' संजय दत्तवर बाळासाहेब ठाकरेंचे अनंत उपकार आहेत, ज्याखाली सुनील दत्तदेखील दबले गेले होते – InMarathi

संजय दत्तवर बाळासाहेब ठाकरेंचे अनंत उपकार आहेत, ज्याखाली सुनील दत्तदेखील दबले गेले होते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

लेखिका – अॅड अंजली झरकर

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारीत असलेला ‘संजू’ हा मुव्ही दोन वर्षांपुर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच संमिश्र चर्चा रंगल्या होत्या.

जो मान आजपर्यत बॉलीवूड गाजवलेले दिलीप कुमारसारखे बादशाह, राज कपूर सारखे शोमन, देवानंद सारखे लिजेंडरी ऍक्टर, अमिताभ बच्चन यांच्यासारखे शहनशाह यांना मिळाला नाही.

तो मान संजय दत्तला मिळाला आहे.

जिवंतपणी तो कहाणी बनून लोकांसमोर साकार झाला आणि ७० मिमी च्या पडद्यावर अमर झालाय.

तो खरंच त्या योग्यतेचा आहे का यावर सोशल मीडियावर खमंग चर्चा सरू आहेत. त्याला कारणे देखील तशी आहेत.

संजय दत्तच्या बॉलीवूडच्या आयुष्यात आणि व्यक्तिगत आयुष्यातही अनेक चढ उतार राहिलेले आहेत. तो शाहरुख किंवा आमिर सारखा टॉपचा अभिनेता नाही.

त्याने एकसलग कुठले हिट दिलेत आणि करीअरच्या अत्युच्च शिखरावर तो जावून पोहोचलाय असंही झालेलं नाही.

याउलट त्याची कारकीर्द नशा, बायकांचा नाद, तीन लग्ने, अंमली पदार्थाचे व्यसन, जेल अशा अनेक अशा गोष्टींमुळे बदनाम झालीय.

 

sanjay datta inmarathi

चांगल्या प्रतिभासंपन्न घराण्याचा वारसा, तोंडात चांदीचा चमचा घेवून झालेला जन्म, शिक्षणाच्या उत्तम सोयी, वाट्टेल त्या गोष्टी पुरवण्यासाठी हाताशी असलेला पैसा – ही संजय दत्तची ओळख.

ह्या पार्श्वभूमीवर संजय दत्तला जेव्हा १९९३ च्या मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी TADA (Terrorist and Disruptive Activities (Prevention) ACT खाली अटक झाली त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या.

संजय दत्तला जेव्हा अटक झाली तेव्हा तो करिअरच्या “पीक”ला होता. त्याचे सिनेमे चालत होते. अशात बॉम्बस्फोट झाल्याच्या एक आठवडा अगोदर त्याने कुप्रसिद्ध डॉन आणि दाउदचा तेव्हाचा हस्तक अबू सालेम याच्याकडून शस्त्रे घेतली. ज्याचा वापर पुढे या मुंबई बॉम्बस्फोटात झाला.

त्याच्यानंतर आजपर्यंत याच कनेक्शन मध्ये संजय दत्तला अनेक वेळा जेलची हवा खावी लागलेली आहे. अनेक वेळा जेलच्या फेऱ्या माराव्या लागलेल्या आहेत.

ज्यावेळी संजयवर ही वेळ आली तेव्हा साहजिकच त्याचे कुटुंबीय प्रचंड खचून गेले होते. आई नर्गिसने तर अगोदरच या जगाचा निरोप घेतलेला होता.

त्या काळात बहिण प्रिया दत्त आणि वडील सुनील दत्त यांना संजयच्या जेलवारी प्रकरणी भरपूर मानसिक छळ सोसावा लागला होता.

सुनील दत्तची प्रतिमा एक जंटलमन नायक, स्वच्छ चारित्र्याचा माणूस आणि कॉंग्रेसचा नेता अशी होती. मुलाच्या आयुष्याने घेतलेले अकल्पित वळण सुनील दत्तला हादरा देवून गेले.

 

sunil-dutt-inmarathi

या सगळ्या प्रवासावर “Mr and Mrs Dutt — Memories of our parents” नावाचे एक पुस्तक प्रिया दत्तने लिहिले आहे. त्यात तिने स्वत:च्या वडिलांच्या मुलाबद्दल हळव्या झालेल्या मनस्थितीचे अचूक वर्णन केलेले आहे.

