' “शिवशाही” बसला अपघातांचे ग्रहण लागण्याची ही पडद्यामागची कारणे काळजीत टाकणारी आहेत – InMarathi

“शिवशाही” बसला अपघातांचे ग्रहण लागण्याची ही पडद्यामागची कारणे काळजीत टाकणारी आहेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

शिवशाही ही महाराष्ट्रातील मुंबई आणि कोल्हापूर, मुंबई आणि पुणे, बोरिवली आणि मालवण , कल्याण आणि अहमदनगर या शहरांमधील विनाथांबा वातानुकुलित बस सेवा आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने भाडेतत्त्वावर ७०० शिवशाही एस.टी. बसेस आपल्या ताफ्यात घेतल्या आहेत.

सध्या जिल्ह्यात ठाणे ते बोरिवली, ठाणे ते भार्इंदर या स्थानिक मार्गांवर तसेच ठाणे ते कोल्हापूर या लांबच्या मार्गावर या बस धावत आहेत.

तर ठाणे-कोल्हापूर मार्गावर दोन शिवशाही बस धावत असून त्यांच्या दोन फेऱ्या होतात. कोल्हापूर विभागात चार खाजगी कंपन्यांकडून ३८ शिवशाही गाड्या विविध मार्गांवर धावत आहेत.

आता तर कल्याण-नगर या मार्गावर ही बस सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, आता दोन्ही बाजूंनी एकूण २० बस चालवण्यात येत आहेत.

 

shivshahi-inmarathi

 

ही बससेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे चालवली जात असली तरी या मार्गावरील बस खाजगी कंत्राटदारांच्या असतात. महामंडळ कंत्राटदारास भाडे देते. याशिवाय इंधन, चालक आणि टोल यांसह इतर सगळे खर्च ही महामंडळाची जबाबदारी असते.

प्रत्येक बसची प्रवासी क्षमता ४५ असून यात चालक हाच वाहकाचे काम करतो. बस पूर्ण भरली असता दर फेरीमागे महामंडळास अंदाजे २७,००० रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. तोटा झाल्यास तो महामंडळाच्या पदरी पडतो.

मुंबई, पुणे, बोरिवली, शिर्डी या लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी आणि सुखद व्हावा यासाठी परिवहन महामंडळाने वातानुकूलीत शिवशाही बस सेवा सुरू केली. शिवशाही या वातानुकूलित बस असल्याने प्रवाशांनी याला उत्तम प्रतिसाद दिला.

मात्र अशी ही मोठ्या दिमाखात सुरू झालेली वातानुकूलीत आणि आरामदायी शिवशाही बस सेवा, चर्चेत होती ती वेगळ्याच कारणामुळे. महामंडळाच्या दुर्लक्षामुळे ती अडचणीत येण्याची शक्यता आहे.

खाजगी शिवशाही बसच्या चालक आणि मालकांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गारेगार शिवशाहीपेक्षा लक्झरी बसचा प्रवास बरा, अशी म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आलेली आहे.

या बसेसवर महामंडळाचे कोणतेच नियंत्रण नसल्याची बाब समोर येताना दिसत आहे. या बसवरील चालक हा खासगी तर वाहक एसटी महामंडळाचा आहे.

शिवाय शिवशाही बस ह्या वातानुकूलित आणि आरामदायी असल्या तरी या बसने प्रवास करणाऱ्यांना कोणत्याच शासकीय सेवा मिळत नाहीत.

खासगी बस चालकांच्या मनमानीमुळे कार्यपद्धतीमुळे बस कधीच वेळेवर आगारात येत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. तर कधीकधी बसचालक मधूनच बस सोडून निघून जाण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.

या बसच्या अपघाताच्या बऱ्याच गंभीर घटनाही जिल्ह्यात झाल्या असून यामुळे प्रवाशांची विश्वासार्हता कमी होताना दिसत आहे. त्यामुळे महामंडाळाने वेळीच याची दखल घेत कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून झाली होती.

 

shivshahi-accident-inmarathi

 

मध्यंतरी गारगोटी येथील खासगी शिवशाही बसचालकांना गेल्या दोन महिन्याच्या काळात वेतन मिळाले नाही. गाड्या नादुरुस्त असल्याच्या कारणातून त्यांनी काम बंद आंदोलन केले होते.

परिणामी पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या ‘शिवशाही’च्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. खासगी कंपनी व महामंडळातील झालेल्या करारानुसार अचानक गाडी फेऱ्या रद्द झाल्याने संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शिवशाही एसटी बसेस रायगड एसटी विभागात सुरू झाल्यापासून, शिवशाही एसटी बसचे जिल्ह्यात पाच अपघात झाले.

दरम्यान, शिवशाही एसटी बसेसच्या बाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी आहेत. मुळात या शिवशाही एसटी बसेसवरील चालक हे प्रसन्न ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीचे चालक असल्याने, त्यांचा त्याच बसवरील एसटी महामंडळाच्या वाहकाबरोबर अपेक्षित समन्वय नसतो, त्याचा विपरीत परिणाम प्रवाशांना भोगावा लागत असे.

 

shivsahi_accident-inmarathi

 

शिवशाही एसटी बसचे चालक बसेस बेदरकारपणे चालवितात. याबाबत प्रवाशांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु त्याची दखल घेतली जात नाही, अशी तक्रार प्रवाशांनी यांनी केली आहे.

शिवशाही एसटी बसमध्ये उभ्याने प्रवास करणे अपेक्षित नाही तरी सुद्धा अतिरिक्त प्रवासी घेवून त्यांना उभ्याने प्रवास करण्यास भाग पाडले जाते, याबाबत आरक्षणासह बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तक्रारी केल्या तरी त्याची दखल घेतली जात नसल्याचे आढळून आले होते.

एकंदरीत वारंवार होणाऱ्या अपघाताच्या घटना पाहता शिवशाही बसेसबाबत लोकांचा रोष वाढत आहे. त्यामुळे वेळीच काही ठोस पावले उचलली नाही तर ही सुविधा असुविधेत बदलायला वेळ लागणार नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?