' “छातीची साईज वाढव” असं सांगितलं गेलं होतं; दीपिकाचा धक्कादायक खुलासा… – InMarathi

“छातीची साईज वाढव” असं सांगितलं गेलं होतं; दीपिकाचा धक्कादायक खुलासा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलीवूडमधील तारे तारकांच्या वक्तव्यावरून कॉलेज कट्ट्यापासून ते कॉर्पोरेट ऑफिसमधील लंच ब्रेक नंतरच्या गप्पांपर्यंत प्रत्येक ठिकाणी चर्चा झडत असतात. त्यातले काही विषय चघळून सोडून देण्यासारखे असले तरी काही विषय गांभीर्याने घेण्यासारखे असतात.

बॉलीवूडमधील चित्रपट, त्यातील पात्रांची रचना या गोष्टी आपल्या सामाजिक व्यवस्थेशी साधर्म्य साधणाऱ्या असतात.

मर्द असण्याच्या आपल्या ठरलेल्या विशिष्ट परिभाषा, श्रीमंत असल्यानंतर करण्याच्या गोष्टी, सुंदर असण्याची परिमाणे या गोष्टी आपल्या रोजच्या जीवनावर नकळत प्रभाव टाकत असतात. सुंदर असलं म्हणजे कसं दिसलं पाहिजे हे ठरवण्यात बॉलीवूडचा मोठा वाटा आहे.

हे चुकीचे असले तरी असे आहे हे सत्य नाकारता येत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बॉलीवूडच्या अत्यंत सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दीपिका पदुकोन. अल्पावधीतच आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर चित्रपट क्षेत्रात जम बसवत तिने आपली जागा निर्माण केली. पण हे करणे इतके सोपे नव्हते असं ती स्वतः सांगते.

 

bipasha-basu-and-deepika

 

सौंदर्याचे ठोकताळे पाळत आलेल्या चित्रपट क्षेत्रात त्या ठोकताळ्यात बसण्यासाठी तिला काय काय करण्यास सांगण्यात आले याबद्दल तिने काही दिवसांपूर्वी गौप्यस्फोट केला होता.

ते वर्ष तसं तिच्या आयुष्यात एकदम खास होतं. तिचा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर होता. आत्तापर्यंत थोड्याफार जाहिराती, मॉडेलिंगचे रॅम्पवॉक, गाण्यांचे अल्बम सोडले तर ती कुठेही जास्त चमकली नव्हती. स्वत:चं घर सोडून फक्त तिच्या आई वडिलांच्या शुभेच्छासह ती मुंबई मध्ये आलेली होती.

मायानगरी मध्ये तिच्यासारख्या अनेक सुंदर अप्सरा तिच्या अवतीभवती तिला दिसायच्या. त्यांच्या गर्दीचा ती एक भाग बनून गेली होती. असं गर्दीचा भाग बनून कुठपर्यंत राहणार?

आपलं स्वप्न पूर्ण होणार की नाही? आपल्याला ब्रेक मिळणार की नाही असे प्रत्येक छोट्या तारकेच्या मनात पडणारे प्रश्न तिच्याही मनात निर्माण व्हायचे.

इंडस्ट्री तशी बायकांच्या बाबतीत फार चांगली होती अशातला भाग नव्हता. रोज नवनवीन अनुभव गोळा करत तिची वाटचाल सुरु होती, उंची, लहान वय आणि रूप तिच्या बाजूने होतं.

 

dipika-inmarathi

 

अशातच नवीन साल उजाडलं. तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. त्या वर्षीचा तो blockbuster cinema ठरला. Box office वर तुफान चालला आणि मॉडेल दीपिकाची अॅक्ट्रेस दीपिका पदुकोन जन्माला आली.

ते साल होतं २००७ आणि तो चित्रपट होता ‘ओम शांती ओम’.

आज जर पाहायचं झालं तर दीपिका आज युथ आयकॉन आहे. सोशल मीडियावर तिचे हजारो लाखो फॉलोअर्स आहेत.

ओम शांती ओम पासून सुरु झालेला प्रवास नैना तलवार, रामलीलेची लीला, पिकू मधील पिकू बॅनर्जी, तमाशा मधील तारा माहेश्वरी, बाजीराव मस्तानी मधील मस्तानी ते आताच्या पद्मावत मधील राणी पद्मावती इथपर्यंतचा दीपिकाचा प्रवास प्रेरणादायी आहे.

