काही तासांत नरेंद्र मोदींचे ट्विटर फोलोवर्स तीन लाखांनी कमी झालेत! कारण वाचा..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

मोदींचा सोशल मीडियाचा मुक्तहस्ते वापर ही जगभरात कुतूहलाची गोष्ट आहे. मोदींची टीम त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट सफाईदार पणे हँडल करत असते. मोदींना इतर कुठल्याही क्रिकेटर, बॉलीवूड सेलिब्रेटी, भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात काम करणाऱ्या नेते मंडळींपेक्षा जास्त फॅन फॉलोविंग सोशल मीडिया वर लाभलेला आहे.

मोदींचे अनेक लाखात असलेले सोशल मीडिया फॉलोवर्स हा जगभर चर्चेचा विषय असतो.

१३ जुलै २०१८ ला अचानक मोदींच्या ट्वीटर हँडल चे फॉलोअर्स कमी दिसायला लागले.

हा बदल काही थोडा थोडका नव्हता तर तब्बल २ लाखाचा होता. १२ जुलै ला जिथे ४३.४ मिलियन फॉलोअर्स दिसत होते ती संख्या घटून अचानक ४३.२ इतकी झाली. म्हणजे एका दिवसात अचानक मोदींना फॉलो करणाऱ्यांची संख्या २ लाखाने कमी झाली.

 

modi-tweet-inmarathi
newslaundry.com

२०१९ च्या निवडणुकीच्या आधी मोदींची सोशल मिडीयाच्या फॉलोअर्स मध्ये इतकी घट होणे ही चिंतेची बाब आहे असे भाजप विश्लेषकांचे मत पडले. मोदींचे दुसरे अकाऊंट @PMOIndia याचे फॉलोअर्स सुद्धा तब्बल १ लाखाने कमी झाले आहेत. मोदींच्या विरोधकांनी ही संधी घेवून भाजपच्या सोशल मीडिया टीम वर आधीच तोंडसुख घ्यायला सुरुवात केलेली आहे.

मोदींची मिडीया टीम खोटे फॉलोअर्स विकत घेत आहे अशी राळ देखील उठत आहे. सोशल मीडिया वर देखील ट्वीटर युझर्स नी ह्या गोष्टीबाबत मोदींना ट्रोल करणे चालू केले आहे.

“स्वच्छ भारत अभियानाचा करिष्मा ट्वीटर वर दिसला ज्यावेळी मोदींचे फॉलोअर्स तब्बल ३ लाखांनी कमी झाले आहेत पण याची खरी चिंता तर आता सिनियर बच्चन यांना व्हायची चिन्हे दिसत आहेत”

“मोदींचे कमी झालेले फॉलोअर्स हे फेक फॉलोअर्स होते”

अशा प्रकारची ट्वीटस याबाबत ट्वीटरवरच्या लोकांकडून केली जात आहेत. या सगळ्या गोंधळाचं कारण नक्की काय असावं याचा अंदाज कुणालाही नाही. मोदींना फॉलो करणाऱ्या लोकांमध्ये अचानक घट का झाली याबाबत निरनिराळे तर्क वितर्क लढवले जात आहेत पण याचं खरं कारण स्वत: ट्वीटरनेच दिलेले आहे.

 

modi-twitter-inmarathi
dailyhunt.in

ट्वीटरवर प्रतिदिन जवळजवळ १ करोड नकली अकाऊंट रजिस्टर होत राहतात. वाचायला विचित्र वाटते परंतु जगभरातून रोज करोडो लोक ट्वीटर वर वेगवेगळ्या नावाने अकाउंट उघडत असतात. ट्वीटर च्या सिस्टीम मध्ये महिन्याला १८, ००० पेक्षा जास्त अकाउंट रिपोर्ट केली जातात. ज्याचा आकडा प्रतिदिन, प्रतिमाह वाढत चाललेला आहे.

एकट्या मार्च २०१८ मध्ये ट्वीटर वर २५००० पेक्षा जास्त नकली अकाउंट रिपोर्ट केले गेले आहेत.

ट्वीटर वर गेल्या काही दिवसापासून सतत हिंसेचे, द्वेषाचे तसेच भडकाऊ ट्वीट करण्याचे प्रमाण वाढलेले आढळते. अशा ट्वीटचा वापर दोन गटांमध्ये त्तेढ पसरवण्यासाठी आणि दंगली भडकवण्यासाठी वारंवार केला जातो. अशा बिनकामाच्या ट्रोलर्स विरुद्ध आता स्वत: ट्वीटरनेच आघाडी उघडली आहे.

त्यासाठी स्वत:च्या पॉलिसी मध्ये जंगी बदल करून ट्वीटर ने आपल्या घरात बेनामी नावाने घुसून बसलेल्या नकली युझर्सना हटविण्याचा विडा उचलला आहे.

याची माहिती एका ब्लॉग पोस्ट द्वारे खुद्द ट्वीटर चे ट्रस्ट अँड सेफ्टी पॉलिसी चे उपाध्यक्ष डेल हार्वे आणि कंपनीचे अधिकारी योल रोथ यांनी दिली. भडकाऊ ट्वीट करून सामाजिक सुरक्षा भंग करणारे, विशिष्ट समाजाच्या / गटाच्या लोकांना भडकवणारे, धार्मिक, सामाजिक तिरस्कार पसरवणारे किंवा ट्रोल करणारे ट्वीटर युझर्स कंपनीच्या रडार वर आहेत.

 

Facebook, Twitter Videos Download.Inmarathi00
youtube.com

त्याचाच भाग म्हणून कंपनीने ११ जुलै २०१८ रोजी जवळजवळ ७ करोड युझर्स ना ट्वीटर वरून सस्पेंड केले आहे. याचा परिणाम म्हणून मोदींच्या फोलोवर्स मध्ये १३ जुलै रोजी अचानक २ लाख फॉलोअर्स ची घट पाहायला मिळाली. ही घट काही एकट्या मोदी यांच्या अकाऊंट मध्ये नाही. अनेक सेलिब्रेटींच्या फॉलोअर्स ची संख्या ट्वीटर च्या या सफाई मोहिमेमुळे घटली आहे.

पिअर्स मॉर्गन, बीबीसी, डोनाल्ड ट्रम्प, जेक ऑस्टीन अशा मातब्बर सेलिब्रेटींचे ट्वीटर फॉलोअर्स अशा फेक डेल्टा अकाउंटला उडवल्यानंतर लक्षणीयरीत्या घटले आहेत.

सध्या फेसबुक च्या डेटा लिकेज प्रकरणानंतर सोशल मिडीयाच्या वाढत्या गैरवापरा बद्दल सगळ्याच सोशल मिडीया साईट वर जगभरातून टीकेची झोड उठत राहते. त्याच्या वाढत्या दबावामुळे ट्वीटर सारख्या सोशल मिडीया साईटला गंभीर पावुले उचलून साईट वर चाललेल्या गैरकामाचा बंदोबस्त करण्यासाठी मैदानात उतरावे लागले असे प्रथमदर्शनी दिसत आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?