' आपलं अस्सल भारतीय RuPay कार्ड Visa आणि MasterCard पेक्षा लय भारी! – InMarathi

आपलं अस्सल भारतीय RuPay कार्ड Visa आणि MasterCard पेक्षा लय भारी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजकालच्या डिजिटल युगात आपण सगळे जण जास्तीत जास्त प्रमाणात आपले व्यवहार कॅशलेस करायचा प्रयत्न करतो.

ऑनलाइन खरेदीविक्री सुरु झाल्यापासून ऑनलाइन पेमेंटचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. यासाठी आपण क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करतो. पण तुम्ही कधी ही कार्ड्स लक्षपूर्वक पाहिली आहेत का?

ती कोणत्याही बँकेची असली तरीही त्यांच्यावर RuPay Card, Visa Card किंवा Master Card असे लिहिलेले असते. तुम्हाला या तीन मधील फरक माहीत आहे का?

किंवा यातलं कोणतं कार्ड कुठे वापरता येतं हे तुम्हाला ठाऊक आहे का? या सगळ्यांबद्दल या लेखात विस्ताराने जाणून घेऊयात.

 

Rupay-Cards-inmarathi

 

२० मार्च २०१२ रोजी भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळ (National Payments Corporation of India, NPCI) या संस्थेने RuPay Card चे उद्घाटन केले. देशात आर्थिक समावेशनाच्या पर्यायांना चालना मिळावी म्हणून सरकारने RuPay Card जाहीर केले.

RuPay हे भारताचे स्वदेशी नेटवर्क आहे जे व्हिसा, मास्टर कार्ड, डिस्कव्हर, डिनर क्लब आणि अमेरिकन एक्सप्रेस यांसारख्या आंतरराष्ट्रीय पेमेंट नेटवर्कसारखे विकसित केले गेले आहे.

सर्वांत पहिले जाणून घेऊयात की ATM Card म्हणजे काय?

 

atm cards-inmarathi

 

आधी लोक पैसे काढण्यासाठी बँकेत जात असत आणि लांबच लांब रांगांमध्ये उभे राहत असत. त्यातही त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असे.

या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन बँकेने ATM मशीन आणि ATM मधून पैसे काढण्यासाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वैध ठरविले. हे मिळविण्यासाठी बँकेत अर्ज करावा लागतो.

त्यामुळे आता लोकं बँकेत न जाता ATM मधून पैसे काढायला लागली आहेत. हे कार्ड एकाप्रकारे Payment Gateway Card आहे.

बँकेत तुम्ही ATM म्हणजेच डेबिट किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यावर बँक तुम्हाला ३ प्रकारच्या ATM कार्डचा पर्याय देते- RuPay Card, Visa Card किंवा Master Card.

 

प्लॅस्टिक मनी म्हणजे काय?

 

Credit-cards-inmarathi04

 

जेव्हा आपण रोखीने व्यवहार करण्याऐवजी वर सांगितल्यापैकी कोणत्याही प्रकारच्या ATM कार्डचा उपयोग व्यवहारासाठी करतो. तेव्हा त्या कार्ड्सनाच प्लॅस्टिक मनी असं म्हणतात आणि यांच्या साहाय्याने होणारे व्यवहार कॅशलेस म्हणून ओळखले जातात.

 

RuPay Card म्हणजे काय?

 

Rupay-Cards-inmarathi02

 

Rupay Card हे एक भारतीय स्वदेशी कार्ड आहे जे २०१२ मध्ये NPCI तर्फे जाहीर करण्यात आले होते.

 

रुपे कार्ड हे भारतीय डेबिट कार्ड आहे. मास्टरकार्ड आणि व्हिसाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी २०१२ साली हे संपूर्ण देशी ‘डेबिट कार्ड’ भारतीय बाजारात आले आहे.

रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेल्या ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ ने रुपे कार्ड या ब्रँड अंतर्गत हे कार्ड बाजारात आणले आहे.

हे कार्ड देखील तेच काम करते जे Visa Card किंवा Master Card करते. मात्र Master Card आणि Visa Card या अमेरिकन कंपन्या आहेत आणि त्यांचे कमीशन जास्त आहे. तर RuPay Card भारतीय कंपनी असल्यामुळे तिचे कमिशन कमी आहे.

हे ही वाचा – क्रेडिट कार्डचा “असा” केलेला स्मार्ट वापर लाखोंची बचत करु शकतो!

Visa Card आणि Master Card काय असते?

 

visa card-inmarathi

 

Visa Card आणि Master Card एक विदेशी payment gateway आहे जो जगातील अधिकांश देशांतील बँकांना आपल्या कार्डद्वारा payment gateway ची सुविधा प्रदान करतो. Master Card आणि Visa Card मध्ये काही खास अंतर नाही.

