' दारू उतरण्यासाठी कडक कॉफी प्यावी, खरं की खोटं? खास टिप्स...

दारू उतरण्यासाठी कडक कॉफी प्यावी, खरं की खोटं? खास टिप्स…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

दारु, मद्य, मदिरा… किती नावं घ्यावीत.

मात्र नाव कोणतंही घेतलं तरी त्याला असलेली नकारात्मकता कमी होत नाही.

दारु पिणं ही बाब आजही आपल्याकडे आज ही वर्ज्य मानली जाते. त्यामुळे घरच्यांपासून चोरून वगैरे मद्यपान करण्याची प्रथा आजही अविरत सुरु आहे! मग कधी पार्टीमध्ये वगैरे दारु जास्त झाली की चढलेली नशा उतरवण्यासाठी आपण काहीबाही शक्कल लढवतो.

दारू ही काही प्रमाणात शरीरासाठी गुणकारी असल्याचा उल्लेख वैद्यकशास्त्रात आढळतो, पण ती देखील योग्य वेळी, योग्य प्रमाणात घेतली तरचं तिचे फायदे दिसून येतात किंवा कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन वाईट हे ध्यानात ठेवूनच मद्याचे सेवन करावे!

अश्या या दारूबद्दल काही अफवा देखील समाजात पसरल्या आहेत. आणि या गैरसमजुती बरीच लोकं अगदी काटेकोरपणे पाळताना दिसतात या गैरसमजुतींचा शोध कोणी लावला याचंं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.

अश्याच काही मद्याशी संबंधित गैरसमजुती ज्या आपल्या आरोग्याला धोका किंवा हानी पोहोचवू शकतात त्यांच्याबद्दल आपण १० मुद्दे जाणून घेऊया!

 

rumours-about-alcohol-marathipizza01

 

१. दारूच्या आधी बियर प्यायल्याने माणसाला लवकर नशा चढते

 

beer inmarathi

 

खरं तर तुम्ही पहिली बियर पिता किंवा दारू पिता याने काहीही फरक पडत नाही. कोणत्याही प्रकाराचं अतिसेवन केलं की तुम्हाला चढणार हे निश्चित!

दारू किंवा बियर सहन करण्याची तुमची क्षमता संपली की तुमचं डोक गरगरायला लागणार, समोर काय घडतंय त्याकडे लक्ष लागणार नाही. एकंदर काय तुम्ही सरळ सातवे आसमान पर पोचणार!

 

२. फक्त बियर प्यायल्याने वजन वाढतं

 

rumours-about-alcohol-marathipizza03

 

बियर प्या आणि जिममध्ये जाऊन व्यायाम करा हा एक फॅशनेबल गैरसमज सध्याच्या तरुण पिढीमध्ये खूप फोफावतोय..

कोणतंही मद्य घ्या त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरिज असतात. त्यामुळे तुम्ही वाईन, वोडका, दारू, बियर जास्त प्रमाणात घेत असाल तर तुमच्या शरीरातील कॅलरीजमध्ये वाढ होणार आणि तुमच पोट सुटण्यास सुरुवात होणार!

त्यामुळे बियर ही उत्तमच हा गोड गैरसमज न करून घेतलेलाच बरा!

 

३. हँगओव्हर उतरवायचा असल्यास भरपूर कॉफी प्या

 

rumours-about-alcohol-marathipizza04

 

तुमचा हँगओव्हर म्हणजेच चढलेली नशा उतरवायची असेल तर शरीरातील मद्याचा प्रभाव कमी होणे अत्यावश्यक आहे. परंतु जेव्हा तुम्ही हँगओव्हर उतरवण्यासाठी कॉफी पिता तेव्हा शरीरातील मद्याचा प्रभाव कमी होण्याची प्रक्रिया संथ होते. त्यामुळे कॉफी प्यायल्याने काहीच फायदा होत नाही.

तुम्हाला हँगओव्हर उतरवायचा असेल तर गुपचूप झोपून राहा, किंवा साध्या पाण्यात लिंबू पिळून लेमन ज्यूस प्या. त्यामुळे डोक्यावरचा ताण थोडा कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि काही तासांनी हळूहळू मद्याचा प्रभाव कमी होईल आणि तुम्ही नॉर्मल व्हाल.

