' ‘कम बोलो पर काम करो’, या उक्तीस खऱ्या अर्थाने सार्थ ठरवणारे…! – InMarathi

‘कम बोलो पर काम करो’, या उक्तीस खऱ्या अर्थाने सार्थ ठरवणारे…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतात स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आजपर्यंत अनेक पंतप्रधानांचा कार्यकाल पहिला आहे. याच्यामध्ये पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी अशा दैदिप्यमान नेत्यांची कारकीर्द भारताने पहिली ज्यांनी देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवले.

१९४७ ला पाकिस्तानच्या निर्मितीचा निर्णय असो, लालबहादूर शास्त्री यांच्या काळात झालेला ताश्कंद करार असो, इंदिरा गांधी यांच्या कालखंडात झालेला बँकांचा राष्ट्रियीकरणाचा निर्णय असो, अटलबिहारी वाजपेयी यांच्या कालखंडात झालेली अमेरिकेच्या ही तोंडचे पाणी पळवणारी अणुस्फोट चाचणी असो, जर लक्षात घ्यायचे झाले तर हर एका पंतप्रधानाने देशासाठी काही निर्णय असे घेतले ज्याचे दूरगामी परिणाम या देशावर झालेत.

या सगळ्यामध्ये भारताचा आत्तापर्यंत चा सगळ्यात श्रेष्ठ पंतप्रधान कोण असा प्रश्न विचारला गेला तर या प्रश्नाचं उत्तर देणं तसं अवघड आहे.

 

prime-ministers-india-inmarathi

हे ही वाचा – चहावाल्याने पंतप्रधानांकडे अशी “विचित्र” मागणी का बरं केली? जाणून घ्या…

पण या प्रश्नाचं अभ्यासपूर्ण उत्तर सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि माजी आयपीएस अधिकारी अशोक धामेजा यांनी दिलं आहे.

ते म्हणतात, “ते पंतप्रधान असे आहेत ज्यांना त्यांनी भारताच्या बाबतीत जे काही दूरदृष्टी ठेवून निर्णय घेतले त्याचं श्रेय मिळालं नाही. मिळालं नाही म्हणण्यापेक्षा त्यांच्या निर्णयक्षमतेवर ज्या सुधारणा झाल्या त्यांची दखल तर भारतासह साऱ्या जगाने घेतली मात्र त्यांची कारकीर्द तशी झाकोळलेलीच राहिली. ते पंतप्रधान होते पी. व्ही. नरसिंह राव!

पी. व्ही नरसिंह राव एक स्वातंत्र्य सेनानी होते ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्याचा त्यांचा कार्यकाल गाजलेला राहिला. आन्ध्रामध्ये जमीनविषयक कायद्यांमधील सुधारणा हे त्यांच्या कामाचे फलित आहे.

१९९१ साली खरंतर नरसिंहराव बऱ्यापैकी राजकारणातून निवृत्त जरी झाले नसले तरी राजकारणात सक्रीय नव्हते. राजीव गांधींची हत्त्या झाली आणि नरसिंह राव यांना राजकारणात सक्रीय व्हावे लागले. १९९१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेस बहुमताने निवडून आली आणि स्वातंत्र्योत्तर काळात नेहरू गांधी घराण्याच्या बाहेरचे नरसिंह राव हे पहिले पंतप्रधान झाले.

१९९१ साल हे प्रत्येक भारतीयाच्या ओठावर असते कारण जागतिकीकरणाची सुरुवात याच वर्षापासून आपल्या देशात झाली. भारतात खाजगीकरण आणि आर्थिक उदारीकरण आणले गेले. याची सुरुवात पी.व्ही नरसिंह राव यांनी केली जेंव्हा त्यांनी परंपरा मोडीत काढून एका राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या विद्वान व्यक्तीला देशाचे अर्थतज्ञ बनवले.

 

pv-narsimha-rao-inmarathi

ते अर्थतज्ञ होते मनमोहन सिंग! १९९१ चा काळ विचित्र होता. जे लोक १९९१ साली किंवा त्यानंतर जन्मले त्यांना ती स्थिती ठाऊत नाही परंतु त्या काळाच्या तरुण आणि प्रौढ लोकांनी देशाची आर्थिक हलाखी पाहिली आहे. साधी स्कूटर घ्यायची असेल तर लोन घ्यायला लोकांकडे पैसा नव्हता आणि लोन द्यायला बँकांकडे देखील पैसा नव्हता.

