' पावसाळ्यात तब्येतीची काळजी घेण्यासाठी ही ५ पेय नक्की आहारात घ्या!! – InMarathi

पावसाळ्यात तब्येतीची काळजी घेण्यासाठी ही ५ पेय नक्की आहारात घ्या!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

नेमेचि येतो मग पावसाळा’ या म्हणीप्रमाणे वाट बघत असलेल्या पावसाची चांगलीच सुरुवात झाली आहे. पावसाळा म्हणजे मस्ती, धमाल… पावसाळा म्हणजे गरमागरम भजी.. पावसाळा म्हणजे धबधबे… पावसाळा म्हणजे गारवा.. पण अशा सुखद, मस्तीने भरलेल्या वातावरणात तुमचं थोडंसं दुर्लक्ष सुद्धा तुम्हाला महागात पडू शकतं आणि आजारी पाडू शकतं.

पाऊस सुखद असतो, पण त्याच्याबरोबर हातात हात घालून येणारे त्याचे साथीदार मात्र त्रासदायक ठरतात. पावसासोबत रोगराई येत असल्यानं नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यात अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. तर काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळाव्या लागणार आहेत.

 

rainy season precaution inmarathi1

 

संसर्गजन्य ताप, सर्दी-खोकला, मुंबईत चोरपावलांनी येणारा स्वाइन फ्लू इ. इ. व्हायरल फिवर अर्थात संसर्गजन्य ताप हे ऐकायला सोपे वाटत असले तरी त्यानी एकदा का आपल्या शरीरात ठाण मांडले की त्या रोगांवर मात करणे खूप त्रासदायक असते. आधीच कोरोनाचा संसर्ग पसरत आहेच, या पावसाळ्यात तुम्ही जर फ्लू आणि सर्दीने त्रस्त असत असाल तर पुढील घरगुती पेयांच्या मदतीने तुम्ही आपल्या फ्लू वर इलाज करू शकता.

१. पाणी :

पाणी फक्त तुम्हाला हायड्रेडच ठेवत नाही तर तुमच्या शरीरातील सर्व विषारी द्रव्ये म्हणजेच टॉक्झिन्स सुद्धा बाहेर फेकतं. जा तुम्ही अधिक प्रमाणात पाणी पीत नसाल तर तुम्ही पाण्यात शुगर फ्री फ्लेवर सुद्धा add करू शकता. पावसाळ्यात शक्यतो गरम अथवा कोमट पाणी प्या, कारण बरेच आजार हे दूषित पाण्याने होतात.

 

hot water inmarathi

 

२. बर्फाचा गोळा :

ऐकायला जरा विचित्र वाटेल पण हे खरं आहे. बर्फाचा गोळा खाऊन तुम्ही स्वतःला फ्लू होण्यापासून वाचवू शकता. अमेरिकेत ही पद्धत खूप प्रसिद्ध आहे. व्हिटॅमिनची कमतरता आणि शरीर डी-हायड्रेट होण्यापासून वाचविण्यासाठी तुम्ही १००% फळांच्या रसापासून बनलेल्या बर्फाचा गोळा खाऊ शकता.

 

ice gola inmarathi

 

३. आलं घातलेला चहा :

आलं घातलेल्या चहाला सुपर फूड मानलं जातं. सर्दी, पडसे झालेल्या लोकांसाठी असा चहा हा रामबाण उपाय आहे. कित्येक लोक पचनासंबंधी तक्रारी असल्या तरी आलं घालून केलेल्या चहाचे सेवन करतात. आलं तुम्हाला फ्लू दरम्यान जाणवणाऱ्या डोकेदुखी पासून आराम मिळवून देतं.

.

immunity tea inmarathi1

 

४. चिकन सूप :

चिकन सूप तुम्हाला फ्लू आणि सर्दी होण्यापासून वाचवते. चिकन सूप प्यायल्यास सर्दी लवकर बरी होते. पण हे घरगुती उपाय केल्यानंतर जर तुमचा सर्दी-पडसे किंवा फ्लू बरा झाला नाही तर मात्र डॉक्टर गाठणेच इष्ट !

 

soup inmarathi

 

५. हळद दूध :

आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव कमीअधिक प्रमाणावर आपल्याकडे सुरूच आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घ्यायला हवी. पावसाळ्यात सर्दी खोकला फार मोठ्या प्रमाणावर होत असतो म्हणून गरम दुधामध्ये हळद घालून त्याचे सेवन करा. यामुळे आजारातून लवकर बरे होण्यास मदत होते. हळद अँटिबायोटिक म्हणून काम करते.

 

turmeric milk inmarathi

 

पावसाळा आला की बाहेर फिरायचं मन होतच मात्र आता पूर्वीसारखी परिस्थती राहिली नसून, प्रत्येकाने आपापली काळजी घ्यायला हवी. हात स्वच्छ धुणे, अंतर बाळगणे या गोष्टी नित्यनियमाने करत राहिल्या पाहिजे.

 

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?