' जिमला जाणारे बहुतांश लोक ह्या ८ चुका करतात, जाणून घ्या!

जिमला जाणारे बहुतांश लोक ह्या ८ चुका करतात, जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

जिमला जाणं चांगलं आहे कारण त्यामुळे शरीर सुदृढ राहतं आणि मन देखील प्रसन्न राहतं. आपल्यापैकी बरेचजण बॉडी बनवायची आहे म्हणून सुद्धा जिमला जात असतील.

जिमने बॉडी बनते परंतु त्यासाठी मेहनत देखील तितकीच घ्यावी लागते आणि आहारसुद्धा सकस असावा लागतो.

परंतु कधीकधी जिमचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो याचं कारण असतं – आपल्याकडून नकळत होणाऱ्या गंभीर चुका.

 

Man doing weight lifting in gym on black background.

स्रोत

आज आम्ही तुम्हाला अश्याच काही गोष्टी सांगणार आहोत ज्या जिमला जाणाऱ्या माणसाने कटाक्षाने टाळाव्यात.

म्हणजे जिमचा चांगलाच परिमाण तुम्हाला दिसून येईल.

१. जिमला जाण्यापूर्वी जास्त पाणी पिऊ नका…

 

gym-marathipizza02

स्रोत

हे खरं आहे की जिम करतेवेळी पाणी पिणे गरजेचे आहे. परंतु जिम करण्यापूर्वी लिटरभर पाणी जरी तुम्ही प्यायलात तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. उलट त्यामुळे तुम्हाला सुस्तपणा जाणवतो आणि लगेच थकवा येतो.

जिम करताना भरपूर घाम येतो. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. ही पातळी संतुलित ठेवण्यासाठी व्यायाम करत असतानाच थोड्या थोड्या वेळाने एकदम न पिता थोडे थोडे पाणी पिणे योग्य ठरते.

 

२. उपाशीपोटी जिम करू नका…

 

gym-marathipizza03

स्रोत

ज्याप्रमाणे गाडी चालवण्यासाठी इंधनाची गरज असते, अगदी त्याचप्रमाणे जिम करताना तुमच्या शरीराला उर्जेची आवश्यकता असते. जी तुम्हाला अन्नातून मिळते. म्हणूनच अगदीच उपाशीपोटी किंवा खुप वेळाच्या उपवासानंतर व्यायाम करू नये. त्याने अधिक थकवा जाणवण्याची प्रसंगी चक्कर वगैरे येण्याचीही शक्यता असते.

म्हणूनच व्यायामापूर्वी पोटात काहीतरी असावे. परंतु हा आहार देखील एकदम हलका असावा. जड अन्न खाऊ नये. शिवाय खाऊन लगेच व्यायाम न करता ते पचण्यास थोडा वेळ देऊन मग व्यायामास सुरुवात करावी.

३. झोपेचं खोबर करून जिम करू नका…

 

gym-marathipizza04

स्रोत

जिम करताना तुमचं मन आणि शरीर केंद्रित असणे गरजेचे आहे. त्यामुळे उगाचचं कमी झोप घेऊन जास्त वेळ जिम करू नका.

कमी झोपेमुळे तुमचं जिममध्ये लक्ष लागणार नाही आणि तुम्हाला लगेच थकवा जाणवेल. आणि रोजच जर झोप कमी होत असेल तर जिमने तुमचे आरोग्य सुधारण्या ऐवजी बिघडण्याचाच धोका जास्त असतो.

४. चहा-कॉफी पिऊन जिम करू नका…

 

gym-marathipizza05

स्रोत

जिमला जाण्यापूर्वी सुस्ती घालवावी म्हणून अनेकजण चहा-कॉफी घेतात, परंतु असे करणे शक्यतो टाळा. कारण त्यामुळे शरीरातील उष्णता झपाट्याने वाढते आणि शरीरातील उर्जा लवकर संपू शकते. परिणामी शरीर लवकर थकून जातं.

 

५. शरीराला प्रोटीन वा उर्जा देणारे पदार्थ जिम पूर्वी खाऊ नका…

 

gym-marathipizza06

स्रोत

जिमला जाण्यापूर्वी शरीर तयार करण्यासाठी अनेकजण प्रोटीन आणि फायबर देणारे पदार्थ खातात आणि लगेच जिम करतात. परंतु हे पदार्थ पचण्यास बराच कालावधी लागतो म्हणून प्रोटीन आणि फायबर देणारे पदार्थ खाल्यानंतर ते पचू द्याव्यात. नंतरच जिम सुरु करावी.

६. जिमला गेल्यावर वॉर्मिंग अप आणि स्ट्रेचिंग बिलकुल चुकवू नये…

 

gym-marathipizza07

स्रोत

अनेक जण वॉर्मिंग अप आणि स्ट्रेचिंग करायला कंटाळतात, पण असे करणे शरीरासाठी धोकायादक ठरू शकते म्हणून कोणताही व्यायाम सुरु करण्यापूर्वी किमान ५ मिनिटे वॉर्मिंग अप आणि स्ट्रेचिंग जरूर करावे. तसेच कोणताही व्यायाम प्रकार एकदम करू नये. सावकाश सुरुवात करून मगच त्यात वाढ करावी.

७. इतरांसारखे करायला जाऊ नका..

 

Handsome powerful athletic man performing push ups at the gym. Strong bodybuilder with perfect back, shoulders, biceps, triceps and chest.
4men.pt

जिम मधील दुसरे कुणीतरी ज्या प्रकारे व्यायाम करते, जे व्यायाम करते त्याची कॉपी करायला जाऊ नका. आधी ट्रेनरचा सल्ला घेऊनच मग काय करायचे ठरवा. कारण इतरांना जे जमते ते तुम्हाला जमेलच असे नाही. आणि त्याची तुमच्या शरीराला खरंच आवश्यकता आहे का याचाही विचार करायला हवा.

८. जास्तीचे वजन उचलण्याचा प्रयत्न…

 

gym-marathipizza01
madetopleasure.wordpress.com

काही दिवस व्यायाम केला की आपण अजून काय करू शकू याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. आपली ताकद किती वाढली हे ही जाणून घ्यावे वाटते. अशावेळी अजून किती जास्त वजन आपण उचलू शकतो हे तपासण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्यासाठी सरावापेक्षा कितीतरी जास्त वजन उचलण्याचा प्रयत्न होतो.

याने तुम्हाला कितीही आनंद होणार असला तरी त्यापेक्षा जास्त दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे उगाच स्वतःला अजमावून बघण्याच्या फंदात पडू नका.

आता पुढच्या वेळेस जिमला जाताना या गोष्टींचे जरूर पालन करा आणि शरीरावर होऊ शकणारे संभाव्य दुष्परिणाम टाळा…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “जिमला जाणारे बहुतांश लोक ह्या ८ चुका करतात, जाणून घ्या!

  • March 28, 2017 at 12:08 pm
    Permalink

    खूप छान..

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?