'कैलासाच्या वाटेमध्ये शिवभक्ताने तयार केलेल्या "उनाकोटी" शिल्पाकृती; वास्तव की आख्यायिका ?

कैलासाच्या वाटेमध्ये शिवभक्ताने तयार केलेल्या “उनाकोटी” शिल्पाकृती; वास्तव की आख्यायिका ?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत भूमी जबरदस्त स्थापत्याची जननी आहे असं म्हटलं जातं. भारतीय स्थापत्य कला ही जगातील कुठल्याही स्थापत्य कलेपेक्षा प्राचीन आणि प्रगत आहे.

भारतीय स्थापत्य कलेचा नमुना म्हणून आज असंख्य ऐतिहासिक वास्तू दिमाखात उभ्या आहेत. ह्या वास्तु आपल्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देतात.

असंख्य अश्या ऐतिहासिक वास्तू आज भारतात आहेत. त्यांच्यापैकी बहुतांश वास्तूंबाबतीत आपण जाणून आहोत.

आपण वेळोवेळी त्या वास्तूंना भेट देत असतो. आपला इतिहास अनुभव असतो. परंतु अशा देखील काही वास्तु आहेत ज्यांच्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत. त्या भारताच्या सुदूर भागात घनदाट जंगलात हजारो वर्षांपासून मानवी स्पर्शापासून अलिप्त आहेत.

 

ajintha-inmarathi

 

असंच एक ठिकाण आहे त्रिपुरा राज्यातल्या एका घनदाट जंगलात, त्या ठिकाणाचं नाव आहे ” उनाकोटी”.

हे एक प्रकारचं शिव मंदिर म्हटलं जाऊ शकतं. हे स्थळ ११-१३ शतकं जुनं आहे. त्रिपुरात विकास कामे नसल्यामुळे निसर्ग खूप चांगल्या प्रकारे जपला आहे.

अश्याच त्रिपुराच्या उत्तर भागातील एका निसर्गरम्य जांपुई डोंगररांगेच्या आतल्या भागात हे उनाकोटीचं रहस्यमय शिव मंदिर आहे. त्रिपुराची राजधानी अगरताळापासून १७८ किमी दूर हे स्थळ आहे.

डोंगरात कोरण्यात आलेल्या असंख्य भव्यदिव्य, विशाल शिव मुखवट्यांसाठी हे स्थळ प्रसिद्ध आहे. यात भगवान शंकराचे मुखवटे जागोजागी डोंगराच्या कड्याकपाऱ्यात कोरण्यात आले आहेत.

ह्या रहस्यमय जंगलातील हे मुखवटे कंबोडियातील अंगकोर वाट या जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराच्या स्थापत्याशी साधर्म्य दाखवतात.

उनाकोटी म्हणजे काय?

उनाकोटीचा अर्थ होतो कोटीला एक कमी, असं म्हटलं जातं तितकी कोरीव शिल्पं त्या जंगलात आहेत. अजून अनेक शिल्प मुखवटे शोधायचे बाकी आहेत.

पण प्रामुख्याने जे सापडले आहेत त्यांच्यात भगवान शंकराची शिल्पं जास्त आहेत. इतर हिंदु देवी देवंतांची पण शिल्पे आहेत पण त्या तुलनेने कमी आहेत.

 

unakoti-tripura-inmarathi

 

या स्थळाचं मुख्य आकर्षण आहे या स्थळातील ३० फूट उंच कोरलेला भगवान शंकराचं रूप असलेला “उनकोटीश्वर काल भैरव”. ज्याची प्रतिमा आजही लोकांना भारावून टाकत असते.

पण प्रत्येक अद्भुत वास्तू मागे एक अद्भुत कथा असते तशी कथा या उनाकोटीच्या प्राचीन देवस्थळाबद्दल देखील प्रचलित आहेत. खरंतर एक नव्हे तर अनेक कथा आहेत. त्यापैकी आपण एक जाणून घेऊयात..

