनी येथील लोकांना हा खेळ खेळताना बघितले होते आणि त्यांनी विचार केला की इंग्रजांना देखील हा खेळ शिकायला हवा. सध्या पोलो हा संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला हे. एवढचं नाही १९००-१९३९ पर्यंत पोलो हा ऑलिम्पिक खेळांत देखील सामील होता.

कॅरम :

 

corrom-inmarathi
tutorialspoint.com

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत प्रत्येकाच्या घरी दुपारी काही मंडळी जमायची आणि सर्वे मिळून ह्या कॅरमची मजा लुटायचे. त्यात मग राणी कोण घेऊन जाणार ह्याकडे सर्वांच लक्ष लागलेलं असायचं. जवळपास सर्वच घरात कॅरम बोर्ड हा आवर्जून असतो आणि तेवढ्याच आवडीने मुले तो खेळसाली तातही.

कॅरम हा खेळ देखील भारतानेच जगाला दिला. ह्या खेळाची सुरवात भारतातून झाली.

१९५८ भारताने कॅरम क्लब्सचे आधिकारिक संघ बनविले जे कॅरम स्पर्धांना स्पॉन्सर करू लागले. १९८८ मध्ये इंटरनॅशनल कॅरम फेडरेशन चेन्नईत आले आणि त्यानंतर हा खेळ युरोप तसेच अमेरिकेत देखील खेळला जाऊ लागला.

कबड्डी :

 

kabaddi-inmarathi
india.com

कबड्डी हा खेळ शाळेत असताना सर्वांनीच खेळला असेल, आज तर ह्या खेळाने एक अंतरराष्ट्रीय ओळख निर्माण केली आहे. ह्या खेळाला १९३६ सालच्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये प्रसिद्धी मिळाली. कबड्डी हा बांग्लादेशचा राष्ट्रीय खेळ आहे. तर आपल्या देशातील कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, तामिळनाडु,

महाराष्ट्र, पंजाब आणि तेलंगाणा ह्या राज्यांचा देखील हा प्रमुख खेळ आहे.

ह्या खेळाचे नियम कायदे बनविण्यासाठी १९५० साली ऑल इंडिया कबड्डी फेडरेशन उभारण्यात आले. जपान ने १९७९ सालापासून कबड्डी खेळण्यास सुरवात केली. तर पहिली आशियायी कबड्डी चॅम्पियनशिप १९८० साली झाली, ज्यात भारत विजयी ठरला होता.

बॅडमिंटन :

ह्या खेळाची सुरवात ब्रिटीशांच्या काळात झाली. त्यावेळी इंग्रजांनी पुण्याच्या गैरीसन शहरात खेळले गेले. ह्या खेळाला पुणा किंवा पुणाह ह्या नावाने देखील ओळखले जायचे. सर्वात आधी १८७३ साली ह्या खेळाचे नियम देखील पुण्यातच तयार करण्यात आले होते.

badminton-inmarathi
newsasia.com

कालांतराने  हा खेळ जगभरात प्रसिद्ध झाला. ह्या खेळाने भारताला सायना नेहवाल, प्रकाश पादुकोण, अपर्णा पोपट, पुलेला गोपीचंद, पीव्ही सिंधू सारखे खेळाडू दिले ज्यांनी जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?