'धक्कादायक : चर्चिलच्या या प्लॅन समोर हिटलरचे अमानूष "गॅस चेम्बर्स" काहीच नाही

धक्कादायक : चर्चिलच्या या प्लॅन समोर हिटलरचे अमानूष “गॅस चेम्बर्स” काहीच नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

हिटलरच्या “गॅस” चेम्बर्सबद्दल बरेच लोक वाचून – ऐकून असतात.

विषारी वायूने शत्रूवर किंवा शत्रू राष्ट्रावर हल्ला करणे ही आता तशी सर्वज्ञात पद्धत झालीये.

दुस-या विश्वयुद्धाच्यावेळी ब्रिटनच्या पंतप्रधानाने अर्थात विन्स्टन चर्चिलने संपूर्ण जर्मनीला विषारी वायूत अक्षरशः बुडवून टाकण्याचा मानस त्याच्या मिलिटरी जनरल्सकडे व्यक्त केला होता.

होय, अविश्वसनीय आहे.

अज्ञात इतिहास हा धक्कादायकच असतो!

एका गुप्त युद्धकालीन मेमोरँडममध्ये चर्चिलने त्याच्या सल्लागारांकडे जर्मनीला संपूर्णतः विषारी वायूत “बुडवून” टाकण्याची इच्छा व्यक्त केली होती.

“अमेरिकन हेरिटेज” ह्या मॅगझिनच्या १९८५ सालच्या ऑगस्ट – सप्टेंबरच्या अंकात हा मेमो छापण्यात आला होता.

चर्चिलने हा मेमो १९४४ साली जुलै महिन्यात आपल्या चीफ ऑफ स्टाफ जनरल हेस्टिंग्स इस्मे ह्यास लिहिला होता.

 

charuchil-hitler-inmarathi
winstonchurchill.hillsdale.edu

 

ह्या चार पानाच्या मेमोत चर्चिल म्हणतो –

“ह्या विषारी वायूच्या प्रश्नाचा तुम्ही गांभीर्याने विचार करावा. इथे नैतिकतेचा विचार करणं मूर्खपणाचे ठरेल. यापुर्वी झालेल्या युद्धात सर्वांनी त्याचा निर्धास्तपणे उपयोग केलाय, तेव्हा नैतिकतेचे समर्थन करणारे तसेच चर्च यांनी कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही.”

“गेल्या युद्धात नागरी वस्ती असलेल्या शहरांवर बॉम्ब टाकणं हे निषिद्ध होतं, पण आता सगळेच एक युद्धनीती म्हणून ते करतातच ना!? जसं स्त्रिया आता मोठ्या स्कर्ट ऐवजी छोटा स्कर्ट वापरतात तसाच हादेखील एक फॅशनमधील बदलच आहे.”

 

chemical-weapons-inmarathi
bbc.com

 

किती असंवेदनशील वाक्य आहेत ही! फॅशनमधील बदल!?

पुढे चर्चिल म्हणाले

” तुम्ही थंड डोक्याने सगळा हिशोब करावा ( जर गॅसचा वापर केला तर होणाऱ्या खर्चाचा)…. आपण Ruhr आणि अजून शहरे संपूर्णतः विषारी गॅसमध्ये बुडवून टाकू शकतो, जेणेकरून तिथल्या नागरिकांना सतत वैद्यकीय देखभालीची गरज भासेल.

त्यानंतर काही आठवड्यांनी किंवा काही महिन्यांनी मी तुम्हाला संपूर्ण जर्मनीवर ह्या गॅसचा प्रयोग करायला सांगेन, आणि करतोय तर १००% करूया ना!

ह्या माझ्या प्रपोजलचा थंड डोक्याने विचार करण्यात यावा. फक्त गणवेश घातलेल्या, Psalm मधील गाणी ( बायबलकालीन पुस्तक Psalm….ह्यातील गाणी ख्रिस्ती आणि यहुदी लोक प्रार्थनेच्यावेळी गातात) गाणाऱ्या, हरलेल्या मनोवृत्तीच्या लोकांसाठी हे नाही, सारासार बुद्धी असलेल्या लोकांनी माझ्या प्रपोजलचा अभ्यास करावा.”

