' पहिल्या नजरेत प्रेम- "Love at first sight" खरंच असतंय काय रे भाऊ?

पहिल्या नजरेत प्रेम- “Love at first sight” खरंच असतंय काय रे भाऊ?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आपण अनेकदा रोमँटिक चित्रपट पाहतो आणि स्वप्नवत वाटाव्यात अशा प्रणयकथा- कादंबऱ्या देखील वाचतो. त्यात love at first sight हे कायमच आनंदी सहजीवनात परावर्तित होताना दिसतं. पण खरंच love at first sight अशी गोष्ट अस्तित्त्वात असते का? आपल्यातले खूप जण छातीठोकपणे हे अस्तित्त्वात असल्याचं सांगतात.

पण यात आपण sexual  attraction म्हणजेच शारीरिक आकर्षक आणि प्रेम यात गल्लत तर करत नाही ना? खरंच पाहताक्षणीच प्रेमात पडणं वगैरे शक्य असतं का?

आणि असेल तर तसं पाडण्यासाठी समोरच्या व्यक्तीमध्ये तशी काय qualifications असावी लागतात? यासाठी प्रथम आपण love at first sight ही संकल्पना समजून घेऊयात आणि त्यात कितपत तथ्य आहे हे बघूयात.

 

love-at-inmarathi
viralstories.com

खरंतर love at first sight या कल्पनेचा शब्दशः अर्थ घेता येणार नाही. कारण केवळ नजरानजर होणे हे एखाद्याचा स्वभाव ओळखण्यासाठी पुरेसे नाही. आपण एखाद्या व्यक्तीकडे पाहताक्षणीच शारीरिकदृष्ट्या आकर्षित होतही असू पण त्याला प्रेम म्हणता येणार नाही. कारण आपल्याला त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. खरंतर आपण त्यांना पुरेसे ओळखतही नसतो.

कधीकधी प्रथमदर्शनी आवडलेल्या माणसांच्या सानिध्यात आल्यावर ही व्यक्ती आपल्याला कशी काय आवडली असा प्रश्न पडावा इतके आपले त्या व्यक्तीबद्दलचे मत बदलते.

मात्र काही माणसांचा विश्वास असतो की दोन मनांचे एक होणे हे हे प्रथमदर्शनी सुद्धा घडू शकते. पण हे कुठेतरी déjà vu भावनेतून प्रेरित झालेले असते.

याचा अर्थ आपण या माणसाला खूप आधीपासूनच ओळखतोय. आपला त्याचा पूर्वीपासून संबंध आहे असे आपल्याला पाहताक्षणीच वाटते. खरंतर पहिल्या नजरेत तुमचा other half हा तुम्ही दोघे चुंबकाचे दोन विरुद्ध ध्रुव असल्याप्रमाणे तुम्हाला त्याच्याकडे आकर्षित करतो. त्यामुळेच प्लॅटोने म्हटले होते,

“when our souls descended from heaven to earth, they were divided, so that meeting your soul mate for “the first time” in this lifetime was a sort of reunion.”

त्यामुळे हे लक्षात घेतले पाहिजे की love at first sight चे metaphysical explanation सुद्धा काही गतजन्मीचे अनुभव मानते. त्यामुळे ही अशी विधाने स्वीकारताना सुद्धा आपण हे लक्षात घ्यायला हवे की ‘love at first sight’ हे एक प्रकारे ‘love at first sight’ नसतेच. त्यामध्ये काहीतरी जवळीक असते, आपण असंच कोणाकडेही पाहून प्रेमात पडत नाही.

 

love-at-first-site-inmarathi
blogs.discovermagazine.com

Bertrand Russell ने म्हटल्याप्रमाणे, “knowledge by acquaintance.” हे खरं आहे. आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करण्यापूर्वी आपली त्यांच्याशी कोणत्यातरी प्रकारे ओळख झालेली असते.

