'गुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट मधील कर्मचाऱ्यांचा "उठाव" देतोय टेक इंडस्ट्रीला वेगळं वळण

गुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट मधील कर्मचाऱ्यांचा “उठाव” देतोय टेक इंडस्ट्रीला वेगळं वळण

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मालकांच्या गव्हर्नमेंट कराराविरुद्ध निषेध व्यक्त केल्याच्या काही दिवसांनंतर आता अमेझॉनसुद्धा ह्याच crisisला तोंड देतेय! ऍमेझॉन कंपनीने अमेरिकेच्या सरकारी संस्थांना ‘facial recognition’ म्हणजे चेहरा ओळखण्याचं एक सॉफ्टवेअर विकण्याचं ठरवलं, ह्याला कंपनीतल्या कर्मचाऱ्यांचा पूर्णतः विरोध आहे.

गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच अमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनीदेखील एक पत्र अमेझॉनच्या ‘इंटर्नल विकी’वर पोस्ट केलंय.

अमेझॉनचे CEO जेफ बेझोस यांना लिहिलेल्या ह्या पत्रात कर्मचारी म्हणतात –

“ICE ( Immigration and Customs Enforcement )ला मदत करणं आम्ही नाकारत आहोत. आणि ज्यामुळे मानवी अधिकार धोक्यात येऊ शकतात असे tools बनवण्याचंसुद्धा आम्ही नाकारत आहोत. सद्सद्विवेकबुद्धी असलेले अमेझोनिअन्स म्हणून काय बनवायचं आणि त्याचा वापर कसा करायचा ह्याची निवड करण्याचा अधिकार आम्हाला देण्यात यावा अशी मागणी आम्ही करतो.”

“अमेरिकेच्या स्थलांतरितांसाठीच्या अमानवीय धोरणाचा आम्ही निषेध करतो. अमेझॉन ICE ला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात भाग घेतेय ह्याची आम्हाला चिंता वाटते.”

 

amazon-facial-rekognition-inmarathi
vanityfair.com

ज्या कर्मचाऱ्यांनी ह्या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत त्यांच्या मागण्या अशा आहेत –

* सरकारी आणि law and enforcement संस्थांना facial recognition सेवा देणं बंद करा.
* कंपनीच्या व्यवहारात पारदर्शिता आणि जबाबदारी दिसली पाहिजे. कुठल्या

संस्थांना अमेझॉन सेवा पुरवतेय ते कर्मचाऱ्यांना कळायला हवं.

* Palantir आणि असा कुठलाही भागीदार जो ICEला मदत करत असेल त्यांना
पायाभूत सुविधा देणं बंद करा.

ICE हे जबर टीकेचे धनी होऊन बसले आहे. लहान मुलांना त्यांच्या कुटुंबियांपासून दूर ठेवणे वगैरे प्रकार ICE ने चालवले आहेत. जे मार्जिनलाईज्ड ग्रुप्स आहेत, त्यांच्यासाठी facial recognition फारसं प्रभावी ठरत नाही. त्यामुळे अमेझोनिअन्सना त्यांच्या टूल्सचा आणखी गैरवापर होण्याची चिंता आहे.

 

vox.com

कॅलिफोर्नियाच्या ACLUने अमेझॉनच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलंय. तंत्रज्ञान आणि नागरी स्वातंत्र्य ACLU डिपार्टमेंटचे डायरेक्टर, निकोल ओझर यांचं म्हणणं आहे कि, हा एक धोका आहे… नागरी अधिकारांसाठी आणि स्थलांतरितांसाठी! आम्ही अमेझॉनच्या कर्मचाऱ्यांसोबत आहोत.

अमॅझॉनचा इतिहास जरा वादग्रस्तच आहे. ह्याआधी त्यांनी CIA ला cloud service दिलेली आहे.

मायक्रोसॉफ्टसुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडलय. त्यांनी १९ मिलियन डॉलर्सचा करार ICEसोबत केलाय. सत्या नडेला ह्यांनी स्पष्ट केलं कि, अमेरिका – मेक्सिकोच्या बॉर्डरवर जे चाललंय ते तसं व्हावं अशी मायक्रोसॉफ्टची इच्छा नाही. पण कुटुंब एकमेकांपासून जाणूनबुजून वेगळे केले जातायेत.

 

eye-inmarathii
youtube.com

ह्या घटनांमुळे तंत्रज्ञानाचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत काय असा प्रश्न मनात निर्माण होतो. खरं तर ते कुणाच्या हातात आहे आणि करता करवीता धनी कोण आहे यावर जास्त अवलंबून आहे! अमेझॉनच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच सर्वच कर्मचारी आणि नागरिक जागरूक व्हावेत जेणेकरून स्वातंत्र्य आणि समता हि मूल्ये जपली जातील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “गुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट मधील कर्मचाऱ्यांचा “उठाव” देतोय टेक इंडस्ट्रीला वेगळं वळण

  • February 3, 2019 at 12:55 pm
    Permalink

    are kay ahe he? batmya vachtach yet nahiye? app nit kara aadhi..

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?