हे वाचा – ई-वॉलेट आणि paytm चे एक्सपर्ट व्हा !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

E-Wallet (Electronic Wallet) ही आपल्यासाठी जरा नवीन पण इतर देशांत खूप आधीपासून चलनात असलेली सुविधा आहे. जवळपास सर्व बँका व काही प्रायव्हेट कंपन्या देखील ही सुविधा पुरवतात. परंतु ज्यांनी कधीही ह्या गोष्टींचा वापर केला नव्हता त्यांना हे सर्व फार complicated, अवघड वाटतं. मुळात तसं काही नाहीये. आपण अगदी सोप्या भाषेत ह्या संकल्पना समजून घेऊ या.

E-Wallet म्हणजे काय ?

आजकाल मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट वगैरे वापरणाऱ्यांची संख्या सर्वत्र मुबलक प्रमाणात आहे. ई-वॉलेट हे कोणत्याही मोबाईल किंवा कंप्युटरच्या OS (ऑपरेटिंग सिस्टीम) वर उपलब्ध आहे. आपण PAY-TM या वेबसाईट व application चं उदाहरण देऊन ही संकल्पना समजून घेऊ या.

paytm-e-wallet-marathipizza

 

स्रोत

ऑनलाइन बँकिंग किंवा डेबिट/क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांनी या आधी मोबाईल रिचार्ज, वीज बिल, टेलिफोन/ब्रॉड बँड बिल, टाटा स्काय, डिश टीव्ही, D2H इत्यादी सेवांचे रिचार्ज करण्यासाठी PAYTM हे अँप वापरलेले आहे. या अँपवर ई-वॉलेट नावाचा पण एक ऑप्शन आहे. कधी तुमचं रिचार्ज काही कारणांनी फेल झालं तर तुमचे पैसे या अँपच्या वॉलेटमध्ये जमा झालेले तुम्ही आधी पाहिले असतील. हे पैसे तुमच्या अँपवर जमा होतात आणि नंतर तुम्ही ते पैसे परत दुसरं रिचार्ज करण्यासाठी वापरू शकता.

ई-वॉलेट म्हणजे “इंटरनेट वरील पैश्याचे पाकीट” !

PAYTM या अँप मध्ये तुमच्या नेट बँकिंगने किंवा डेबिट, क्रेडिट कार्ड ने पैसे टाकून ठेवायचे. पैसे ई-वॉलेट मध्ये जमा करणं एकदम सोपं आहे. जसं तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करता सेम तसंच इथे करायचंय. Amount टाकायची, नेट बँकिंग किंवा क्रेडिट/डेबिट कार्डने नेहमी सारखं प्रोसिड करायचं.

समजा तुम्ही 5000 रुपये या अँपच्या वॉलेटमध्ये टाकून ठेवले.

आता तुमच्या दुकानदाराकडे समजा हे अँप आहे, तर यातून तुम्ही तुमचे पैसे तुमच्या दुकानदाराला देऊ शकता. अगदी 1 रुपयाचं चॉकलेट घेतलं तरी 1 रुपया तुम्ही त्याला ट्रान्स्फर करू शकता. हे ट्रान्स्फर करण्यासाठी बरेच मार्ग या अँप ने पुरवले आहेत. तुम्ही त्याचा मोबाईल नंबर वापरून पैसे ट्रान्स्फर करू शकता, QR Code किंवा BAR code वापरून हे पैसे ट्रान्स्फर करू शकता.

QR code किंवा BAR code ने पैसे कसे ट्रान्स्फर करतात?

ज्याला पैसे द्यायचे आहेत त्याने त्याच्या अँपमध्ये जाऊन Receive Payment हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्यात QR Code किंवा BAR Code चा ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्यानंतर त्याच्या मोबाईल स्क्रीनवर त्याचा स्वतःचा Unique BAR Code किंवा QR Code येतो. (QR Code म्हणजे चौकोनी पिक्सल्सने बनलेला एक कोड आहे, बार कोड सारखाच फक्त चौकोनी.)