एका कथेनुसार एकदा भगवान शिव आणि पार्वती कैलासाच्या दिशेने मेरू पर्वताहून निघाले होते त्यावेळी वाटेत त्यांना कालू कुमार भेटला.

कालू कुमार भगवान शंकराचा भक्त होता. त्याने भगवंताला विनंती केली की त्यालाही सोबत यायचे आहे. भगवान शंकरांनी त्याला समजावले तरी तो ऐकत नव्हता. शेवटी भगवान शंकराने त्याला एक अट घातली.

त्यानुसार कालू कुमारला ते स्वतः सोबत कैलासावर तेव्हाच नेतील जेव्हा तो हिंदू देवी देवतांच्या एक कोटी प्रतिमा डोंगरात एका दिवसाच्या कालावधीत कोरून दाखवेल.

कालू कुमारने ती अट स्वीकारली.

एखाद्या झपाटलेल्या आत्म्यासारखा तो राबला, परंतु दैवाची साथ कालू कुमारला लाभली नाही. परिणामतः एक कोटीला फक्त एक शिल्पाकृती कमी असतांना दिवस मावळला आणि ठरल्या प्रमाणे शिव आणि पार्वती कैलास गमनाला रवाना झाले. कालू कुमार तिथेच राहिला.

परंतु ही कथा तितकी वास्तववादी वाटत नाही.

 

unakoti-inmarathi

 

दुसरी कथा अशी आहे जिच्यानुसार राजाने कालू कुमार या व्यक्तीला रात्री त्याच्या स्वप्नात दिसेल त्या देवतेचं शिल्प बनवायला सांगितलं होतं.

सर्व शिल्प देवाची बनवल्या नंतर मात्र त्याने एक कोरीवं शिल्प स्वतःचं बनवलं आणि जे ताडकन कोसळलं. हे शिल्प त्याने प्रसिद्धीसाठी बनवलं म्हणून कोसळलं असं म्हणतात. परंतु त्याचं गर्वहरण झालं. यातून अहंकार करू नये असा संदेश मिळतो. ही कथा थोडी आपुलकीची वाटते.

उनाकोटीच्या शिल्पाबाबत जरी अनेक कथा प्रचलित असल्या तरी पुरातत्व संशोधकांना हे क्षेत्र फार भारावून टाकतं. ते या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संशोधन करत आहेत.

पूर्वोत्तर भागातील हिंदू देवी देवता मंदिरांवर पडलेला कंबोडीयन तसेच चिनी प्रभाव त्यांनी ओळखला आहे. परंतु आज ही त्यांना पुरातन सर्वेक्षणातून समोर आलेली एक गोष्ट हैराण करते आहे.

ती म्हणजे इतकी सर्व शिल्प ही एकाच काळातील आहेत. बहुदा एका महिन्यातील वा आठवड्यातील आहेत. हे कसं शक्य आहे? या मागचं गूढ काय हे पुरातत्व संशोधक अनेक वर्षांपासून शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे प्राचीन रहस्यमय ठिकाण त्रिपुराच्या एका आतल्या भागात, घनदाट अरण्यात आहे. निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेलं आहे.

 

Unakoti-tripura-stones-inmarathi

 

तिथे पर्यटनासाठी जाण्याइतक्या सुविधा नसल्या तरी अनेक इतिहास संशोधकांसाठी एक अभ्यासाचा विषय व स्थानिक शिवभक्तांसाठी हे ठिकाण प्रति कैलास आहे.

उत्तर पूर्वेच्या मानवी स्पर्श नसलेल्या गर्द जंगलात ही शिल्प इतिहासाची, विस्तृत पसरलेल्या हिंदू संस्कृतीची आणि अद्भुत स्थापत्याची प्रचिती करून देत असतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights

One thought on “कैलासाच्या वाटेमध्ये शिवभक्ताने तयार केलेल्या “उनाकोटी” शिल्पाकृती; वास्तव की आख्यायिका ?

  • October 24, 2019 at 10:05 pm
    Permalink

    This status belongs to Buddha not Shivshankar

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?