' साबुदाण्याच्या सेवनाने होणाऱ्या ‘या’ फायद्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल… – InMarathi

साबुदाण्याच्या सेवनाने होणाऱ्या ‘या’ फायद्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

साबुदाण्याबद्दल कितीतरी गोष्टी सांगितल्या जातात. काही जणांच्या मते यात अजिबात पोषक तत्वे नसतात. तर काहीजण याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी करता येऊ शकतो असं सांगतात.

पण सत्य हे आहे की पांढऱ्या मोत्यासारखा दिसणारा साबुदाणा हा गुणांचा खजिना आहे.

कसाव्हाच्या (सैगो पाम) झाडापासून मिळणाऱ्या स्टार्चपासून साबुदाणे तयार केले जातात. भारताप्रमाणेच सर्व जगभर हेच साबुदाणे उपवासासाठी वापरले जातात.

यामध्ये कार्बोहाइड्रेट अधिक प्रमाणात असते. मात्र फॅटची मात्रा कमी असते. साबुदाण्याची खिचडी फक्त उपवासाच्या दिवशीच नाही तर इतर दिवशी सुद्धा आवडीने खाल्ली जाते.

मध्य प्रदेश, खासकरून इंदौर आणि महाराष्ट्रात साबुदाण्याची खिचडी, वडे हा लोकांचा आवडीचा नाश्ता आहे.

साबुदाण्याच्या सेवनाने शरीराला खूप फायदा होतो. हा शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत करतो. रक्तदाब नियंत्रणात राहतो.

याशिवाय देखील साबुदाणा खाण्याचे अनेक फायदे आहेत. ते कोणते ते आता पाहुयात.

१. पचनक्रिया सुधारते :

 

sabudana-health-inmarathi06

 

साबुदाणा पचायला हलका असतो. त्यामुळे पचनासंबंधीच्या तक्रारी साबुदाण्याच्या सेवनामुळे दूर होतात. ज्यामुळे गॅस आणि अपचनासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते.

 

२. शरीरातील उष्णता कमी करते :

 

sabudana-health-inmarathi04

 

उपासाच्या दिवशी बहुतेक वेळा शरीरातील उष्णता वाढते. अशा वेळी साबुदाण्याची खिचडी खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि फ्रेश वाटते.

हे ही वाचा –

===

 

३. रक्तदाब नियंत्रित राहतो :

 

sabudana-health-inmarathi01

 

साबुदाण्यात योग्य प्रमाणात पोटॅशिअम असते ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालू राहतो. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

 

४. शारीरिक शक्ती वाढवतो :

 

healthy-living-marathipizza00

 

साबुदाण्यामध्ये पर्याप्त प्रमाणात कार्बोहाइड्रेट असतात जे शरीराला ऊर्जा मिळवून देतात. यामुळे उपासाच्या दिवशी येणारा अशक्तपणा कमी होतो.

 

५. हाडे मजबूत राहतात :

 

sabudana-health-inmarathi02

 

साबुदाण्यामध्ये कॅल्शियम, आयर्न व व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असल्याने हाडांचे आरोग्य सुधारून हाडे लवचिक होण्यास मदत होते. तसेच यामुळे तुमचा दिवसभराचा थकवा कमी होऊन उत्साह वाढण्यास मदत होते.

शिवाय साबुदाण्याचे सेवन मांसपेशी दुखत असल्याससुद्धा उपयुक्त ठरते. याच्या सेवनामुळे तुम्हाला दीर्घ शारीरिक श्रमानंतरसुद्धा चक्कर येत नाही.

 

६. मांसपेशींचा विकास :

 

sabudana-health-inmarathi03

 

तुम्हाला शरीर कमवायचे असेल तर साबुदाणा तुमच्यासाठी प्रोटीनचे काम करेल. शरीर कमावण्याव्यतिरिक्त तो शारीरिक शक्ती वाढविण्यात सुद्धा उपयुक्त ठरू शकतो.