ही ओळख कधी त्या व्यक्तीच्या तुमच्याशी असलेल्या वागण्याबोलण्यातून झालेली असते, कधी तिच्या आवाजाचा पोत तुम्हाला आकर्षक वाटतो, तिच्या काही लकबी तुम्हाला आवडून जातात, कधी तुम्ही तिच्या सवयींच्या प्रेमात पडता तर कधी आणखी काही.

याचा अर्थ असा नाही की एखाद्या व्यक्तीची यापैकी एखादी गोष्ट आवडली म्हणजे तुम्हाला “love at first sight” झालंय. सांगायचा मुद्दा हा की एखादी व्यक्ती आवडणं हे केवळ दिसण्यापुरतं मर्यादित नसतं. आपल्याला एखाद्या व्यक्तीतली click होणारी गोष्टं कोणतीही असू शकते.

त्यामुळे love at first sight हे फक्त नजरानजर होण्यापेक्षा खूप काही जास्त असू शकतं. आपण त्या व्यक्तीचं आणि आपलं काय काय जुळू शकतं हे पाहतो.

त्याचा स्वभाव मिश्किल आहे का? तो नीटनेटका, टापटीप राहतो का? तिची तत्त्वं आणि तुमची तत्त्वं सारखी आहेत का? ती तुम्हाला काही hints देत आहे का? ती नजरेतून तुम्हाला काही सांगू इच्छिते का? आणि तुम्ही तसा विचार तिच्याबद्दल करता आहेत का? इथे जास्त करून तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा कौल घेता.

शारीरिक आकर्षण हा अर्थातच तुमच्यात असलेल्या chemistry चा अविभाज्य भाग असतो पण फक्त तोच एकमात्र भाग नसतो. ही गुंतागुंतीची प्रक्रिया असते. इतरही अनेक गोष्टी आपला मेंदू विचारात घेत असतो.

 

love-inmarathi
time.com

अर्थातच या माहितीवर प्रक्रिया करण्याचा महत्त्वपूर्ण भाग हा त्यामानाने कमी काळात मेंदू पार पाडते. उदाहरणार्थ पहिल्यांदा डेटवर असताना किंवा एखाद्या व्यक्तीला मॉलमध्ये प्रथम भेटले असता; आणि ही अशी माहितीवर केलेली प्रक्रिया असते जी समोरची व्यक्ती ही आपलं love at first sight आहे का? आपल्यात ‘तशी’ काही केमिस्ट्री आहे का? याचं उत्तर शोधायला आपल्याला मदत करते.

त्यामुळे अल्पपरिचित असलेली व्यक्ती आपल्याला आवडली असं कदाचित होऊ शकतं. पण पाहताक्षणीच प्रेमात पडणं ही कविकल्पना आहे. एखाद्या व्यक्तीचं केवळ दिसणं हे खऱ्या प्रेमाचं लक्षण असू शकत नाही.

एखादी व्यक्ती आवडणं आणि तिच्यावर तुमचं प्रेम असणं या देखील दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल ओळख झाल्यावर लगेचच आकर्षण वाटू शकतं पण असं अल्पपरिचित व्यक्तीवर प्रेम असू शकतं का?

यासाठी प्रथम आपल्याला एखाद्या व्यक्तीवर प्रेम असणं म्हणजे काय हे लक्षात घ्यावे लागेल. प्रेमामध्ये एकमेकांप्रती प्रामाणिक असण्याची, प्रेमात सातत्य राखण्याची, विश्वासू असण्याची, सहनशील असण्याची, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकमेकांना पूरक असण्याची गरज असते. प्रेम ही अशी गोष्ट आहे ज्यात एकमेकांचे हित आणि आनंद जपला जातो, एकमेकांची काळजी घेतली जाते.

