' ‘या’ कारणामुळे रेल्वे इंजिन कधीच बंद केले जात नाही – वाचा अर्थपूर्ण उत्तर! – InMarathi

‘या’ कारणामुळे रेल्वे इंजिन कधीच बंद केले जात नाही – वाचा अर्थपूर्ण उत्तर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

“गाडी बुला रही है, सिटी बजा रही है” हे सुप्रसिद्ध गाणं आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल.

हिंदी आणि मराठी चित्रपटामध्ये आगगाडीमध्ये बसून चित्रित केलेली अथवा आगगाडीवर तयार केलेली बरीच गाणी अथवा प्रसंग आहेत.

अनेक संगीतकारांनी आगगाडीच्या येणाऱ्या आवाजाचा देखील आपल्या संगीतामध्ये खुबीने वापर करून घेतलेला आहे.

अनेक वर्ष आगगाडी, तिचे स्टेशनवर आगमन होताना दुरूनच तिचा येणारा आवाज, तिच्या धुराड्यातून निघणारा धूर, ती स्टेशनवर थांबल्या नंतर चाकांखालुन येणारा फस्सस्स्स असा आवाज हे चित्र सर्वाना परिचित आहे.

 

security of train.marathipizza
dubeat.com

 

बहुतांशी अशा स्वरूपाचे वर्णन असणाऱ्या आगगाड्या अथवा रेल्वे या डीझेलवर चालणाऱ्या असतात. याबाबत एक रंजक माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कधी विचार केलाय ज्यावेळी डीझेल वर चालणारी रेल्वे स्थानकात येवून थांबते त्यावेळी तिचे इंजिन बंद न ठेवता चालूच ठेवलेले असतात. ते दीर्घकाळ पर्यंत चालू ठेवण्यात येतात.

असं होत नाही की हे इंजिन कायमस्वरूपी चालूच ठेवले जातात मात्र गाडी थांबल्यानंतरही डीझेलवर चालणाऱ्या रेल्वेचे इंजिन बराच काळ चालू राहिलेले असतात. कधी विचार केलाय या मागचं कारण काय असतं ते?

 

railway engine inmarathi

 

रेल्वेचे ब्रेक सैल होण्याचं महत्वाचं कारण असतं त्याला लागलेली गळती. अनेकदा आपण रेल्वे स्टेशनवर थांबल्या नंतर रेल्वेच्या खालून येणारे आवाज ऐकतो.

जर समजा लगेच इंजिन बंद केलं आणि करून ठेवलं तर पुन्हा रेल्वे चालू होण्यासाठी आणि ती रेल्वेच्या रुळावरून सुरळीत धावण्यासाठी खूप जास्त वेळ खर्ची पडतो.

रेल्वेरुळावरून रेल्वे नीट धावण्यासाठी जे समतोल ब्रेक नियंत्रण दाब लागतो तो मिळवण्यासाठी रेल्वेचे इंजिन रेल्वे थांबली तरी धडधडत ठेवणे आवश्यक असते.

जर ते तसं नाही ठेवलं तर रेल्वेचे ब्रेक सैल होवून रेल्वे रुळावरून घसरण्याचा संभव असतो.

 

break-train-inmarathi
dreamstime.com

 

दुसरं महत्वाचं कारण म्हणजे वेळ आणि ऊर्जेचा अपव्यय.

रेल्वेचा आकार आणि तिचं वजन बघता रेल्वेचे इंजिन देखील आकाराने आणि वजनाने विशालकाय असते.

एकदा इंजिन बंद केले तर ते चालू होण्यासाठी किमान २० ते २५ मिनिटाचा अवधी घेते.

रेल्वे प्रत्येक स्टेशनवर जेव्हा थांबते त्यावेळी प्रत्येक वेळी इंजिन जर बंद केले तर पुन्हा चालू करण्यासाठी किती मोठा वेळेचा अपव्यय आणि प्रवाशाची गैरसोय होवू शकते हे तुमच्या लक्षात येईल.

रेल्वेचे जे डीझेल इंजिन असते ते १६ सिलिंडरनी मिळून बनलेले एक मोठे युनिट असते. पेट्रोल गाड्यांसाठी जसा बाहेरून चालू करता येण्याजोगा स्पार्क प्लग दिलेला असतो तसा तो या इंजिनला चालू करण्यासाठी नसतो.

अशा गाड्यांचे इंजिन आतमध्ये असलेल्या कम्प्रेशन प्लगवर चालतात.

 

engine inmarathi

 

याचा अर्थ असे इंजिन चालू होण्यासाठी इंजिनच्या आत भरलेल्या इंधनाचा जाळ होवून योग्य तो हवेचा दाब निर्माण करावा लागतो.

त्यानंतरच असे इंजिन आणि पर्यायाने रेल्वे चालू होवू शकते. हे काम तसे अत्यंत अवघड असल्याने खूप हुशारीने करावे लागते.

याबाबत अजून एक मनोरंजक बाब म्हणजे –

ज्यावेळी रेल्वेचे इंजिन रेल्वे एका जागी थांबवून बंद न ठेवता चालू स्थितीत ठेवलेली असतात त्यावेळी खर तर असे धडधड करणारे इंजिन इंधन जास्त प्रमाणात खातात.

रेल्वे एका जागी उभी असते त्यामुळे इंजिनची बॅटरी चार्ज होत राहते. आणि आतला हवेचा दाब आपले इंधन ज्वलनाचे कार्य करीत राहतो.

याला उपाय म्हणून आजकाल हर एका डीझेल इंजिन च्या रेल्वेगाड्या मध्ये Auxillary Power Unit (APU) बसवलेले असते.

 

engine-inmarathi
youtube.com

 

याचा उपयोग प्रामुख्याने ज्यावेळी गाडी बंद असताना सुद्धा, जेव्हा इंजिन धडधडत असते, त्यावेळी वाया जाणारे इंधन वाचवावे म्हणून करतात.

खरं तर ही APU ची व्यवस्था हर एका यांत्रिक वाहनामध्ये इंधनाची बचत करण्यासाठी केली जाते. अगदी विमानांमध्ये सुद्धा ह्या सिस्टीमचा उपयोग उर्जा बचतीसाठी केला जातो.

आजकाल खरे पाहता विजेवर धावणाऱ्या रेल्वेगाड्या आपण जास्त पाहतो. डीझेल इंजिनवाल्या गाड्या सांभाळणे हे तसे पांढरा हत्ती पोसण्यासारखे खर्चिक आणि जिकीरीचे काम आहे.

इंधनाच्या किमती सतत वाढत असल्यामुळे आणि त्याच्या देखभालीचा खर्च जास्त येत असल्यामुळे शक्यतो अशा गाड्या वापरातून काढून टाकण्यावर जास्त भर दिला जात आहे.

ती वेळ कदाचित दूर नाही – जेव्हा शिट्टी वाजवणारी, झुक झुक असा सुरात आवाज करणारी, धुरांच्या रेषा हवेत काढणारी आगगाडी इतिहासजमा होवून केवळ कथा कवितेमध्ये शिल्लक राहिल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?