' "गुगल"मध्ये काम करणाऱ्या या अवलिया इंजिनिअरची प्रवासाची पद्धत पाहून तुम्हालाही हेवा वाटेल!

“गुगल”मध्ये काम करणाऱ्या या अवलिया इंजिनिअरची प्रवासाची पद्धत पाहून तुम्हालाही हेवा वाटेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

न्यूजर्सी येथे राहणारे टॉमी लट्स हे गूगलमध्ये इंजिनीअर आहेत. ते रोज इतर गुगलच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे ऑफिसला जातात. पण ह्याबाबत विशेष म्हणजे ते रोज ऑफिसला जाण्यासाठी कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्टचा नाही तर स्वतः बनविलेल्या नावेचा वापर करतात.

ह्यामागे त्यांचा हेतू हा शहराच्या गर्दीपासून आणि प्रदुषणापासून दूर राहणे हा आहे.

ते शहराच्या त्या बस किंवा ट्रेनमध्ये प्रवास करण्यापेक्षा नावेत जाताना कॉफीसोबत निसर्गाचे सौंदर्य अनुभवणे पसंत करतात. रोज नावेतून प्रवास करत ऑफिसला जाणे खरंच किती सुंदर अनुभव असेलं.

 

tomy luts-inmarathi03
thenypost.com

टॉमी लट्स ह्यांचे ऑफिस हडसन नदीच्या दुसऱ्या काठावर न्यूयॉर्क सिटीच्याचेल्सी येथे आहे. घरून त्यांच्या ऑफिसपर्यंतचा हा प्रवास ते अडीच तासात गाठतात. त्यांच्या घरापासून हडसन नदी ही २० मिनिटांच्या अंतरावर आहे.

आपल्या सायकलवर नावेला मागे बांधून ते ह्या नदीपर्यंत पोहोचतात. त्यांनतर ते जॉर्ज वॉशिंगटन ब्रिजच्या खाली नदीच्या काठावरून ते प्रवासाला सुरवात करतात.

 

tomy luts-inmarathi02
thenypost.com

स्वतः बनविलेल्या ह्या नावेतून प्रवास करत हडसन नदी पार करण्यासाठी त्यांना १ तास एवढा वेळ लागतो. पण परत येताना नदीचा प्रवाह बदल्याने ते नावेतून नाही तर त्यांच्या सायकलने जॉर्ज वॉशिंगटन ब्रिज पार करत न्यूजर्सीच्या लियोनमध्ये असलेल्या त्यांच्या घरापर्यंत पोहोचतात.

 

tomy luts-inmarathi01
thenypost.com

टॉमी सांगतात की ते बसमध्ये रावस करून आता त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात स्वतःची नाव बनविण्याचा विचार आला. त्यानंतर ते युट्युबवरून नाव बनवायला शिकले आणि स्वतःची एक नाव तयार केली.

 

tomy luts-inmarathi
thenypost.com

टॉमी ह्यांच्यामते त्यांना ह्या प्रकारे ऑफिसला जायला जास्त वेळ लागतो. पण हे त्या बसच्या गर्दीपेक्षा आणि ट्राफिक पेक्षा अधिक चांगले आहे. टॉमीची पत्नी सुरवातीला त्यांच्या अश्याप्रकारे नावेतून ऑफिसला जाण्यावरून काळजी करायची पण आता त्या देखील पूर्णपणे चिंतामुक्त झाल्या आहेत.

पण टॉमी जरी नावेतून प्रवास करत असले तरी ते त्यांच्या गरजेच्या सर्व वस्तू स्वतःजवळ ठेवतात जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत ते स्वतःचा बचाव करू शकतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?