' मोदींच्या २०१४ विजयामागे आहे - "हा" IIM सोडून भाजपात आलेला "आयटी सेल" फाऊंडर

मोदींच्या २०१४ विजयामागे आहे – “हा” IIM सोडून भाजपात आलेला “आयटी सेल” फाऊंडर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

एक व्यक्ती ज्याने आयआयएम अहमदाबादमधून शिक्षण घेतलं, एक व्यक्ती ज्याने लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स आणि येल युनिव्हर्सिटी सारख्या नामांकित शिक्षा संस्था मध्ये आपलं शिक्षण घेतलं, ती व्यक्ती ज्याने मोठंमोठया MNC मध्ये काम केलं.

त्याने अचानक २००४ साली भारतीय जनता पार्टीसोबत राजकीय आयुष्य जगायला सुरुवात केली.

२००७ साली त्यांनी भाजपच्या आयटी सेलची स्थापना केली आणि २०१५ साली मोदी आणि शहा यांना हुकूमशाही प्रवृत्तीचा म्हणत, पार्टीला राम राम ठोकला.

त्या व्यक्तीचं नाव आहे प्रोद्युत बोरा, ज्याने भाजपा आयटी सेलची निर्मिती केली त्याने आज भाजपा आयटी सेलला ‘राक्षस’ म्हटलंय. त्यांचा मतानुसार ज्याची निर्मिती चांगल्या उद्देशाने करण्यात आली होती.

परंतु ताकद मिळाल्या बरोबर, त्याने लोकांचं नुकसान करायला सुरुवात केली.

 

Prodyut-Bora-Quits-BJP-inmarathi
newztelugu.com

आसामच्या जोरहाटचे निवासी लक्ष्मी प्रोवा बोरा आणि लक्ष्मी कांता बोरा या दाम्पत्याचा पोटी प्रोद्युत बोरा यांचा जन्म झाला. ज्यांनी २००७ साली पहिल्यांदा कुठल्या पक्षाच्या आयटी सेलची स्थापना केली. तो पक्ष होता भारतीय जनता पार्टी.

प्रोद्युत बोरा यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे आणि आसाम मध्ये त्यांनी स्वतःची नवी लहान पार्टी बनवली आहे. ज्या पार्टीचं नाव आहे लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी.

आता भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलला अमित मालवीय सांभाळत आहेत. परंतु आयटी सेलच्या निर्मितीपासूनची कहाणी प्रद्युत बोरा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत मांडली आहे.

प्रोद्युत बोरा एका मध्यमवर्गीय कुटुंबातले आहेत. मिडल क्लास कुटुंबातले आहेत. एखाद्या सामन्य मुलाप्रमाणे त्यांनी अनेक मोठी स्वप्न बघितली एवढंच नव्हे तर त्यांनी बघितलेलं प्रत्येक स्वप्न त्यांनी पूर्ण केलं.

बोरा यांनी आशिया पॅसिफिक कम्युनिकेशन असोसिएट्समध्ये ट्रेनी म्हणून काम पण केलं. परंतु तिथे त्यांचा जास्त काळ निभाव लागला नाही. मग त्यांनी डिजिटल टॉकीज कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंट पदाची धुरा सांभाळली.

ही भारतातील पहिली डिजिटल ऍड मेकिंग कंपनी आहे. ह्या सर्व नोकऱ्या करत असताना सन २००४ साली त्यांनी वयाच्या तिशीत भाजपात प्रवेश केला.

त्यांचा मनात भावना होती की ज्याप्रकारे ते मोठमोठया कंपनीला सल्ले देतात जर तसेच सल्ले त्यांनी राजकीय पक्षांना दिले तर राजकीय पक्ष देशात काही तरी सकारात्मक बदल घडवतील. २००४ साली भाजपाचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. काँग्रेस सत्तेत आली. परंतु प्रद्युत बोरा यांचा अटल बिहारी वाजपेयींवर प्रचंड विश्वास होता.

वाजपेयजीना निवडणुकीत मदत करण्याची त्यांची इच्छा होती. परंतु वाजपेयींच्या आजारपणामुळे त्यांच स्वप्न सत्यात उतरू शकलं नाही.

 

Atal Bihari Vajpayee.Inmarathi
ndtvimg.com

२००४ साली पक्षात जॉईन झाल्या बरोबर त्यांना पहिली जबाबदारी राष्ट्रीय मीडिया सेल मध्ये सिद्धार्थ नाथ सिंह यांचा हाताखाली मिळाली. त्यावेळी मीडिया सेलचे प्रमुख अरुण जेटली होते. यानंतर २००६ मध्ये राजनाथ सिंह यांचा मीडिया सल्लागार त्यांना बनवण्यात आले.