 

७. वजन वाढविण्यात सहाय्यक :

 

sabudana-health-inmarathi07

 

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, कामाच्या ताणामुळे काही जणांचे वजन कमी होते. काही लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांचे वजन वाढू शकत नाही.

अशा वेळी साबुदाण्याची खिचडी किंवा खीर खाल्ल्याने फायदा होतो. ही बनवायला सोपी असते. शिवाय फार महागही नसते. साबुदाणा वजन वाढविण्यासाठी मदत करतो.

 

८. थकवा दूर करतो :

 

happy girl inmarathi

 

शरीराचा थकवा दूर करण्यासाठी साबुदाणा खूप उपयुक्त आहे. याच्या सेवनाने तजेलदार वाटते आणि एनर्जी मिळते.

हे ही वाचा –

===

 

९. ऍनिमियाला दूर ठेवतो :

 

blood-cells-inmarathi

 

साबुदाण्यात लोह मुबलक प्रमाणात असते, जे लाल रक्तपेशी तयार करते. यामुळे रक्ताची कमतरता निर्माण होत नाही.

 

१०. त्वचा :

 

skin-marathipizza

 

 

आरोग्याबरोबरच साबुदाणा हा त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर असतो. साबुदाण्याच्या फेसमास्कने चेहरा उजळतो. तसेच यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

 

११. अतिसारात उपयोगी :

 

pain inmarathi

 

जुलाब किंवा अतिसारामुळे कित्येकदा शरीरातील पाणी कमी होते. अशावेळी साबुदाण्याची खिचडी खाल्ल्याने फायदा होतो.

 

१२. गर्भावस्था :

 

pregnancy-inmarathi

 

गर्भधारणेच्या काळात बायकांनी असे पदार्थ खावेत जे त्यांच्या आणि त्यांच्या बाळाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतील. शिवाय ज्यातून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळेल.

साबुदाणा हा एक असा खाद्यपदार्थ आहे ज्यात स्टार्च आणि कार्बोहाइड्रेट योग्य प्रमाणात असतात. या काळात महिलांना मोठ्या प्रमाणात ऊर्जेची कमतरता भासते. तेव्हा याची मदत होते.

त्याचबरोबर तो पचायला देखील हलका असतो त्यामुळे तो गर्भधारणेच्या काळात खाणे फायद्याचे ठरते. गर्भावस्थेच्या काळात साबुदाणा खाल्ल्याने गर्भातील अर्भकाची वाढ चांगली होते.

● साबुदाण्यामध्ये फोलिक ऍसिड, पोटॅशिअम, कॅल्शियम, आयर्न आणि ब जीवनसत्त्व असते जे गर्भवती महिलेबरोबरच बाळाच्या वाढीसाठी उपयोगी असते.

● तसेच व्हिटामिन K योग्य प्रमाणात असल्याने तो गर्भवती स्त्रीची हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतो.

● १०० ग्रॅम साबुदाण्यामध्ये ३५५ कॅलरी ऊर्जा असते. त्याचबरोबर त्यात ९४ ग्रॅम कार्बोहाईड्रेट असतात त्यामुळे हा वजन वाढण्यासाठी मदत करतो.

त्यामुळे जर कोणत्या गर्भवती महिलेचे वजन गरजेपेक्षा कमी असेल तर त्यांनी नियमितपणे साबुदाण्याचे पदार्थ खावेत. याने बाळाच्या जन्मापर्यंत त्यांचे वजन योग्य तेवढे वाढू शकते.

 

pregnant inmarathi

 

● साबुदाण्यामध्ये फोलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी’ भरपूर प्रमाणात असल्याने जन्मापूर्वी अर्भकाची योग्य वाढ होते व इतर मज्जासंस्थेसंबंधीच्या जन्मदोषांपासून संरक्षण होण्यास मदत होते.

त्यामुळे तुमच्या आहारात साबुदाण्याच्या पदार्थांचा समावेश नक्कीच करा ज्यामुळे तुम्हाला या सुपर फूडचे फायदे मिळू शकतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?