' एका पाकिस्तानी व्यक्तीने भारताचे केलेले कौतुक वाचून तुम्हाला नक्की अभिमान वाटेल – InMarathi

एका पाकिस्तानी व्यक्तीने भारताचे केलेले कौतुक वाचून तुम्हाला नक्की अभिमान वाटेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत – पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले. दोन्ही राष्ट्र अत्यंत वेगळ्या वातावरणात तयार झाले. दोन्ही राष्ट्रांची फाळणी होत असताना अनेक लोकांनी जीव गमावला होता. त्यानंतर लगेचच १९४८ साली काश्मिर प्रश्नावर भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं. तेव्हापासून ते आजपर्यंत भारत व पाकिस्तानात सतत संघर्ष होत असतो.

कधी सीमेवर तर कधी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत, सुरक्षा परिषदेत. ह्या संघर्षामुळे दोन्ही देशातील नागरिकांच्या मनात एकमेकांप्रति द्वेष भावना उदयास आली आहे.

मग ही द्वेष भावना अगदी हॉकी क्रिकेटच्या सामन्यात बघायला भेटते. पाकिस्तानात तर भारताकडून पराभव झाला तर लोक रागाच्या भरात टीव्ही सुद्धा फोडत असतात.

 

india pak relations inmarathi

 

परंतु हे सर्व असतांना देखील कधी कधी माणुसकीच्या नात्याने दोन्ही देशातले नागरिक एकमेकांना मदत करतात. अनेक लोक या पारंपरिक शत्रुत्वाला विसरून दोन्ही देशातील समान धाग्यांना शोधत असतात. या समान धाग्यातून एकमेकांशी मैत्री घट्ट करत असतात.

दोन्ही देशातील नागरिकांना एकमेकांच्या देशाचं कुतूहल असतं. विकासाच्या चक्रात भारताने खूप प्रगती केल्यामुळे व पाकिस्तान दहशतवादी कारवाया मुळे पोखरला गेला असल्यामुळे भारतीय नागरिकांपेक्षा पाकिस्तानी नागरिकांना भारताबद्दलचं कुतूहल जरा जास्तच असतं.

भारत पाकिस्तानला जोडणार माध्यम आहे कलाक्षेत्र, भारतात पाकिस्तानी संगीतकार लोकप्रिय आहेत तर पाकिस्तानात भारतीय चित्रपट क्षेत्र, अशे अनेक जोडणारे दुवे दोन्ही राष्ट्रात आहेत. असंच एकदा कोरा या प्रसिद्ध साईटवर एका व्यक्तीने पाकिस्तानी लोकांना भारताबद्दल काय वाटतं हा प्रश्न विचारला होता त्यावर Proud Pakistani नावाच्या वापरकर्त्याने पाकिस्तानी लोकांना भारताबद्दल काय वाटते हे मांडलं आहे.

 

qura inmarathi

त्याने म्हटलं की भारतातील वस्तू खूप मस्त असतात. त्यांचा वापर जगभर केला जातो. अगदी घरात घरात देखील आम्ही त्या वस्तू वापरतो. याबरोबरच भारतीय चित्रपट सृष्टीत पाकिस्तानी चित्रपट सृष्टीपेक्षा जास्त कल्पकता आहे. खरं सांगायचं झालं तर आमची चित्रपटसृष्टी भारतीय चित्रपटसृष्टीचे अनुकरण करते. परंतु आश्चर्य वाटतं की भारतीयांना दळभद्री चित्रपट बघायला का आवडतात? मला कळत नाही की भारतीय प्रेक्षक नवाजुद्दीन सिद्दीकी, रणदीप हुड्डा सारख्या अनेक चांगल्या कलाकारांकडे दुर्लक्ष का करतात? त्यांचाकडे हुमा कुरेशी पण आहे!

