“थोडेसे आळशी” व्हा आणि स्मरणशक्ती वाढवा, आवर्जून वाचाच!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
खरे पाहता एकसलगपणे काम न करता मध्ये मध्ये ब्रेक घेत राहणे हा एक वाईट गुण समाजाला जातो. घरी दारी शाळेमध्ये जी मुले अभ्यासात हुशार नसतात त्याला मंद आणि आळशी असा शिक्का सहज मारला जातो. ज्यांना अगदी निवांत आणि थांबून काम करण्याची सवय असते अशा माणसाचे समाजात कुठेही कौतुक होत नाही.
मध्ये एक बातमी आलेली आणि त्याबरोबर एक फोटो सुद्धा खूप व्हायरल झालं होता तो म्हणजे चायना मधल्या शाळेचा, जिथे वर्गात मुलं सगळं आवरून चक्क झोप काढत आहेत!

तो बघूनच बऱ्याच जणांना आश्चर्य वाटलं होतं की असं कसं असू शकतं की शाळेत झोपायचा तास कसं असू शकतो? पण चायना मध्ये ते आहे, मुलांवर सतत ताण टाकून जबरदस्ती अभ्यास करवून घेणे हे तिथल्या शिक्षणपद्धतीत बसत नाही!
पण खरंच ही गोष्ट किती योग्य आहे आत्ता आपल्याला कळतय, आणि हे काय फक्त शाळकरी मुलांच्या बाबतीच लागू होतं असं नाही, तर प्रत्येक वयाच्या वर्गातल्या व्यक्तीला ही गोष्ट लागू होते!
मात्र तुमची ही थांबून थांबून काम करत राहण्याची सवय जर तुमच्या साठी एक वरदान आहे अस सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल?
आळशीपणामुळे तुमच्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होते आहे असा निष्कर्ष जर संशोधनातून निघत असेल तर यावर तुमचं मत काय असेल?

कारण अमेरिकेच्या मिसुरी आणि एडिनबर्ग या विद्यापीठाच्या मानसोपचार तज्ञांनी संयुक्तपणे चाचणी घेवून याबाबत एक रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आहे.
ज्याच्यात काम करताना मध्ये मध्ये ब्रेक घेवून निवांतपणे काम करत राहणे असा आळशीपणा हा सर्वसामान्य माणसांबरोबरच स्मृतीभ्रंश झालेल्या माणसाला सुद्धा त्यांची स्मृती परत आणण्यासाठी वरदान ठरतो असे म्हटले आहे.
ज्यावेळी व्यक्ती एकसलगपणे काम करत राहते त्यावेळी तिच्या मेंदूला हवी तशी विश्रांती मिळत नाही. एकसलग १० – १२ तास काम करणाऱ्या व्यक्तीला थकवा येणे, चिडचिड होणे अशा समस्या सतावत राहतात.

याच्यावर उपाय म्हणून संशोधक सांगतात. काम करताना मध्ये मध्ये १५-२० मिनिटाचे ब्रेक घेवून काहीही न करता तो वेळ डोळे मिटून डुलकी घेण्यात नाही तर शांतपणे मेडीटेशन करण्यात घालवा. जर असं केलं तर काम करण्याचा उत्साह वाढेल आणि स्मृतीदेखील तीक्ष्ण होईल.
यांसदर्भात जो प्रयोग केला गेला त्यात संशोधकांनी दोन व्यक्तींचे गट केलेले होते त्यापैकी एका गटाला सलग पणे काही शब्द पाठ करायला दिले, चित्रे ओळखायला दिली आणि त्यानंतर कुठलीही विश्रांती न देता त्यांच्या कडून शब्द आणि चित्रे त्यांना आठवतात का याची परीक्षा घेतली गेली.
याउलट दुसऱ्या गटातील लोकांना शब्द पाठांतर किंवा चित्रे दाखवल्यानंतर अंधाऱ्या खोलीत जवळ मोबाईल वगैरे न ठेवता फक्त १५-२० मिनटे विश्रांती घ्यायला लावली!
दोन्ही गटांमधून जे निष्कर्ष आले त्यामध्ये ज्या गटाला विश्रांती मिळालेली होती त्यांची स्मृती पाठांतर आणि आठवण्याच्या बाबतीत ज्या गटाला विश्रांती मिळालेली नव्हती त्यांच्यापेक्षा जास्त चांगली निघाली असे समोर आले.

सगळ्या कार्पोरेट ऑफिसमध्ये आजकाल power nap चे culture आहे. दुपारी जेवणानंतर किमान २० ते २५ मिनिटांची विश्रांती घेतली तर कार्माचारी दुप्पट उत्साहाने काम करू शकतो, त्याची उर्जा वाढते, कामाचा उरक वाढतो हे अनेक वेळा निरीक्षणातून समोर आलेले आहे.
ज्या लोकांना स्मृतीभ्रंश झालेला आहे अशा लोकांच्या बाबतीत त्यांची स्मृती परत आणण्यासाठी त्यांचा विश्रांतीचा काळ वाढवणे हा चांगला उपाय असल्याचे मत डॉक्टर लोकांनी नोंदवले आहे. स्मृतीभ्रंश झालेल्या लोकांची स्मृती परत आणण्यासाठी त्यांना निरनिराळ्या बौद्धिक कसरती दिल्या जातात.
त्या करण्यासाठी जर मधून मधून त्यांना ब्रेक दिले त्यांचा विश्रांतीचा कालावधी वाढवला असता त्यांच्या गोष्टी लक्षात ठेवण्याच्या pattern मध्ये चांगले बदल दिसून आलेलं आहेत.

Memory consolidation किंवा स्मृतीचे एकत्रीकरण करून तिची कार्यक्षमता कशी वाढवता येईल याबाबत संशोधक अनेक प्रयोग करत असतात.
या प्रयोगामध्ये काम करता असताना कामात चालढकल करून काम मध्ये मध्ये ब्रेक्स घेवून संथ गतीने करत राहण्याची सवय ही स्मृती वाढवण्यासाठी पोषक ठरते या निष्कर्षाप्रत अनेक संशोधक आलेले आहे.

त्यामुळे जर तुम्हाला कामात उत्साह वाटत नसेल, नवीन काही कल्पना सुचत नसतील किंवा तुमची स्मृती तुम्हाला दगा देतीयेय असे वाटत असेल तर वेळ आलीये जेव्हा तुम्ही तुमचे काम तुमचा मोबाईल बंद करून शांतपणे काही न करता बसण्याची किंवा डोळे मिटून बसण्याची.
दिवसभरात असे छोटे छोटे ब्रेक्स तुमच्यासाठी मेमरी बुस्टर चे काम करतील आणि तुम्हाला काम करण्यासाठी ताजेतवाने ठेवतील हे नक्की.
===
सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.