थोडक्या ओळखीतून निर्माण झालेले प्रेम जे रोमँटिक प्रेम असते त्यातही शारीरिक आकर्षण असतेच. दुसऱ्या बाजूला एखाद्या व्यक्तीबद्दल आतून वाटणारी काळजी ही सर्व प्रकारच्या प्रेमाच्या नात्यांमध्ये वाटतंच असते अपवाद फक्त नुकतीच ओळख झालेल्या व्यक्तींचा.

कारण एखाद्याबद्दल काळजी वाटण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये आपण तितके समरसून गेलो असण्याची गरज असते. अर्थातच प्रेम फुलण्यासाठी, बहरण्यासाठी वेळ घेते, आणि त्यामुळे ओळख झाल्यावर लगेचच प्रेमात पडलेल्या व्यक्तींनी एकमेकांना समजून घेण्यासाठी, बहरण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला नसतो. पण म्हणून ही कल्पना खोडून काढण्याची आवश्यक्ता नाही.

 

love-care-inmarathi
priyo.com

आपण एखादी व्यक्ती प्रेमात पडली अशी संज्ञा वापरतो. तर मग ओळख झाल्याक्षणीच प्रेमात पडणं असं काही असतं का? इथे वापरण्यात आलेला ‘पडणं’ हा शब्दप्रयोग मदतीचा ठरतो. पडण्याची प्रक्रिया चालू असते. ती पूर्ण झालेली नसते. ती कालांतराने पूर्ण होणार असते.

पाहताक्षणीच प्रेमात पडावं अशी इच्छा होते तेव्हा एकमेकांप्रती प्रामाणिक असण्याची, प्रेमात सातत्य राखण्याची, विश्वासू असण्याची, सहनशील असण्याची, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकमेकांना पूरक असण्याची इच्छा असते. नातं जसजसं दृढ होत जातं तसतसं नात्यात परिपक्वता यायला लागते.

त्यामुळे love at first acquaintance याला निश्चित अर्थ आहे. इथे पहिल्या भेटीनंतर तुम्ही तुमच्या मनाशी खूणगाठ बांधलेली असते की तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडला आहात.

तुम्ही स्वतःला सांगता की या व्यक्तीबरोबर मला माझं संपूर्ण आयुष्य व्यतीत करायला आवडेल. याच व्यक्तीची मी इतकी वर्षं वाट पाहत होते. या व्यक्तीसोबत मी माझी खोलवर दडवून ठेवलेली गुपितं शेअर करू शकते आणि त्या व्यक्तीची गुपितं माझ्या हातात सुरक्षित राहतील. शारीरिक आकर्षण किंवा जवळीक ही आयुष्यभराच्या नात्याची सुरुवात असू शकते. पण खरं नातं बांधून ठेवते ती ही विश्वासपूर्ण जवळीक.

अर्थात, काही गोष्टी बदलतात, माणसं बदलतात. माणसं प्रेमात पडतात तशीच प्रेमातून बाहेरही पडतात. काही माणसं शारीरिक जवळीक म्हणजेच प्रेम मानून चालतात आणि त्यामुळे खरी प्रेमात कधी पडतच नाहीत.

 

sk-inmarathi
thebetterindia.com

प्रेम ही एक आदिम मानवापासून चालत आलेली मूलभूत क्रिया आहे. माणसांची एकमेकांशी ओळख होते, ती भेटत राहतात. एकदा, परत एकदा, पुन्हापुन्हा. त्यांना एकमेकांबद्दल काळजी वाटायला लागते. ते भावनिकदृष्ट्या एकमेकांच्या आणखी जवळ यायला लागतात. जर ही “love at first sight” मागची आयडिया असेल तर ते अस्तित्त्वात आहे हे निश्चित.

पण ते कळण्यासाठी तुम्हाला पहिल्या भेटीत एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्याचा अनुभव आलेला असायला हवा, तरच तुम्हाला त्याचा अर्थ निश्चितपणे कळेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “पहिल्या नजरेत प्रेम- “Love at first sight” खरंच असतंय काय रे भाऊ?

  • December 20, 2018 at 7:04 pm
    Permalink

    खुपच

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?