विकासकामात झाड जातंय? उचलून दुसरीकडे लावा!- वृक्षतोडीवरचा अफलातून तोडगा..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
झाडे लावा झाडे जगवा आणि अशा तत्सम म्हणी आपण सगळे नुसते म्हणतो, आचरणात कधीच आणत नाही हे खूप दुर्दैवी आहे! निसर्गाने आपल्याला ऑक्सीजन मिळावा म्हणून इतकी सुंदर झाडांसारखी सोय केली पण माणसाने त्या सगळ्या नैसर्गिक देणगीचा विचका केला!
आज अमेझोन इकडची कित्येक झाडं जळून राख झाली म्हणजे जिथून पृथ्वीच्या बहुतांश भागाला ऑक्सीजन मिळतो अशा ठिकाणी ही परिस्थिति आहे तर आपल्या देशाच्या परिस्थिति बद्दल न बोललेलच बरं!
सध्या आपल्या इथे विकासाच्या नावाखाली चाललेली वृक्षतोड ही अनाकलनीय आहे कारण झाडं तोडून कुणाच भलं झालेल नाहीये!
आपल्या देशात विकास कार्य अतिशय वेगाने सुरु आहे. पण ह्या विकास कार्यादरम्यान पर्यावरणाचा ऱ्हास देखील तेवढाच वाढला. कधी मेट्रो तर एक्सप्रेस-वे च्या नावावर अनेक झाडांना कापले जाते. आपल्या विकासासाठी आपण आजवर निसर्गाचा बळी देत आलो आहोत.
मेट्रो कारशेड वरुन मुंबईत झालेला वाद, आरे कॉलनी इथली काही झाडे तोंडल्यामुळे तिथल्या स्थानिक नागरीकांचा उफाळून आलेला संताप आणि त्यातून उभं राहिलेलं एक आंदोलन तर सध्याचा अतिशय ज्वलंत विषय आहे!
या आंदोलनाला सामान्य जनता तसेच कित्येक सेलिब्रिटींनी सुद्धा खूप सपोर्ट केला, त्यामुळेच कदाचित तिकडच्या कामावर तात्पुरती स्थगिती आली आहे! आणि ही सगळं शक्य झालं ते केवळ लोकांनी आवाज उठवला म्हणून!
आपणही आपल्यासमोर वृक्षतोड चालली असल्यास तिच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे तरच कुठे या सगळ्याला आळा घालता येऊ शकतो!
पण जसे वृक्ष किंवा निसर्ग महत्वाचा आहे तितकंच लोकांच्या सोयीसाठी चालणारी विकास कामं सुद्धा महत्वाची आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर जितक मजबूत असेल तरच रोजच जीवन जगणं ही सुकर होतं हे आपण कित्येक प्रगत देशांकडे बघून शिकलो आहोत!
त्यामुळे ही सगळी डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे पण ती सुद्धा निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता आणि कोणताही चुकीच्या मार्गाचा अवलंब न करता!
त्यामुळे जी झाडे तोडायचीच असतील तर झाडाच आयुष्य किती आहे त्याचं उपयोग किती आहे या सगळ्याचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे, आणि तोंडलेल्या झाडांसाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे! पण हा पर्याय सहसा कुणी निवडताना दिसत नाही आणि म्हणून ही सगळे प्रश्न अजून चिघळतात!
हा पर्याय म्हणजे ट्री-ट्रांसलोकेटिंग.

हैद्राबादचे रामचंद्र अप्पारी ह्यांनी ट्री-ट्रांसलोकेटिंगच्या माध्यमातून आजवर हजारो झाडांना वाचवले आहे. ट्री-ट्रांसलोकेटिंग एक अशी टेक्निक आहे ज्याद्वारे एका झाडाच्या ८० टक्के फांद्या आणि पानं कापले जातात. ह्या नंतर उरलेल्या झाडाला मुळासकट काढून त्याला दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरीत केल्या जाते.
स्थानांतरीत करण्याची ही टेक्निक २००० वर्ष जुनी आहे. ह्याची सुरवात इजिप्त येथे झाली होती. दिवेशात आजही ह्याच टेक्निकचा वापर करून अनेक झाडांना वाचवल्या जाते.

हैद्राबाद येथे मेट्रो प्रकल्पाअंतर्गत हजारो झाडं कापली जाणार होती. रामचंद्र अप्पारी ह्याविषयी अतिशय दुखी होते. ते एका खाजगी बँकेत नोकरी करायचे आणि त्यांनी अॅग्रिकल्चरमध्ये पदवी घेतली होती. त्यांना ह्या झाडांना वाचविण्यासाठी काहीतरी करावेसे वाटले. तेव्हाच त्यांना ह्या ट्री-ट्रांसलोकेटिंग तंत्रज्ञानाची माहिती झाली.
त्यांनी आपली नोकरी सोडली आणि आपली स्वतःची कंपनी उभारून मेट्रो प्रकल्पाच्या अध्यक्षांसमोर एक प्रस्ताव ठेवला. रामचंद्र ह्यांचा झाडांना वाचविण्याचा हा प्रस्ताव अध्यक्षांना आवडला आणि ह्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

ह्या पद्धतीने ८०० झाडांचा मेट्रोच्या नावाखाली बळी जाण्यापासून वाचला. रामचंद्र अप्पारी ह्यांच्या कंपनीचे नाव Green Morning Horticulture Services Private Limited असे आहे. २०१० साली ह्या कंपनीची सुरवात झाली. तेव्हापासून ते आजवर त्यांनी ७००० झाडांना स्थानांतरीत केले आहे.

ही कंपनी सरकारी तसेच गैर-सरकारी संस्थांसाठी काम करते. ह्यासाठी ते १०००० झाडांमागे १ लाख रुपये आकारतात. तसेच झाड कुठे स्थानांतरीत करायचे आहे हे त्यावर देखील अवलंबून असते.
मेट्रो, बुलेट ट्रेन, इत्यादी आधुनिक सुविधा गरजेच्याच आहेत पण त्यासाठी झाडांची कत्तल कितपत योग्य आहे ही ज्याचं त्याने ठरवायला पाहिजे! आधुनिकाकरणाच्या नावावर चाललेली निसर्गाची विल्हेवाट फक्त बघत बसायची का निसर्गाला सांभाळून विकास करायचा ही आपण ठरवलं पाहीजे!
आपणही रस्ते किंवा मेट्रो तसेच इतर प्रकारचे आधुनिकीकरण करत असताना निसर्गाचा सांभाळ केला पाहिजे, आणि जर आपल्याकडे त्याचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे तर नक्कीच आपल्याला झाडांना वाचविण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण ते आपल्या अस्तित्वासाठी खूप गरजेचे आहेत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com |आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
या ग्रहस्ताचा संपर्क दिल्यास बरे होईल
Contact no. Please
please contact no this person
Tree shifting not new for us but tendency of contractor is that making money from tree one of profit part how they can do this
Then you do this work free of cost?
Simple…