'ख्रिश्चन सिक्रेट लायब्ररी ते सापांचं बेट: या ९ ठिकाणी मनुष्यास प्रवेश बंदी आहे!

ख्रिश्चन सिक्रेट लायब्ररी ते सापांचं बेट: या ९ ठिकाणी मनुष्यास प्रवेश बंदी आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

अनेकांना पर्यटनाची आवड असते, त्यांना नेहेमी कुठल्या ना कुठल्या नव्या ठिकाणांचा फेरफटका मारायचा असतो. ह्यामध्ये जास्तकरून रहस्यमयी आणि साहसी ठिकाणांचा समावेश असतो.

त्याचप्रमाणे जगात अशी अनेक ठिकाणं आहेत जी खरंच खूप रहस्यमयी आहेत. पण तिथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही.

पण आता आपल्याला कुठे जायचं नाही किंवा काही करायचं नाही म्हटलं की त्याबाबतची उत्सुकता आणखीन वाढते. आज आम्ही आपल्याला अश्याच काही ठिकाणांची माहिती देणार आहोत ज्या पृथ्वीवर असून देखील सामान्य माणसाला तेथे जाण्यास सक्त मनाई आहे.

1. North sentinel island :

 

north sentinel island-inmarathi
timesofindia.indiatimes.com

 

North sentinel island हा आयलंड अतिशय सुंदर असून तो अंदमान आयलंड समूहापैकी एक आयलंड आहे. हे ‘बसेरा’ नावाच्या आदिवासी जमातीचे निवासस्थान आहे.

ह्या जमातीच्या लोकांना आपल्या ह्या वेगळ्या जगात इतर कुठल्याही लोकांचा हस्तक्षेप मान्य नाही. त्यामुळे जर कधी कोणी ह्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला तर हे लोक त्याला जीवानिशी मारून टाकतात. त्यामुळे चुकूनही ह्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नका.

2. Vatican secret archive :

 

Vatican secret archive-inmarathi
bbc.com

 

Vatican secret archive ही एक प्राचीन लायब्ररी आहे. येथे अनेक रहस्य दडलेले आहेत. येथे असं काही गुपितं लपलेलं आहे जे जाणून घेण्यासाठी लोकं खूप आतुर असतात.

जगभरातील रहस्यमयी गोष्टींचे उत्तर येथील पुस्तकांत असल्याचं मानले जाते. म्हणून ह्या ठिकाणी कुणालाही जाण्याची परवानगी नाही.

3. Snake island :

 

Snake island-inmarathi
lifeinsaudiarabia.net

 

स्नेक आयलंड म्हणजेच सापांचं आयलंड असलेले हे ठिकाण ब्राझील येथे आहे. ह्या आयलंडवर हजारोंच्या संख्येने ‘गोल्डन लांसहेड वाइपर’ नावाचे विषारी साप आहेत. हे ठिकाण एवढे भयानक आहे की येथील देखरेख ब्राझीलची नौसेना करते.

आणि जर तरीही कुठली व्यक्ती ह्या ठिकाणी जाण्यास यशस्वी ठरली तर ती कधीही जिवंत वापस येत नाही.

4. Area 51 :

 

area-51-inmarathi
thoseconspiracyguys.com

 

अमेरिकेचे प्रसिद्ध शहर लास वेगास येथील जवळपास ८० मैलाच्या अंतरावर असलेल्या ह्या ठिकाणी अमेरिकेचे अनेक रहस्य दडलेले आहेत.

ह्या ठिकाणाची देखरेख स्वतः अमेरिकी सरकार करते. ह्या ठिकाणाबाबत असा दावा केला जातो ह्या ठिकाणाचा संबंध एलियन्सशी आहे. एवढचं नाही तर येथे अनेक युएफओ उडताना देखील बघितले गेले आहे. त्यामुळे सामान्य माणसांना येथे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

5. Death valley :

 

Death valley-inmarathi
travel.mapquest.com

डेथ वॅली हे ठिकाण पूर्व कॅलिफोर्निया येथे असलेले एक वाळवंट आहे. हे जगातील सर्वात उष्ण ठिकाण मानले जाते. येथील तापमान १३० डिग्री असणे ही सामान्य बाब आहे. तसेच येथे कुठेही पाणी बघायला मिळत नाही.

म्हणून सामान्य माणसांना येथे जाण्यास मनाई आहे, कारण जर कोणी येथे गेलं तर ती व्यक्ती जिवंत परत येऊ शकत नाही.

6. Surtsey Island, Iceland :

 

SurtseyIsland_inmarathi
holidify

 

ज्वालामुखीच्या उद्रेकातून हे बेट निर्माण झाले असून हे जगातले नवीन आयलंड पैकी एक मानले जाते, सध्या तरी हे बेट सायंटिस्ट आणि भौगोलिक शास्त्रज्ञ यांच्यासाठीच खुले आहे, सामान्य मनुष्य वस्तीला इथे प्रवेश निषिद्ध आहे!

 

7. North Brother Island, USA :

 

 

Riverside_Hospital_North_Brother_Island_crop
wikipedia

 

हे आयलंड सुद्धा मनुष्य वस्तीसाठी निषिद्ध असून इथे एकेकाळी बर्ड सँक्च्युरी आणि ड्रग्स मुक्ती केंद्र होतं पण आता गे ठिकाण कायमच बंद केले आहे

8. Mezhgorye : 

 

Mezhgorye-inmarathi
Youtube

 

हे ठिकाण रशियाच्या गुप्त संशोधानासाठी ओळखले जाते. माहीच्या आधारे येथे रशियाचे गुप्त अणू मिसाईल केंद्र आहे. तसेच अशी माहिती आहे की रशिया सरकार येथे एक असे बंकर बनवित आहे ज्यावर अणू हल्ल्याचाही परिणाम होणार नाही.

हे ठिकाण रशियाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असल्या कारणाने येथे खूप चोख सुरक्षा असते आणि कुठल्याही सामान्य माणसाला येथे जाण्यास सक्त मनाई आहे.

9. Woomera :

 

Woomera-inmarathi
room.eu.com

 

Woomera हे १२४,००० वर्ग किलोमीटर एवढ्या क्षेत्रात पसरलेलं ऑस्ट्रेलियाचे लष्करी परीक्षण क्षेत्र आहे.

येथील माती बाबत एक दावा केला जातो की ह्या मातीत सोनं, लोखंड ह्यासारखे मौल्यवान धातू सापडतात. ह्या ठिकाणाची सुरक्षा करण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा येथे जमा करून ठेवला आहे.

भलेही ह्या ठिकाणांबाबत आपल्याला कुतूहल असले तरी देखील ह्या ठिकाणी जाणे म्हणजे आपला जीव धोक्यात घालणे आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?