एक दिवशी उत्तर प्रदेशातल्या एका निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांनी आयटी सेलची संकल्पना राजनाथ सिंह यांचा कानावर घातली, तसेच त्यांना सांगितले की कशाप्रकारे नवनवीन प्रचार प्रसार माध्यमांचा वापर केल्यावरच पार्टीच्या प्रचाराला मदत होऊ शकेल.

राजनाथ सिंहाना ती कल्पना आवडली आणि सन २००७ मध्ये ऑफिशियली भाजपा आयटी सेलची स्थापना झाली आणि प्रद्युत बोरा यांना तिचा नॅशनल कनव्हेनर बनवण्यात आले.

राजनाथ सिंह यांना त्यांनी भारतात आलेल्या सोशल मीडियामुळे झपाट्याने वाढत असलेल्या वापरामुळे आयटी इंडस्ट्री जोरात चालू असल्याची माहिती दिली. परंतु याचा वापर राजकीय पक्ष करत नाहीत म्हणून त्यांनी त्यासाठी भारतीय जनता पक्षाने पुढाकार घ्यावा व एक टीम तयार करावी अशी मागणी केली. त्यामुळे राजनाथ यांनी आयटी सेलचे महत्व ओळखून तिच्या निर्मितीला परवानगी दिली होती.

११ वर्षात असं काय घडलं आणि कुठले बदल आयटी सेलमध्ये झाले?

भाजपा आयटी सेल बनवणाऱ्याने आता भाजपा आयटी सेलला राक्षस म्हणून घोषित केलं आहे. त्यांचा म्हणण्यानुसार 11 वर्ष उलटली आहेत. ऑटोमॅटिक मोड वर पक्षाचा प्रचार व्हावा, पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहचावे, लोकांचे विविध सल्ले पार्टी पर्यंत पोहचावे या साठी आयटी सेल कार्यरत होती. परंतु आता आयटी सेल फ्रेंकस्टीनच्या राक्षसा सारखी बनली आहे.

 

pradyut-bora-inmarathi
newsmoments.in

जिला सुरक्षेसाठी बनवण्यात आलं होतं, तीच इतकी ताकदवान झाली आहे की तिने स्वतःहून लोकांना नुकसान पोहचवायला सुरुवात केली आहे.

२००९ च्या निवडणुकीच्या वेळी १५ राज्यात आयटी सेलची स्थापना करण्यात आली होती. २००९ ला भाजपाचा पराभव झाला आणि बोरा यांची उचलबांगडी करून त्यांची रवानगी आसामला करण्यात अली व अरविंद गुप्तांची आयटी सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

प्रोद्युत बोरा यांनी भाजपा आयटी सेलची तुलना पार सिमी या दहशतवादी संघटनेशी केली आहे.

ही तीच सिमी आहे जी एकेकाळी गरीब मुस्लिम मुलांना मदत करण्याचा विचाराने बनवण्यात आली होती. परंतु नंतर तिचं रूपांतर दहशतवादी कट्टरपंथी संघटनेत झालं होतं.

जिचा म्होरक्या संस्थापक आज अमेरिकेत प्राध्यापक आहे आणि संघटनेवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. तशीच अवस्था दिवसेंदिवस आयटी सेलची होत असल्याची भावना त्यानी वक्त केली आहे.

आज प्रद्युत बोरा भाजपात नाहीत. त्यांनी आसाम मध्ये स्वताचा एक छोटा पक्ष तयार केला आहे. मोदी जेव्हा पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित झाले तेव्हाच बोरा पक्ष सोडणार होते परंतु मोदी यांना संधी देऊन बघायचा त्यांनी विचार केला परंतु १० महिन्यात काहीच निष्पन्न झालं नाही त्यामुळे त्यांनी पक्षाला राम राम ठोकला.

२०१४ साली आयटी सेलने ज्याप्रकारे धुमाकुळ घातला. पातळी सोडून विरोधकांवर प्रहार केला. मोठयाप्रमाणावर प्रचार तंत्र उभे केले त्यामुळे मोदी सरकार सत्तेत आलं.

मोदी – शहांनी त्यांचा जवळचे माणसं नेमून आयटी सेल ताब्यात घेतल्याच बोरा यांनी नमूद केलं. 2014 नंतर आयटी सेल आजून राक्षसी स्वरूपात गेलं असून अत्यंत निरंकुश पद्धतीने काम करत असल्याची टीका त्यांनी केली.

 

it-cell-inmarathi
youtube.com

भाजपापासून वेगळं होऊन लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाची स्थापना बोरा यांनि आता केली असून आसामच्या निवडणुकीत त्यांचा पक्ष्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तरी ते आता जोमाने लोकसभेची जोमाने तयारी करत आहेत. आसाम मधून सर्व सीट्स वर ते त्यांचे उमेदवार देणार आहेत.

भाजपाच्या विचार परंपरेला, अडवाणी वाजपेयींच्या वारश्याला मोदी शहा जोडगोळीने खिंडार लावल्याची व त्यामुळे खूप मोठं नुकसान झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?