' …म्हणून विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांची संख्या कमी आहे. या कारणांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. – InMarathi

…म्हणून विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांची संख्या कमी आहे. या कारणांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

टेक्निकल फिल्ड्स हे कधीही मुलींपेक्षा मुलांनी भरलेले आढळतात. १९९१ पूर्वी इंजिनीअर मुलगी ही कन्सेप्ट भारतात दुर्मिळ वाटत असे. १९९१ नंतर जसे संगणक युग सुरु झाले तसे मुली देखील संगणक अभियंता म्हणून कंपनीमध्ये काम करताना दिसू लागल्या.

तरीही आज इंजिनिअरिंगची अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे मुलींचे प्रमाण नगण्य असते किंवा काहीच नसते. सिव्हील इंजिनिअरिंग असेल, ऑटोमोबाईल असेल, मेकॅनिकल असेल अशा क्षेत्रात मुली कमीच पाहायला मिळतात.

बऱ्याचदा इंजिनीअर मंडळींचे जोक्स सोशल मीडियावर पसरवले जातात ज्यांची भाषा फक्त एखाद्या इंजिनीअरलाच कळते. यातील बहुसंख्य जोक मुलींना इंजिनीअरिंग कसे जमत नाही या मुद्द्यावरून तयार केलेले असतात.

 

girls-engeneer-inmarathi

 

खुद्द IIT ने आता स्वत:च्या शिक्षण संस्थेत मुलींचा कोटा वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत. २०१८ साली आपल्या संस्थेत प्रवेश देताना IIT ला विशेष आनंद झाला होता कारण एकूण प्रवेशाच्या जवळजवळ १६% प्रवेश हे मुलींचे होते.

मुलींबाबतचा हा भेदभाव संपवण्यासाठी IIT ने स्वत:च्या कोटा पद्धतीमध्ये आता बदल केला आहे.

त्यासाठी त्यांनी एका नवीन कोट्याची सुरुवात केली आहे ज्याचे नाव आहे super numerory quota. या कोट्या अंतर्गत मुलींसाठी काही जागा राखीव ठेवण्यात येतील.

अर्थात ही एक थोड्या काळासाठी केली गेलेली सोय आहे. समजा उद्या मुलींचे प्रमाण वाढले तर IIT हा कोटा काढून टाकेल.

IIT दिल्लीने तर ज्या मुली प्रवेश परीक्षा पास होतात त्या दिल्लीला इंटरव्ह्यू देण्यासाठी येवू शकत नसतील तर त्यांच्यासाठी फोन किंवा इमेलद्वारे इंटरव्ह्यूची सोय करण्याचे पाऊल उचलले आहे.

त्याही पुढे जावून ज्या मुलींना शिक्षणासाठी घारापासून दूर राहायचे नसेल अशा मुली आपल्या घराच्या किंवा आसपासच्या IIT ला प्रवेश घेवू शकतात अशी सूट देखील देण्यात आलेली आहे.

IIT ही देशातील सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकीचे शिक्षण देणारी संस्था समजली जाते. भारतात अशा एकूण २३ IIT आहेत जिथे सगळे मिळून जवळपास १६००० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यात मुलांचीच संख्या अधिक असते.

२०१८च्या आकडेवारी नुसार एकूण १२०५८ विद्यार्थ्यांपैकी, केवळ १८४१ विद्यार्थी या मुली होत्या. हा मुलींच्या प्रवेशांपैकी आजवरील सर्वाधिक आकडा आहे.

याउलट डॉक्टरकीच्या प्रवेश परीक्षेमध्ये पास होवून प्रवेश घेण्याचे मुला मुलींचे प्रमाण ५०-५१ % असे आहे.

 

girls-scientist-inmarathi

 

म्हणजे डॉक्टर बनण्याकडे मुलींचा जास्त ओढा असतो पण अभियांत्रिकीकडे मुली जास्त वळत नाहीत असा निष्कर्ष यातून कोणीही सहज काढू शकेल. याच्यावरून देखील मग मुलींना गणित कळत नाही त्यामुळे त्या सायन्सला biology चा विकल्प निवडतात.

मुलींना तांत्रिक बाबी कळत नाहीत अशा शक्यतेवर whats app वर विनोदाचे महापूर वाहत असतात. पण खरी परिस्थिती काय आहे ?

एक तर मुलींना आजही घरात शिक्षण घेण्यासाठी दुय्यम स्थान दिले जाते. जर घरात मुलगा असेल तर मुलाला शिकण्यासाठी जास्त उत्तेजन दिले जाते तितके उत्तेजन मुलीला दिले जात नाही.

जर आई वडिलांची शिकवण्याची परिस्थिती नसेल तर त्यावेळी मुलीला सांगितले जाते की तुला तडजोड करावी लागेल. मुलाचा शिक्षणाचा हट्ट पुरवला जातो.

त्याला महागडी कोचिंग लावली जाते, त्याला शिक्षणासाठी कर्ज काढून दूर पाठवले जाते, त्याच्या शैक्षणिक गरजा भागवण्याकडे लक्ष दिले जाते. पण हीच भूमिका मुलीबद्दल घेतली जात नाही असे आजही दिसून येते.

त्यामुळे अनेक वेळा मुलींना घरात नमते घ्यावे लागते. स्वत:ची इच्छा आणि आवड मारून शिकावे लागते किंवा शिक्षण बंद करावे लागते.

अभियांत्रिकी साठी जी प्रवेश परीक्षा घेतली जाते तिच्या परीक्षेला ही फार कमी मुली बसतात. २०१८ मध्ये तर केवळ ६% मुलीनी JEEE ची प्रवेश परीक्षा दिली होती.

 

iit-girls-inmarathi

 

कारण अशा परीक्षांचे कोचिंग देणे मुलींच्या घरच्यांना परवडत नाही. मुलींना अभियांत्रिकी क्षेत्रात कामे देण्यास देखील कंपन्यांचा विरोध असतो. मुलींची लग्ने होतात, त्यांच्या बाळंतपणाच्या सुट्या वाढवून द्याव्या लागतात.

मुलींना साईटवर पाठवता येत नाही अशी मानसिकता इंडस्ट्रीमध्ये भरून राहिलेली असते त्यामुळे सुद्धा अभियांत्रिकी क्षेत्रात मुलींचे प्रमाण कमी आहे.

म्हणजेच मुलींना तांत्रिक बाबी कळत नाहीत असे सर्वसमावेशक विधान करणे चुकीचे ठरेल. या इतर बाबींचा सुद्धा विचार केला जाणे गरजेचे आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?