तुम्ही तुमच्या paytm अँपवर जाऊन Payment चा ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्यात समजा तुम्ही QR code चा ऑप्शन सिलेक्ट केला तर तुमच्या मोबाईलचा कॅमेरा चालू होतो आणि त्यात एक चौकोनी फ्रेम येते.

paytm-qr-code-scan-marathipizza

 

आता तुम्ही ज्याला पेमेंट करायचं आहे त्याच्या QR code वर तुमचा कॅमेरा फोकस करायचा. तुमच्या कॅमेरावर असलेल्या चौकोनी फ्रेमशी तुम्हाला ज्याला पेमेंट करायचंय त्याच्या मोबाईलवर आलेल्या चौकोनी QR code शी जुळवला की तुम्हाला confirmation येईल.

paytm-qr-code-marathipizza

 

आता तुम्हाला अँप किती रुपये ट्रान्स्फर करायचे हे विचारेल. त्यात तुम्ही आकडा टाकायचा आणि ok वर क्लीक केलं की तुमचे पैसे लगेच ट्रान्स्फर होतात. हे पैसे आता त्याच्या PAYTM च्या अकाउंट वरजमा झालेत…!

आता तो हे पैसे सरळ PAYTM वरून खरेदी करण्यासाठी, बिल पे करण्यासाठी वापरू शकतो किंवा तो त्याच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्स्फर करू शकतो. बँक अकाउंट वर ट्रान्स्फर करण्यासाठी त्याने Transfer to bank account हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. मग अँप वर बँक अकाउंट नंबर, amount, IFSC Code टाकायचा. Proceed वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या बँकेकडून OTP (One time password) चा मेसेज येतो. हा OTP टाकला की तुमचं ट्रान्स्फर कन्फर्म होईल आणि पैसे लगेच तुमच्या बँक अकाउंटवर ट्रान्स्फर होतील.

ई-वॉलेट मधले पैसे बँक अकाउंटवर ट्रान्स्फर करण्यासाठी PAYTM वर एकूण अमाउंटच्या 1% ट्रान्स्फर फी लागते. इतर E-wallet service providers ची ही फी कमी जास्त असू शकते. मात्र बँकेच्या अकाउंट मधून ई-वॉलेटमध्ये पैसे टाकण्यासाठी कुठलीही ट्रान्स्फर फी लागत नाही.

ई-वॉलेट वापरण्यासाठी लागणाऱ्या बेसिक गोष्टी –

ई-वॉलेट वापरण्यासाठी तुमच्याकडे व पेमेंट स्वीकारणाऱ्याकडे काही बेसिक सुविधा असणं गरजेचं आहे.
1) Android किंवा apple बेस्ड मोबाईल
2) इंटरनेट
3) PAYTM किंवा इतर कुठलं ई-वॉलेट सर्व्हिस प्रोव्हायडर अँप
4) क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, नेट बँकिंग सुविधा

या सुविधा पेमेंट करणारा आणि पेमेंट स्वीकारणारा या दोघांकडेही असणं आवश्यक आहे. बरेच दुकानदार ‘PAYTM Accepted here’ अशी पाटी लावतात. जे दुकानदार आहेत त्यांच्यासाठी PAYTM विशेष सुविधा पुरवते. कमर्शिअल पेमेंट्ससाठी तुम्ही तुमच्या मोबाईल अँपवर तुमच्या दुकानाचे डिटेल्स टाकून अकाउंट बनवू शकता. म्हणजे आलेले पैसे हे तुमच्या दुकानातील उत्पन्न आहे हे दिसेल. तसंच तुमच्या Paytm अकाउंट वर तुम्ही केलेल्या सर्व व्यवहारांची नोंद किंवा History ही असते.

paytm-transaction-history-marathipizza

PAYTM चे फायदे काय ?

