' GST मुळे वस्तूंच्या किमतीवर फरक कसा पडेल? (GST वर बोलू काही – भाग ६) – InMarathi

GST मुळे वस्तूंच्या किमतीवर फरक कसा पडेल? (GST वर बोलू काही – भाग ६)

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आधीचा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

आज आपण बघू GST आल्यावर वस्तू आणि सेवांच्या किंमतीवर नक्की कसा फरक पडेल. हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघूया. या उदाहरणात आपण GSTपूर्वीची आणि GSTनंतरची प्रणाली कशी असेल हे समजून घेणार आहोत. हे बघताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की वास्तवात होणारे व्यवहार उदाहरणात दिले आहेत तितके साधे सरळ होत नाहीत. पण कन्सेप्ट समजून घेण्यासाठी उदाहरण सरळ सोपं घेतलं आहे.

सुरुवातीला आपण बघू की वस्तूंच्या किंमतीवर GSTचा कसा परिणाम होईल.

समजा एक वस्तू Manufacturer-Wholesaler-Retailer-Consumer अशा चेनमधून वितरीत होते. सोपेपणासाठी असं मानू की हे चौघेही एकाच राज्यात, म्हणजे महाराष्ट्रात राहणारे आहेत. यातला प्रत्येक विक्रेता त्याच्या costच्या २०% रक्कम नफा म्हणून घेतो.

GSTपूर्वीच्या सिस्टीममधे नेमकं काय होतं ते आपण आपल्या सिरीजच्या भाग-३ मधे बघितलं आहेच. पण आता परत बघू.

gst-table-3-marathipizza

  • उत्पादकाला वस्तू तयार करायला ८३.३३ रुपये खर्च येतो. त्यावर २०%ने १६.६७ रुपये नफा घेऊन तो ही वस्तू १०० रुपयांना विकतो. यावर त्याला १०%ने १० रुपये उत्पादन शुल्क(Excise Duty) भरावे लागते. १०० रुपये विक्री किंमत + १० रुपये उत्पादन शुल्क असं मिळून झालेल्या ११० रुपयांवर त्याला VAT भरावा लागतो. (tax वर tax यालाच cascading effect of tax म्हणतात. भाग ३ व भाग ५ मधे या मुद्द्यावर चर्चा झाली आहे.)  १०% दराने VAT येतो ११ रुपये ! अशा पद्धतीने त्याचं बिल होतं १००+१०+११ = १२१ रुपयांचं !
  • ही वस्तू जेव्हा wholesalerच्या हातात पडते तेव्हा त्याची cost १०० रुपये न राहता ११० रुपये होईल कारण त्याला उत्पादकाने बिलात लावलेल्या १० रुपये उत्पादन शुल्काचं input tax credit मिळत नाही; ती त्याची cost होते. याउलट खरेदीवर भरलेल्या VATचं input tax credit मिळत असल्यामुळे खरेदीवर भरलेला VAT ही cost होणार नाही. (भाग ३ मधे हा मुद्दा स्पष्ट केला आहे.) त्यामुळे wholesaler त्याच्या ११० रुपये cost वर २०% ने नफा घेईल आणि त्यावर १०%ने VAT लावून १४५.१९ रुपयांना ती वस्तू पुढे विकेल.
  • Retailerला VAT चं credit मिळत असल्यामुळे त्याच्यासाठी cost १४५.१९ न राहता फक्त १३१.९९ इतकीच येईल. १३१.९९ रुपये cost + २०% ने २६.४०रुपये नफा असं धरून विक्री किंमत होईल १५८.३९ रुपये. यावर १०% ने VAT लावून अंतिम ग्राहकाला वस्तू विकताना त्याची किंमत होईल १७४.२३ रुपये !

आता GSTप्रणाली आल्यावर काय होतंय बघूया.

gst-table-4-marathipizza

  • उत्पादक त्याच्या १०० रुपये विक्री किंमतीवर १०% ने Central GST (CGST) आणि १०%ने State GST (SGST) लावेल. इथे एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा. पूर्वीच्या सिस्टीममधे Excise धरून आलेल्या किंमतीवर VAT लावावा लागायचा. पण GSTप्रणालीमधे CGST आणि SGST हे दोन्ही कर मूळ किंमतीवर, म्हणजेच १०० रुपयांवर लागले आहेत. म्हणजेच tax वर tax ही पद्धत GSTमधे लागू होत नाही. हा अत्यंत महत्वाचा बदल आहे.

 

  • अजून एक महत्वाचा बदल म्हणजे GSTमधे SGST आणि CGST या दोन्हींचं input tax credit वितरणाच्या साखळीमधल्या सगळ्यांना मिळतं. त्यामुळे SGST आणि CGST ही माझी cost होत नाही. त्यामुळे wholesaler साठी फक्त १०० रुपयेच राहते, जी GSTच्या पूर्वीच्या प्रणालीमधे ११० रुपये होत होती. माझी cost कमी झाल्यामुळे माझी विक्री किंमत आपोआप कमी होते. Wholesaler परत त्याच्या बिलात SGST आणि CGST लावून ती वस्तू पुढे १४३.९९ रुपयांना विकेल.

 

  • पुढे Retailer साठी सुद्धा SGST आणि CGSTचं input tax credit मिळत असल्यामुळे त्याची cost १४३.९९ न राहता ती फक्त १२० रुपयेच राहिल, जी GSTच्या पूर्वीच्या प्रणालीमधे १३१.९९ रुपये होत होती. Retailer त्याचं २०% profit margin + SGST आणि CGST लावून अंतिम ग्राहकाला वस्तू विकताना १७२.७९ रुपयांना विकेल.

हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. GSTनसताना जी वस्तू अंतिम ग्राहकाला १७४.२३ रुपयांना खरेदी करावी लागत होती तीच आता GST आल्यानंतर १७२.७९ रुपयांना मिळणार आहे. म्हणजेच वस्तूची किंमत कमी झाली.

पण याचवेळी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात येते. वरच्या दोन्ही टेबल्सच्या तळातली आकडेमोड बघा. GSTच्या आधीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारला मिळून २५.८४ रुपये रेव्हेन्यू मिळत होता तोच GST प्रणाली आल्यावर २८.८० रुपये होणार आहे.

याचा अर्थ काय? GSTआल्यावर एका बाजूने वस्तूच्या किंमती कमी होताना सरकारचा रेव्हेन्यू मात्र वाढतो आहे. GST आल्यावर देशाचं GDP २% ने वाढेल असा अंदाज आहे.

सेवांच्या बाबतीत मात्र GSTचा उलटा परिणाम दिसून येईल. GSTमुळे वस्तू जरी स्वस्त होणार असल्या तरी सेवा मात्र महागणार आहेत. कसं ते हे टेबल बघितल्यावर लगेच लक्षात येईल. सेवांवर सध्या फक्त एकच Service Tax लागतो त्याऐवजी आता CGST आणि SGST असे दोन्ही कर लागतील. त्याचा दर १८% असेल असा अंदाज.

gst-table-5-marathipizza

ढोबळमानाने निष्कर्ष काढायचा झाला तर असा काढता येईल की GSTमुळे वस्तूंच्या किंमती कमी व्हायला मदत होईल मात्र त्याच वेळी सेवा मात्र महाग होण्याची शक्यता आहे.

आपला पुढचा भाग असेल “खरोखरच GST हा One Nation One Tax आहे का?” या विषयावर! आपल्या पुढच्या लेखाने आपण या सिरीजची सांगता करू.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?