पण हे प्रपोजल प्रत्यक्षात कुणी स्वीकारलं नाही. असं काही झालं असतं तर १९२५ सालच्या जिनिव्हा प्रोटोकॉलचा भंग झाला असता.

ब्रिटनच्या मिलिटरी सल्लागारांच्या म्हणण्यानुसार चर्चिलच्या ह्या प्लॅननुसार युद्धविमाने जर जर्मनीच्या इंडस्ट्री आणि शहरांवर बॉम्ब टाकण्याऐवजी असलं काही करत बसली असती तर ह्यात ब्रिटनचं नुकसानच झालं असतं.

 

Sir_Winston_Churchill_inmarathi
theverge.com

 

जर्मनीने केलेल्या प्रतिहल्ल्यात ब्रिटनचं अतोनात नुकसान झालं असतं. चर्चिल ह्या “negative report” वर फारसा खुश नव्हता. पण तो एकाचवेळी चर्चच्या पास्टर आणि ब्रिटनचे सैन्य यांच्याविरोधात जाऊ शकत नव्हता.

अमेरिकन हेरिटेजमध्ये छापल्या गेलेल्या ह्या आर्टिकलमध्ये लेखक बार्टन जे.बर्नस्टन म्हणतात कि,

अमेरिकेच्या टॉपच्या मिलिटरी अधिकाऱ्यांनी जपानवर विषारी गॅसचा वापर करण्यात यावा अशी मागणी केली होती.

१९४३ साली मेजर जनरल विल्यम एन. पोर्टर आणि १९४५ साली मेजर जनरल जॉर्ज सी. मार्शल यांनी सुद्धा मिलिटरीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गॅसचा वापर अनुक्रमे जपानवर आणि पॅसिफिकवर करण्याची मागणी केली होती.

अमेरिकेतले प्रसिद्ध “द न्यू यॉर्क डेली न्यूज”ने जपानवर गॅसचा वापर व्हावा असं घोषित करून टाकलं होतं. तसेच वॉशिंग्टन टाइम्स – हेराल्डच्या मतानुसार जपानी लोकांना आपण गॅसमुळे व्यवस्थित शिजवू शकतो असं वाटत होतं.

पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ७५% अमेरिकन लोकांचा ह्याला विरोध होता!

नंतर जनरल मार्शल यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार ब्रिटनमुळे अमेरिकेने गॅसचा वापर केला नाही ….कारण जर्मनीने संपूर्ण युरोपात त्याचा वापर करणं सुरु केलं असतं.

 

ww1-inmarathi
youtube.com

 

युद्धादरम्यान अमेरिकेने १३५००० टन, जर्मनीने ७०००० टन, ब्रिटनने ४०००० टन आणि जपानने फक्त ७५०० टन रासायनिक युद्ध करण्यासाठीचे एजन्ट्स तयार केले होते.

जर्मनीकडे असणारे नर्व्ह गॅसेस हे अत्यंत धोकादायक होते.

Tabun, Sarin आणि Soman सारखे प्राणघातक गॅसेस असूनही त्याचा कधी वापर झाला नाही.

होय, त्यांचा कधीही कुठेही वापर झाल्याचा पुरावा नाही! आश्चर्य आहे कि नाही!?

मार्च-एप्रिल १९४५मध्ये जर्मनी हरण्याच्या बेतात असतांना सुद्धा जर्मनीने दिलेला शब्द पाळला आणि गॅसचा वापर नाही केला.

हिटलरने गॅसचा वापर करण्याला नकार दिल्याची नोंद आहे. त्याने स्वतः अंधत्व भोगलं होतं पहिल्या विश्व्युद्धाच्या वेळी! विषारी वायूमुळेच!

इथे हिटलरचं समर्थन नाही किंवा ब्रिटनचही समर्थन नाही…इतिहास हा जसा आहे तसा सांगण्याचा एक प्रयत्न! दुसरं काही नाही!

===

(अमेरिकन हेरिटेज ह्या मासिकात छापल्या गेलेल्या ह्या लेखाचे लेखक स्टॅनफर्ड विद्यापीठात इतिहास विषयाचे प्राध्यापक होते)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “धक्कादायक : चर्चिलच्या या प्लॅन समोर हिटलरचे अमानूष “गॅस चेम्बर्स” काहीच नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?