' प्रत्येक विमानातील ‘या’ खास सिक्रेट जागांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? – InMarathi

प्रत्येक विमानातील ‘या’ खास सिक्रेट जागांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

विमानातून प्रवास करण्यात काही वेगळीच मजा असते. तेथील क्रू मेंबर्स आणि एयर होस्टेस आपला चांगलाच पाहुणचार करतात. ते नेहेमी इकडून तिकडे फिरत असतात, कुणाला काहीही हवं असल्यास त्यांची सोय करत असतात.

ते आपली तर पुरेपूर सोय करतात पण ह्यावेळी आपल्या डोक्यात एक विचार नक्कीच सुरु असतो की, हे क्रू मेंबर्स आणि एयर होस्टेस नेहेमी असेच फिरत असतील का? की ते कुठे जाऊन आरामही करत असतील?

म्हणूनच आज आम्ही तुमच्यासामोर विमानातील एक गुपित उघडं करणार आहोत. ह्याबाबत कदाचित तुम्हाला माहित नसणार.

 

airoplane secretes-inmarathi01

 

विमानात उपस्थित असणाऱ्या क्रू मेंबर्स आणि एयर होस्टेससाठी विमानात एक वेगेळी सिक्रेट रूम उपलब्ध असते. जिथे ते आराम करतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

अनेकदा जर लांबचा प्रवास असेल तर ते शिफ्ट्समध्ये काम करत असतात. आणि ह्या दरम्यान ज्यांची शिफ्ट नसेल ते ह्या सिक्रेट रुममध्ये आराम करतात.

 

secret room on plane-inmarathi01

 

प्रवासी क्षेत्राव्यतिरिक्त विमानात अनेक अश्या जागा असतात जिथे कंपनी स्टाफ आराम करण्यासाठी जातात.

एयर होस्टेससाठी तर अश्या रूम्स असतातच पण क्रू मेम्बर्ससाठी देखील वेगवेगळे रेस्ट डिपार्टमेंट असतात. जे वेगवेगळ्या आकाराचे असतात.

 

secret room on plane-inmarathi

विमानाचा वरील भाग हा खाली असतो. तसेच मेन सेक्शनच्या कोपऱ्यांत देखील खूप मोकळी जागा असते. ह्याचाच वापर आराम करण्यासाठी केला जातो. विमानाचा मागील भाग देखील कर्मचाऱ्यांच्या रेस्ट करण्यासाठी वापरला जातो.

या खोल्या अतिशय आरामदायक असतात. इथे खाण्यापिण्याची, आराम करण्याची पूर्ण सोय असते.

 

room in plane inmarathi

 

आराम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून दोन बेड्सच्यामध्ये पडदे लावले जातात. एका विमानात कमीतकमी ८ खोल्या तरी असतात. सर्वच विमान कंपन्या आपल्या केबिन क्रू मेम्बर्सच्या सुविधेची पुरेपूर काळजी घेतात. तसेच त्यांच्यासाठी मनोरंजनाची सोय देखील उपलब्ध करून दिली जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?