1) तुमच्या बँक अकाउंटवर रोजच्या खर्चाच्या बारीक सारीक एंट्रीज होणार नाहीत. म्हणजे तुम्ही 5 रुपयांचा चहा पिला, 20 रुपयांची एखादी वस्तू घेतली तर या सर्व छोट्या छोट्या एंट्रीज ऐवजी बँक अकाउंटच्या स्टेटमेंटमध्ये फक्त ‘Transfered to Paytm’ एवढीच एन्ट्री येईल.
2) पैसे ट्रान्स्फर करणं बँकेतून पैसे ट्रान्स्फर करण्यापेक्षा सोपं आहे. Beneficiary Add करा, मग बँक ते Approve करेल… असल्या कटकटी नाहीत. इन्स्टंट पैसे ट्रान्स्फर होतात.
3) डेबिट/क्रेडिट कार्ड स्वाईप करणं बरेच लोक टाळतात. आपलं कार्ड हॅक होण्याची किंवा कार्ड क्लोन होण्याची भीती त्यांना वाटते. अशा काही घटना घडलेल्याही आहेत. अशा घटना टाळण्यासाठी ई-वॉलेट हा एकदम सुरक्षित मार्ग आहे.

4) PAYTM च्या ई-वॉलेटवरील इतर सुविधा –

paytm-options-marathipizza
-ऑनलाइन शॉपिंग
– मोबाईल रिचार्ज
– वीज बिल, टेलिफोन, ब्रॉडबँड, टाटा स्काय, डिश टीव्ही यांचं बिल किंवा रिचार्ज
– बस, रेल्वे, विमान यांचं तिकीट बुकिंग
– हॉटेल, लॉज बुकिंग
– सिनेमाचे, नाटकांचे तिकीट बुकिंग

5) बऱ्याच ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे स्वाईप मशिन्स बंद असतात. तिथे मग आपल्याला  ‘कार्ड पेमेंट बंद है साब, मशीन नही चल रही’ हे ऐकावं लागतं. ई-वॉलेटचा तसा प्रॉब्लेम नाही. PAYTM मोबाईल, लॅपटॉपवर असल्यामुळे डोंगल, WIFI यातूनही इंटरनेट उपलब्ध होऊ शकते. समजा एखाद्या दुकानदाराकडे अगदीच इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोन वरून हॉटस्पॉटने तात्पुरतं इंटरनेट देऊन ई-वॉलेट ने व्यवहार करू शकता…!

6) PAYTM च्या बेसिक users ना 10,000/- रुपयांपर्यंत अमाउंट ई-वॉलेटमध्ये टाकता येते. जर तुम्ही तुमचं आधार कार्ड किंवा PAN कार्ड या ई-वॉलेटशी लिंक केलं तर तुम्ही कितीही पैसे त्यात टाकू शकाल.

सध्या या ठिकाणी ठिकाणी आपण PAYTM वॉलेट वापरू शकता. याचा आजून एक फायदा म्हणजे तुम्ही PAYTM वापरुन पेमेंट केलं तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी डिस्काउंट पण मिळतो.

आज मार्केटमध्ये बरेच ई-वॉलेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. जवळपास सर्व मोठ्या बँकांचे स्वतःचे apps आहेत. मोबाईल सिम प्रोव्हायडर्स देखील हि सुविधा देतात. Freecharge हे पण एक PAYTM सारखंच app आहे.

इतर सर्व ऑप्शन्स पैकी PAYTM ची सुविधा सर्वोत्तम आहे. या ई-वॉलेट सिस्टीम मध्ये एक सुधारणा व्हायला पाहिजे व भविष्यात ती होईल देखील… ती म्हणजे एका कंपनीच्या ई-वॉलेटमधून दुसऱ्या कंपनीच्या ई-वॉलेटमध्ये पैसे ट्रान्स्फर करण्याची सुविधा. सध्या PAYTM वरून फक्त PAYTM च्याच ई-वॉलेटवर पैसे ट्रान्स्फर करता येतात.

ही अडचण दूर झाली तर कॅशलेस इकॉनॉमीच्या ध्येयाकडे आपली वाटचाल अजून जोरात होईल!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?