 

४. दारू प्यायल्याने मेंदूवर परिणाम होतो

 

rumours-about-alcohol-marathipizza05

दारू प्यायल्याने तुमची विचार करण्याची प्रक्रिया मंदावते हे खरं…पण त्यामुळे मेंदूवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. दारू तुमच्या मेंदूमधील नर्व्हस सिस्टमवर तात्पुरता प्रभाव करते जेथून आपला मेंदू हाताळला जातो,

त्यावर प्रभाव झाल्याने काही काळ आपण नशेत असतो. परंतु जसजसा मद्याचा प्रभाव कमी होतो, तसतशी नर्व्हस सिस्टम देखील पूर्वी सारखी कार्यरत होते.

 

५. दारू आणि एनर्जी ड्रिंक्स मिक्स करून प्यायल्याने लवकर नशा चढते

 

rumours-about-alcohol-marathipizza06

एनर्जी ड्रिंक्स मध्ये कॅफेन असतं, त्यामुळे तुम्ही दारू आणि एनर्जी ड्रिंक्स मिक्स करून जास्त प्रमाणत प्यायलात तर कॅफेनची नशा चढते. कॉफीमध्ये देखील कॅफेन असते. त्यामुळे हँगओव्हर उतरवण्यासाठी कॉफी पिल्याने काहीही फरक पडत नाही.

 

६. उलटी केल्याने नशा उतरते

 

rumours-about-alcohol-marathipizza07

 

उलटी केल्याने पोटातील दारू तुमच्या शरीराबाहेर पडते खरी, पण तुमच्या रक्तात मिसळलेली दारू मात्र बाहेर पडत नाही.

त्यामुळे उलटी केल्याने काही प्रमाणत डोक शांत होतं, परंतु पूर्ण नशा उतरण्यासाठी काही काळ जावा लागतो.

 

७. दारू पचवणारी व्यक्ती “नशीबवान” 

 

heavy drinking Inmarathi

 

तुम्ही प्रचंड दारू पित आहात आणि दारू पिऊन झाल्यावर तुम्हाला कसलाही त्रास होत नाही किंवा तुम्ही उलटी करून दारू बाहेर काढत नाही याचा अर्थ तुम्ही खूप मोठं काही अचिव्ह केलाय अशातली गोष्ट नाही,

दारूचा त्रास हा काही जणांना लगेच होतो तर काही जणांना कित्येक वर्षानंतर होतो!

त्यामुळे दारू पिऊन ती पचवणारी व्यक्ती ही वेगळी नाही हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे!

 

८. दारू पिण्याआधी भरपेट जेवल्याने दारू चढत नाही 

 

food before drinks inmarathi

 

ही तर अतिशय हास्यास्पद गैरसमजूत आहे कि दारू पिण्याआधी भरपेट जेवण केल्याने दारूचा प्रभाव हवा तसा होत नाही, उलट दारु पिण्याआधी किंवा दारू पितानासुद्धा अधिक खाल्ल्याने शरीराला अपायच होतो..

अपचन, ऍसिडिटी असे त्रास याच कारणामुळे होतात त्यामुळे कधीच दारू पिताना किंवा त्याआधी कधीच जास्त खाऊ नये!

 

९. दारू प्यायल्याने शांत झोप लागते 

 

sleepping drinking inmarathi

 

दारूचे सेवन केल्यामुळे तुमच्या नर्व्हस सिस्टीम वर थोडाफार परिणाम होतो, त्यामुळेच तुम्हाला इतर गोष्टी करायचे भान राहत नाही आणि त्यामुळेच गाढ झोप लागते, पण केवळ शांत आणि गाढ झोपेसाठी मद्य सेवन करणेही मुर्खपणाचे लक्षण आहे,

ती झोप ही तात्पुरती असून त्याचे अनेक साईड इफेक्ट्स नंतर दिसून येतात!

 

१०. दारूचे रोज सेवन करणाऱ्यांनाच मद्यपी म्हणतात 

 

drinks addict

 

आपल्याकडे रोज मद्य पिणाऱ्याना दारुडे किंवा तर्राट पार्टी असं सुद्धा गमतीने संबोधतात, पण फक्त रोज दारू सेवन करणाऱ्या लोकांनाच हे लेबल लावणं कितपत योग्य आहे, रोज प्या किंवा आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा प्या त्याला एक प्रकारचे व्यसनच म्हणतात!

तर अशी ही दारू आणि अश्या या दारूबद्दलच्या अफवा! तुमचे जे मित्र अशा निरर्थक उपायांचा आधार घेत असतील, त्यांच्यापर्यंत ही माहिती जरुर शेअर करा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?