ही दोन्हीही एकसारखीच कार्ड आहेत आणि त्यांचे कार्यही जवळपास सारखेच आहे.

Visa किंवा Master Card ही आंतरराष्ट्रीय कार्ड असल्यामुळे यांच्या साहाय्याने जगभरात कुठेही पेमेंट करणं सोयीचं जातं.

वास्तविक पाहता Visa किंवा Master Card कोणाला क्रेडिट कार्ड देत नाहीत. हे दोन्हीही पेमेंट करण्याचे मार्ग आहेत.

या पेमेंटच्या मार्गाचा वापर करणारी क्रेडिट कार्ड इशू करण्यासाठी, विविध देशातील बँकांवर विश्वास ठेवतात. त्यामुळे रिवॉर्ड्स, वार्षिक शुल्क, आणि इतरही सर्व शुल्क तुमच्या बँकेद्वारा दिली जातात.

आता Rupay Card, Visa Card आणि Master Card मधील फरक जाणून घेऊया.

१. RuPay Card एक भारतीय स्वदेशी डेबिट कार्ड आहे तर Master Card किंवा Visa Card आंतरराष्ट्रीय प्रणालीची डेबिट कार्ड्स आहेत.

२. RuPay Card आणि Master Card किंवा Visa card मधील मुख्य फरक हा त्यांच्या ऑपरेटिंग कॉस्ट मधील आहे. RuPay Card हे स्वदेशी असल्यामुळे परदेशी अशा Master Card किंवा Visa डेबिट कार्ड च्या तुलनेत याची ऑपरेटिंग कॉस्ट खूप कमी आहे.

३. Master Card किंवा Visa ही एक अमेरिकन कंपनी आहे आणि जेव्हा आपण ही कार्ड्स वापरतो तेव्हा डेटा, प्रोसेसिंग आणि व्हेरिफिकेशनसाठी त्या कंपनीच्या सर्व्हरवर जातो ज्यामुळे प्रोसेसिंगची गती मंदावते.

याउलट RuPay card चा वापर केल्यास डेटा, प्रोसेसिंग आणि व्हेरिफिकेशनसाठी आपल्याच देशांतर्गत असतो त्यामुळे त्याचे प्रोसेसिंग जलद गतीने होते.

 

Rupay-Cards-inmarathi01

हे ही वाचा – जाणून घ्या पॅनकार्ड वरील नंबर मागचं लॉजिक!

टीप: वर सांगितल्याप्रमाणे स्वदेशी वापरासाठी RuPay card बनविण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा उपयोग Visa card किंवा Master Card सारखा आंतरराष्ट्रीय स्तरावर देवाणघेवाणीसाठी केला जाऊ शकत नाही.

४. बँकांना Visa डेबिट कार्ड किंवा Master Card सारख्या विदेशी पेमेंट नेटवर्क मध्ये सामील होण्यासाठी तिमाही शुल्क भरावे लागते. मात्र RuPay कार्ड बाबतीत असे करावे लागत नाही. कोणत्याही शुल्काशिवाय कोणतीही बँक RuPay नेटवर्क मध्ये सामील होऊ शकते.

५. RuPay कार्डचा उपयोग करण्यावर काही मर्यादा निश्चितच येतात. कारण हे ऑनलाइन व्यवहारांसाठी केवळ डेबिट कार्डच प्रदान करते. याउलट Visa किंवा Master Card डेबिट आणि क्रेडिट कार्ड असे दोन्हीही पर्याय उपलब्ध करुन देतात.

६. आंतरराष्ट्रीय कार्डाच्या तुलनेत पहायचे झाले तर RuPay कार्ड अधिक सुरक्षित आहे कारण त्याचा वापर फक्त भारतापुरता मर्यादित आहे. त्यामुळे याची माहिती केवळ national gateway दरम्यान शेअर केली जाते.

मात्र Visa डेबिट कार्ड किंवा Master Card चा उपयोग केल्याने ग्राहकांचा डेटा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोसेस्ड केला जातो. यामुळे डेटा चोरला जाण्याची शक्यता वाढते.

तर हे आहेत RuPay Card, Master Card आणि Visa Card मधील मूलभूत फरक.

यातील मुख्य फरक हा की RuPay Card एक भारतीय स्वदेशी डेबिट कार्ड आहे तर Visa card किंवा Master Card आंतरराष्ट्रीय प्रणालीतील डेबिट कार्डस् आहे.

RuPay Card स्वदेशी असल्याने त्याचा वापर मर्यादित आहे तर Visa किंवा Master Card ही विदेशी व्यवहारांमध्ये सुद्धा वापरता येऊ शकतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?