सिमेंटसारखी वस्तू सुद्धा लोकांना रेशन सारखी लाईन लावून घ्यावे लागत होते. वृद्धीचा दर प्रचंड कमी झाला होता. कारखाने बंद पडले होते. छोट्यात छोटी वस्तू सुद्धा बाहेरून आणावी लागत होती.

इतकी वाईट वेळ आली होती जेव्हा RBI ने स्वत:कडील ४७ टन सोने बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपान कडे गहाण ठेवून ४०० कोटीचे कर्ज उभे केले होते.

नोकऱ्या नसल्यामुळे लोक वणवण भटकट फिरत होते तर उद्योगांना उठाव नसल्याने उद्योजक हताश झाले होते अशा परिस्थितीमध्ये नरसिंह राव यांनी सत्ता हाती घेतली. देशाची परिस्थिती सुधारण्याचे पहिले पाउल म्हणून मनमोहन सिंग यांना अर्थखाते दिले. त्याच्यानंतर भारताची बाजारपेठ जगाला खुली करण्यात आली. देशात खाजगीकरण आणण्यात आले.

 

manmohan_narsimha_rao_inmarathi

सरकारी बाबूच्या नियंत्रणाखाली असणारे उद्योग मोकळे केले गेले, पी व्ही नरसिंह रावांनी भारतातील कोटा परमिट लायसन्स राज संपवले. उद्योगावरचे कडक आर्थिक निर्बंध काढून टाकले गेले, नोकऱ्याच्या संधी उपलब्ध झाल्या, व्यापार उदीम वाढला. १९४७ ला जर भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले असेल तर १९९१ साली पी व्ही नरसिंह राव यांच्या सरकारने भारताला आर्थिक स्वातंत्र्य बहाल केले.

खरे पाहता या आर्थिक सुधारणांचे सारे श्रेय हे मनमोहन सिंग यांना दिले जाते मात्र १९९१ साली पी व्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री असो किंवा UPA च्या काळात सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून काम करणारे पंतप्रधान असो, मनमोहन सिंग यांची भूमिका “ऐकणे” हीच राहिलेली आहे.

जर मनमोहन सिंग यांनी खरच सुधारणा करण्याचा सपाटा लावला असता तर २००४ ते २०१४ च्या काळात भारतात अनेक मोठमोठे बदल दिसले असते.

त्यामुळे १९९१ च्या सुधारणांचे संपूर्ण श्रेय हे मनमोहन सिंग यांचे एकट्याचे नाही मनमोहन सिंग यांनी सुचवलेल्या सुधारणा अमलात आणण्याचे कार्य नरसिंह राव यांनी केले म्हणून ते देखील या श्रेयाचे भागीदार आहेत.

नरसिंह राव यांनी १९९१ सालच्या आर्थिक सुधारणा स्वत:च्या सरकारच्या काळात घडवून आणल्या. हे करत असताना त्यांनी राजकारणाचा कसलाही विचार केला नाही. १९९६ ला कॉंग्रेस सार्वत्रिक निवडणूक हरली होती. नरसिंह राव यांनी मनमोहन सिंग यांना नियुक्त करतानाच असे म्हटले होते की

“मला राजकारण करायचे नाही खरोखर देशाचा विकास करायचा आहे.”

त्यांनी त्यांचे शब्द प्रत्यक्षात आणून दाखवले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात यशस्वीपणे संपन्न झालेल्या अणुचाचणी ची सुरुवात सुद्धा नरसिंह राव यांच्या काळात झालेली होती त्यामुळे वाजपेयींनी नरसिंह राव यांचा देखील श्रेयनामावली मध्ये आदराने उल्लेख केलेला होता. नरसिंह राव यांच्या कारकिर्दीला तसे घोटाळ्यांचे गालबोट ही लागलेले आहेच.

 

narsimhababri_inmarathi

हे ही वाचा – “सामग्री तैयार है, तुम आगे बढ सकते हो” : नरसिंह रावांच्या एका वाक्याने भारत बदलला तो कायमचाच!

त्यांच्याच कारकिर्दीत बाबरी मशीद प्रकरण घडले आणि त्यानंतर मुंबई चे साखळी बॉम्बस्फोट प्रकरण. ते प्रकरण नीट न हाताळता आल्याचा ठपका त्यांच्या सरकार वर बसला होताच. याशिवाय नरसिंह राव यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे देखील गंभीर आरोप झालेले होते.

असे असले तरी ही १९९१ साली भारताला आर्थिक संकटाच्या खाईतून बाहेर काढण्याचे जे संस्मरणीय कार्य नरसिंह राव यांनी केले त्याबद्दल भारत त्यांच्या कायम ऋणात राहिल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?