मुलगा आपल्यापासून एकाच शहरात काही मैल अंतरावर जेलच्या थंडगार दगडी फरशीवर झोपतो आहे ही गोष्ट सुनील दत्त यांना जाळून टाकत असे.

त्या काळात सुनील दत्त यांना स्वत:च्या पार्टीकडून देखील अत्यंत वाईट वागणूक मिळत होती. मुलगा देशद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्यात जेलमध्ये आहे ह्या गोष्टीचे पडसाद सुनील दत्त यांच्या बरोबरच्या कॉंग्रेस नेत्यांच्या वर्तनात दिसून येत.

अगदी शरद पवार यांनी देखील सुनील दत्त यांच्याशी जवळीक त्या काळात कमी केली होती. त्यामुळे सुनील दत्त यांनी मुलाला जेलमधून सोडवण्यासाठी अनेक कॉंग्रेस नेत्यांचे उंबरठे झिजवले पण उपयोग झाला नाही.

१९९५ ला महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन पहाट उगवत होती. यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून जो कॉंग्रेस काळ महाराष्ट्रात चालू होता त्यात अचानक भगवा रंग काळपटलावर आला.

बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने त्यावेळी महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणे बदलून टाकली.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून जी कॉंग्रेस महाराष्ट्रात अव्वल असायची त्या कॉंग्रेसचा धुव्वा उडवून शिवसेनेच्या पारड्यात लोकांनी आपला कौल टाकला.

शिवसेना भाजपचं युती सरकार त्यावेळी महाराष्ट्रात आलं आणि सुनील दत्त यांच्या मनात स्वत:च्या मुलाच्या सुटकेची एक आशा पालवली.

 

sunil-balasaheb-inmarathi

 

याबाबत सुनील दत्त यांनी याबाबत मिडीयाला स्वत: स्टेटमेंट दिलेलं आहे. ज्या काळात शिवसेना भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रात होत त्यावेळी शिवसेनाप्रमुखांचे एक वाक्य नेहमी मिडीयाच्या हिटलिस्ट वर असायचे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

ते बोलायचे,

“सत्तेचा रिमोट माझ्या हाती आहे.”, “सत्तेची चावी माझ्या हाती आहे.”

स्वत: कुठलेही पद न घेता शिवसेना प्रमुखांनी स्वतःचा असा आदरयुक्त दरारा त्यावेळी राखलेला होता. बस याच कारणामुळे सुनील दत्त यांनी बाळासाहेब ठाकरे यांची त्या काळात भेट घेतली आणि संजयला सोडवण्यासाठी साकडे घातले.

त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे.

चावी फिरली आणि संजय दत्तला तब्बल १८ महिन्यानंतर बेल मिळाली. तो बाहेर आला.

बाहेर आल्यानंतर त्याने पहिले काम कुठले केले असेल तर त्याने मातोश्रीवर जावून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेवून त्यांचे पाय धरले.

 

sanjay-balasaheb-inmarathi

 

बाळासाहेब ज्यावेळी इहलोक सोडून गेले, त्यावेळी संजय दत्तने “बाळासाहेब मला माझ्या पित्याच्या जागी होते. माझ्या आणि माझ्या घरच्यांच्या पाठीमागे जेव्हा कुणीही आलं नाही, त्यावेळी बाळासाहेबांनी मला आधार दिला…!” असं अत्यंत भावूक स्टेटमेंट देखील दिलेलं होत.

त्या काळापासून संजय दत्तचा शिवसेनाप्रमुखांबरोबरचा आणि शिवसेने बरोबरचा जिव्हाळा कायम राहिलेला आहे.

अर्थात यात एक गोष्ट ठळकपणे जाणवते की संजय दत्त बाहेर आल्यानंतर सुनील दत्त यांनी कधीही शिवसेनेच्या नेत्याविरुद्ध कोणतेही इलेक्शन कधी लढवले नाही. त्यांनी याबाबत उघडपणे कधीच कुठले सूचक वक्तव्य केलेले नाही.

आपले निवडणूक न लढवण्याचे कारण आपली कॉंग्रेस पक्षप्रमुखाप्रती असलेली नाराजी आणि मतभेद आहेत याच गोष्टींचा त्यांनी पुनरुच्चार केला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?