' युद्धासाठी शत्रुदेशाचे ढग चोरून नेले: हास्यास्पद आरोप की तांत्रिक झेप? – InMarathi

युद्धासाठी शत्रुदेशाचे ढग चोरून नेले: हास्यास्पद आरोप की तांत्रिक झेप?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजवर आपण चोरीच्या अनेक घटना एकल्या असतील वाचल्या असतील, पण आज आम्ही आपल्याला एका अश्या चोरीची कहाणी सांगणार आहोत जी एकूण तुमच्या भुवया नक्कीच उंचावतील.

 

clouds theft by israeli-inmarathi02
themanpost.com

आजवर आपल्याला केवळ अनमोल, महाग वस्तूंची चोरी होते एवढचं माहित होते. बॉलीवूड चित्रपटांमुळे प्रेमात हृदय देखील चोरी होऊ शकत हे सुद्धा आपण पचवलं होतं. पण ह्यावेळी तर चोरी करणाऱ्या चोराने कल्पकतेची पराकाष्ठाच गाठली आणि थेट ढग चोरून नेला. हो.. तुम्ही बरोबर वाचलं, ढग चोरीला गेला. एका देशाने आपल्या शेजारील देशावर ढग चोरल्याचा आरोप केला आहे. एवढचं नाही तर बर्फ देखील चोरी गेल्याचा दावा ह्या देशाने केला.

 

clouds theft by israeli-inmarathi
moroccoworldnews.com

अशक्य आणि तेवढीच विचित्र वाटणारी ही घटना इराण येथील आहे. इराणच्या एका ब्रिगेडियर जनरलने आपल्या शेजारील देश इज्राइलवर ढग आणि बर्फ चोरल्याचा आरोप केला आहे.

 

clouds theft by israeli-inmarathi06
presstv.com

आपल्याला नक्कीच हे विचित्र वाटत असेल पण इराणच्या ह्या ब्रिगेडियर जनरल साहेबांचे तर हेच म्हणणे आहे. इराणचे ब्रिगेडियर जनरल प्रमुख गुलाम रजा जलाली ह्यांनी इराणमध्ये होत असलेल्या जलवायू परिवर्तन बघता इज्राइलवर हा संशय दर्शविला आहे.

 

clouds theft by israeli-inmarathi05
epeak.in

रजा जलाली ह्यांच्या मते इतर देशांसोबतच इज्राइल देखील ह्याच प्रयत्नात आहे की इराणमध्ये पाऊस पडू नये. इराणमध्ये पडलेल्या दुष्काळामागे आणखी कोणी नसून इज्राइल असल्याचे रजा जलाली म्हणतात. तर तिकडे इज्राइल हवामान खात्याने हा आरोप फेटाळून लावला आहे.

 

clouds theft by israeli-inmarathi01
newsweek.com

अफगाणिस्तान आणि भूमध्य सागरादरम्यान २२०० मीटरचा पर्वतीय भाग संपूर्णपणे बर्फाने वेढलेला आहे. पण इराणमध्ये असे नाहीये. ह्याच मुद्द्यावर जलाली ह्यांनी प्रकाश टाकला.

 

clouds theft by israeli-inmarathi07
wikipedia.org

ढग चोरल्याची ही काही पहिलीच घटना नाहीये, तर ह्याआधी देखील २०११ साली इराणचे माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद ह्यांनी असा आरोप केला होता की, पश्चिमी देशांमुळे इराणमध्ये दुष्काळ आहे. त्यांनी सांगितले होते की, युरोपीय देश एक विशिष्ट प्रकारचं उपकरण तयार करत आहेत ज्याचा वापर करून ढगांना रोखून धरता येईल.

म्हणजे आता स्वच्छंद आकाशात वारा नेईल तिकडचा प्रवास करणारे हे ढग देखील सुरक्षित राहिलेले नाहीत असं म्हणावं का? एकीकडे हे आरोप होत असताना युध्द तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे का असा प्रश्न पडतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?