स्वतःच्या अभिनयात तिने केलेल्या सुधारणा आणि एक स्वतंत्र प्रतिभेची अभिनेत्री म्हणून स्वत:ला पुरुषप्रधान बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये स्वत:च मिळवलेलं स्थान यामुळे ती गर्दीत वेगळी उठून दिसते.

 

dipika-padukon-inmarathi

 

दीपिकाने आपल्या पहिल्या चित्रपटातच यशाची चव चाखली. त्यानंतर तिने कधी मागं वळून पाहिलं नाही. एक एक यशाची शिखरे ती काबीज करत गेली. आज इतक्या वर्षानंतर मागे वळून पाहताना तिला आपले सुरुवातीचे दिवस आणि त्या दिवसातला संघर्ष यांची जाणीव आहे.

दीपिकाने बॉलीवूड मध्ये येणाऱ्या नवख्या मुलींना कशा प्रकारची वागणूक दिली जाते याबाबत अनेकदा आपले मत मांडले होते.

जसा जसा काळ जातोय तसा तसा ह्या प्रचंड प्रमाणात पैसा खेचणाऱ्या मनोरंजन व्यवसायात काहीतरी भयंकर चुकीचे पायंडेही पडत चालले आहेत.

स्वत:ला झिरो फिगर पर्यंत आणण्यासाठी सर्जरीच कर, botox चे shot मारून घे, सिलिकॉननी ओठ मोठे कर, शरीर उठावदार दिसण्यासाठी अवयवांमध्ये सिलिकॉन भर, नैसर्गिकरीत्या असलेला चेहरा सर्जिकल करेक्शन करून बोजड झाल्यावर तो लपवण्यासाठी हेवी मेकअपचे रोगट फास आणि त्यानंतर कॅमेऱ्या समोर उभ राहा हा ट्रेंड प्रत्येक जण न चुकता अनुसरणात आणतोय.

हे ही वाचा – चतुरचं “चमत्कार”वालं भाषण ते दीपिकाचं “एक चुटकी सिंदूर” : चित्रपट दृष्यामागील अफलातून कथा!

नवीन असल्यामुळे या व्यवसायात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या शरीरात बदल करून घ्यावे यासाठी त्यांच्यावर दबाव देखील टाकला जातो. दीपिकावर देखील असे दबाव सुरुवातीच्या काळात टाकण्यात आले.

“मला जर या चित्रपट सृष्टीमध्ये टिकायचे असेल तर मी माझ्या ओठांमध्ये सिलिकॉन भरले पाहिजे तसेच माझी फिगर अजून उठावदार करण्यासाठी मी माझ्या स्तनांची सुद्धा सर्जरी करून घेतली पाहिजे या गोष्टींसाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता”

अशी कबुली दीपिकाने दिली होती.

 

dipika-speaking-inmarathi

 

दीपिकाला या क्षेत्रात येण्यासाठी खास अशी कुठली पार्श्वभूमी नव्हती त्यामुळे तू कुठल्यातरी सौंदर्य स्पर्धेत भाग घे तरच तुझ्याकडे बॉलीवूडच्या दिग्दर्शक मंडळींचे लक्ष जाईल असे अनेक अनाहूत सल्ले तिने करिअरच्या सुरुवातीला पचवलेत.

सगळीकडून नकारात्मक स्वरूपाचे हल्ले सुरु असतानाही दीपिकाने आपली उर्जा आणि संघर्षामध्ये टिकून राहण्याची इच्छाशक्ती ठेवली. लोकांचे सल्ले न ऐकता मी माझ्या स्वत:वर विश्वास ठेवला आणि जिथपर्यंत मला पोहोचायचं होत तिथपर्यंत मी पोहोचले असे ती सांगते.

बॉलीवूड च्या चकचकीत दुनियेत जेव्हा लाखो चेहरे आपले नशीब आजमावण्यासाठी येतात आणि रुपेरी झगमगाटाच्या अंधारात हरवून जातात तिथे कुणीही गॉडफादर नसताना दीपिकाने घेतलेली झेप निश्चितच कौतुकास्पद आहे.

 

हे ही वाचा – चित्रपटाला “सेन्सॉर बोर्ड”चं सर्टिफिकेट मिळण्याचे निकष काय असतात? जाणून घ्या..

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?