' त्यांनी बियरच्या बाटलीत फुंकर मारून संगीत बनवलंय, ज्यावर येणाऱ्या पिढ्याही फिदा होत राहतील..

त्यांनी बियरच्या बाटलीत फुंकर मारून संगीत बनवलंय, ज्यावर येणाऱ्या पिढ्याही फिदा होत राहतील..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“पंचम” हे नाव माहीत नाही अशी कुठलीही पिढी आत्ता आत्तापर्यंत होवून गेली नाही आणि कदाचित पुढे ही होणार नाही. याचा अर्थ पंचम दा उर्फ “राहुल देव बर्मन” यांना जरी हे जग सोडून कित्येक वर्षे लोटली असतील तर त्यांच्या अजरामर संगीताचे चाहते मात्र पिढी दर पिढी निर्माण होतच राहतील!

५० च्या दशकातील अत्यंत प्रतिभाशाली संगीतकार सचिन देव बर्मन यांचा मुलगा जेव्हा आपल्या वडिलांचे बोट धरून इंडस्ट्री मध्ये आला तेव्हा कुणालाही वाटले नव्हते आपल्या वडिलांसारखा किंबहुन त्यांच्यापेक्षा काकणभर सरस कामगिरी हा मुलगा संगीतात करून दाखवेल.

लहानपणी तबलू असं टोपणनाव मिळालेला हा मुलगा ज्यावेळी घरी दादामुनी “अशोक कुमार” वडिलांना भेटायला आले होते तेव्हा या लहान बाळाचे रडणे ऐकून उद्गारले होते “ अरे ये रोता भी पंचम स्वर में है!” बस्स त्या क्षणापासून इंडस्ट्रीला आणि अलम दुनियेला त्यांचा “पंचम” गवसला.

 

pancham-inmarathi
dnaindia.com

 

खूप सगळे संगीतकार जेंव्हा फ्युजन चे नवनवीन प्रयोग करून त्याचे श्रेय स्वत: घेण्याचा प्रयत्न करीत असतात पण कित्येक वेळा तो ट्रेंड पंचम दा ने आपल्या संगीतात ३ दशका पूर्वी कधीचाच आणलेला असतो.

आज ज्या हनी सिंग च्या “चार बोतल व्होडका काम मेरा रोज का” या रॅप वर नवीन पिढी नाचते तेव्हा १९७५ साली सिने सृष्टीतल्या मैलाचा दगड ठरलेल्या शोले चित्रपटातील “मेहबूबा” या गाण्यात पंचम ने केवळ दारूच्या रिकाम्या बाटल्यात फुंकर मारून गाण्याच्या सुरुवातीला thumping beats चं संगीत निर्माण केलेले असते.

चुरा लिया है तुमने जो दिल को या “यादो की बारात” चित्रपटात गाणे सुरु होण्यापूर्वी जो मंजुळ किणकिणता आवाज येतो तो काचेच्या ग्लास वर चमचाने आवाज करून निर्माण केलेला असतो, पंचम कुठल्या गोष्टीतून संगीत निर्माण करू शकतो हे ओळखण्याची ताकद बॉलीवुड च्या कुठल्याही दिग्दर्शका मध्ये नव्हती म्हणून कदाचित पंचम च्या ट्यून कधीही जुन्या न होणाऱ्या असतात.

पिढी दर पिढी बदलली तरी नवीन संगीतकारा बरोबर पंचम चं संगीत हर एका मोबाईल मध्ये वाजत राहतं.

६० चं दशक संपलं. त्याबरोबर हिंदी चित्रपट सृष्टीतला संगीताचा सुवर्ण काळ सुद्धा संपला. स्वप्नात जगण्याचे दिवस मागे राहिले आणि स्वातन्त्र्यानंतर झालेल्या अपेक्षा भंगामुळे एक प्रकारे विद्रोहाचा काळ तयार होत गेला. १९६१ साली पंचम दा ने संगीत दिलेली “छोटे नवाब” हा चित्रपट पडद्यावर आला.

 

Chhote-Nawab-inmarathi
saavn.com

 

पिक्चर म्हणावा तसा चालला नाही त्यामुळे पंचम ची गाणी ही विस्मृती मध्ये निघून गेली. पंचम ला यशाचा सूर्योदय दिसला १९६६ साली आलेल्या “तिसरी मंझील” या चित्रपटा द्वारे. विजय आनंद याने दिग्दर्शित केलेला शमी कपूर आणि आशा पारेख यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आज सिनेसृष्टीत एक अविस्मरणीय चित्रपट म्हणून ओळखला जातो.

अविस्मरणीय यासाठी देखील कारण या चित्रपटचं संगीत लाजवाब होतं आणि १९५०-६० च्या दशकात ऐकलेल्या संगीता पेक्षा या संगीताचा बाजच वेगळा होता.

पंचम युगाची नांदी सुरु झाल्याची ग्वाही या चित्रपटाने दिली. याच चित्रपटा पासून पंचम, किशोर आणि आशा याचं हिट कॉम्बिनेशन निर्माण झालं.

पंचमदानी आपल्या करिअर मध्ये ३३१ चित्रपटांना संगीत दिले आहे. यातील अनेक चित्रपट गाजले अथवा पडले पण संगीत अजरामर राहिलं. ७० चे दशक अमिताभ बच्चन च्या अँग्री यंग हिरो च्या प्रतिमे मुळे गाजले. अमिताभ च्या भूमिका असलेल्या चित्रपटात संगीताला दुय्यम स्थान असायचे मात्र अशा स्थितीत देखील पंचम ने भारतीय संगीताला आधुनिकीकरणाचा बाज दिला.

८० च्या दशकात जेंव्हा आक्खं बॉलीवुड डिस्को वर थिरकत राहिलं आणि साउथ इंडियन चित्रपटाचे रिमेक बनवत राहिलं त्यावेळी पंचम ने गुलजार सारख्या गीतकाराबरोबर मिळून “इजाजत”, “लिबास” या सारख्या चित्रपटांना संगीत दिलं.

सिली हवा छु गई, प्रीतम आन मिलो, होठो पे बात जो आई अशा सारखी अविस्मरणीय गाणी गुलझार च्या चित्रपटासाठी पंचमदानी स्वरबद्ध केली. ९० च्या दशकात नवनवीन संगीतकारांचा उदय होत होता त्या काळात ही १९४२ लव्ह स्टोरीच्या संगीताने पंचम युग कायम असल्याचा निर्वाळा दिला होता.

 

rd-inmarathi
indiatoday.com

 

पंचमदाचे बेस्ट म्युझिक साठी १८ वेळा फिल्मफेअर ला नामांकन झाले, त्यापैकी ३ वेळा त्यांना पुरस्कार मिळाला. शेवटचं अवॉर्ड मिळालं होतं १९४२ – लव्ह स्टोरी साठी पण ते घेण्यासाठी पंचमदा जिवंत नव्हते. मध्ये झंकार बीट्स नावाचा एक चित्रपट आला होता पंचमदाना ट्रिब्युट देण्यासाठी. त्यात पंचमदा वर एक गाणे होते.

“बॉस कौन था मालूम है क्या, बॉस कौन है मालूम है क्या” १९९४ साली जग सोडून जाताना सुद्धा पंचमदा १९४२- लव्ह स्टोरी च्या संगीतातून हेच सांगून गेले होते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?