'छोट्या समस्या सोडवण्यासाठी रोजच्या वापरातील या गोष्टींचे 'असेही' उपयोग होऊ शकतात!

छोट्या समस्या सोडवण्यासाठी रोजच्या वापरातील या गोष्टींचे ‘असेही’ उपयोग होऊ शकतात!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

एक वेळ होती जेव्हा लोकांजवळ वेळ तर होता पण तेव्हा ते काही करू शकत नव्हते, आणि आज आपल्याकडे सर्व सोयी-सुविधा आहेत, पण वेळ नाही. कारण ह्या सोयी-सुविधा ज्या आधुनिकतेची देणं आहे त्याचं आधुनिकतेने आपल्याला खूप आणि खूप सार काम देखील दिलं आहे. आज आपल्याजवळ कितीही पैसा असेल तरी तो कमीच असतो.

मग आणखी पैसा कमविण्यासाठी आपण आणखी मेहेनत करतो आणि परिणामी आणखी बिझी होऊन जातो. ह्यासर्वांत आपण स्वतःकडे लक्ष देण कदाचित विसरूनच जातो.

आपल्या रोजच्या जीवनात अनेक समस्या येतात ज्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो तर कधी आपल्याला त्या एवढ्या महत्वाच्या वाटत नाही, तर कधी त्यासाठी खूप वेळ जाईल म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

पण आपल्याच घरात काही अश्या गोष्टी देखील आहत ज्याचा उपयोग करून आपण ह्या लहान लहान समस्यां सोडवू शकतो. जर ह्या काही सोप्या टिप्स तुम्हाला माहित झाल्या तर तुमच्या जीवनातील अनेक समस्या ह्या चुटकीसरशी सुटू शकतात.

१. वोडका :

 

vodka-foot-inmarathi
homehacks.co

वोडका. हो तोच वोडका, पण आम्ही तुम्हाला तो पिण्यास सांगणार नाही. तर ह्याचे आणखी काही फायदे सांगणार आहोत. जर तुमच्या पायाचा दुर्गंध येत असेल ज्यामुळे तुम्हाला इतरांमध्ये ऑक्वर्ड वाटत असेल, तर वोडका ह्यामध्ये तुमची मदत करू शकतो.

त्यासाठी एक कपडा वोडका मध्ये भिजवा आणि त्याने आपले पाय स्वच्छ करा. ह्याने लगेच तुमच्या पायाची दुर्गंधी दूर होईल. जर तुम्ही हे एक आठवडा कराल तर तुमच्या पायाची दुर्गंधी पूर्णपणे नाहीशी होऊन जाईल.

२. लाळ (सलाइव्हा) :

 

pimples-inmarathi
skincareorg.com

जर तुमच्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स असतील तर सकाळी दात घासायच्या आधी लाळ त्या पिंपल्सवर लावा. ह्या उपायाने एका दिवसात तुमचे पिंपल्स नाहीशे होतील.

३. बेकिंग सोडा आणि लिंबू :

 

baking soda and lemon-inmarathi
fitlife.tv

दात पिवळे असले की आपण चार चौघात व्यवस्थित हसू देखील शकत नाही. पण तुमच्या ह्या समस्येसाठी तुम्हाला डेंटिस्टकडे जायची गरज नाही. कारण ह्याचा उपाय देखील तुमच्या घरातच आहे. ते म्हणजे बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस. त्यासाठी एका वाटीत जरासा बेकिंग सोडा घ्या त्यात लिंबाचा रस घाला आणि ह्या मिश्रणाला एकत्रित करा. आता ह्या तयार झालेल्या पेस्ट ने दात घासा. पण हे रोज करू नये. आठवड्यातून एकदाच करा, ह्याने तुमचे दात पांढरेशुभ्र होऊन जातील.

४. क्रोसिन :

 

cricine-inmarathi
alibaba.com

क्रोसिन जी भारतातील सर्व घरात प्रामुख्याने उपलब्ध असते. डोकं दुखलं, सर्दी झाली, ताप आला की डॉक्टरकडे ज्याण्याआधी आपण क्रोसिनला प्राधिन्य देतो. पण हिच क्रोसिन तुमच्या आणखी कमी देखील येऊ शकते. जर तुम्हाला डँड्रफची समस्या असेल तर ही क्रोसिन तुमची खूप मदत करू शकते.

त्यासाठी गरज आहे ती क्रोसिनच्या दोन गोळ्यांची. क्रोसिनच्या दोन गोळ्या घ्या त्याची पावडर बनवा आणि त्याला आपल्या शाम्पूमध्ये मिसळावे. ह्यानंतर हे मिश्रण आपल्या केसांमध्ये लावा आणि ५ मिनिटांसाठी तसेच सोडून द्या. क्रोसिनमध्ये सॅलिसिलिक अॅसिड असते ज्यामुळे केसांतील डँड्रफ पूर्णपणे निघून जातो.

५. मोहरी तेल :

 

nails-circles-inmarathi
tiphero.com

मोहरीच तेल आपल्या आरोग्यासाठी खूप लाभकारक असतं. पण तसेच हे तुमच्या नखांसाठी देखील अतिशय फायद्याचं ठरू शकतं. लांब आणि मजबूत नखे सर्वच महिलांना आवडतात. पण अनेक महिलांना नखे न वाढण्याची समस्या असते. त्यासाठी आपल्या नखांवर रोज मोहरीच्या तेलाने मालिश करा. ह्याने तुमची नखे मजबूत होतील आणि लवकर वाढतील देखील.

६. चॉकलेट :

 

chocolate face pack-inmarathi
milionkobiet.pl

चॉकलेट कुणाला नाही आवडत. हे एक गोड असं औषध आहे जे आपल्याला तणावमुक्त करत. पण ह्याचं चॉकलेटनेतुमचा मुडच नाही तर चेहरा देखील छान होऊ शकतो. चॉकलेटने तुमची कोरडी त्वचा परत कोमल होऊ शकते. बस त्यासाठी तुम्हाला चॉकलेटमध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळायचे आहे. आणि हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा.

७. हँगओव्हर :

 

omelet bread-inmarathi
today.com

अंड आणि ब्रेड, हे एक पौष्टिक जेवण आहे. आणि हे तुमच्या हँगओव्हरवर एक सर्वात चांगला उपाय ठरू शकते. जर तुम्हाला आदल्या रात्रीच्या ओव्हरडोजमुळे डोकेदुखी होत असेल तर अंड आणि ब्रेड खा. ह्याने तुमचा हँगओव्हर लगेच गायब होऊन जाईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “छोट्या समस्या सोडवण्यासाठी रोजच्या वापरातील या गोष्टींचे ‘असेही’ उपयोग होऊ शकतात!

  • November 5, 2018 at 8:53 am
    Permalink

    chhan

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?