 

nawaz inmarathi

 

भारताची शिक्षण व्यवस्था ही पाकिस्तानच्या शिक्षण व्यवस्थेपेक्षा काही पट चांगली आहे. भारताचा साक्षरता दर दिवसेंदिवस वाढतो आहे. भारतीय विद्यापीठांना पाकिस्तानच्या तुलनेत उच्च मानांकन प्राप्त आहे. २०११ साली भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ८०% लोकसंख्या ही साक्षर होती.

 

indian-education-marathipizza

 

भारतातील एक साधारण मध्यमवर्गीय कुटुंब पाकिस्तानच्या मध्यमवर्गीय कुटुंबापेक्षा जास्त सुशिक्षित आहे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात पाकिस्तानच्या तुलनेत भारताने खूप प्रगती केली आहे. त्यांनी मंगळावर झेप घेतली आहे. भारतातील कृषितज्ज्ञ जरी सरकार विरोधात आंदोलन करत असले तरी भारताचं कृषी उत्पन्न हे जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

२०१३ साली भारत होर्तिकल्चर मध्ये जगात प्रथम क्रमांकावर होता. याबरोबरच भारतात जगातील सर्वोत्कृष्ट चहा उत्पादन होतं. म्हशीच्या दुधाचा भारत खूप मोठा उत्पादक आहे.

 

milk bags inmarathi
deccanchronicle.com

 

स्पोर्ट्स मध्ये देखील भारताला पाकिस्तानपेक्षा चांगल्या सुविधा आहेत आणि पाकिस्तानच्या तुलनेत जास्त खेळाडू तयार होतात. भारतासोबत आम्हाला कुठलंच युद्ध नको आहे. भारतीय यु ट्यूबर्स हे सर्वोत्तम आहेत. भारतीय टीव्ही चॅनेल्सने आमच्या टीव्ही स्क्रीनवर ताबा मिळवला आहे.

आज ३६० चॅनेल आमच्या टीव्हीवर चालतात, ज्यापैकी २०० चॅनेल्स भारतीय आहे. त्यांचा सिरियल्स इकडे लोक आवडीने बघतात. दोन्ही देशाचे लोक एकमेकांशी झालेल्या सामन्यात पराभव झाल्यावर टीव्हीची तोडफोड करतात. भारतीय लोकांचं हृदय हे सोन्यासारखं उजळ आहे.

 

indian cricket fans inmarathi
great lifezone

दिल्लीत भारतीय शिक्षक दोन अनाथ मुलांना शिकवण्याचा उपक्रम चालवतात. नुकताच भारतात परग्रही जीव देखील आढळला आहे. भारतातील विविधतेची तुलना होऊ शकत नाही. मग ती सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक, वर्णधारीत अथवा भौगोलिक असुदेत. प्रत्येक पाकिस्तानी भारताबद्दल द्वेष बाळगत नाही. प्रत्येक भारतीय पाकिस्तान बद्दल द्वेष बाळगत नाही.

पाकिस्तान अमर रहे भारत अमर रहे

PEACE

अश्याप्रकारे पाकिस्तानी युवकाने मांडलेल्या या मतावरून एक गोष्ट सिद्ध होतं की भारत व पाकिस्थानात एक नवी पिढी उदयास येत आहे. या पिढीला युद्ध नको तर संवाद हवा आहे. सांस्कृतिक देवाणघेवाण हवी आहे .

स्वतःची प्रगती हवी आहे. त्यासोबत राष्ट्राची प्रगती हवी आहे. भारत आणि पाकिस्तानात अश्या विचारसरणीचा उदय होत आहे ज्यामुळे दोन्ही देशात चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतील आणि शांततेचा मार्गाने दोन्ही वाद सुटू शकतील. फक्त दोन्ही देशांच्या राजकारण्यांचा स्वार्थ मध्ये नको यायला आणि दोन्ही देशांच्या युवकांच्या नवविचारांची देवाण घेवाण होण्यास सुरुवात झाली पाहिजे शेवटी शांततेतूनच समाधान आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?