'शाळेच्या पत्रलेखन स्पर्धेत 'नक्षलवाद्याच्या' मुलीने बापाला लिहिलंय हृदय हेलावून टाकणारं पत्र

शाळेच्या पत्रलेखन स्पर्धेत ‘नक्षलवाद्याच्या’ मुलीने बापाला लिहिलंय हृदय हेलावून टाकणारं पत्र

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

नक्षलवाद ही आपल्या देशाला लागलेली कीड आहे. सामान्य आदिवासी, शेतकरी जनतेला भुलवून, एखाद्या भ्रमक क्रांतीचे स्वप्न दाखवून आदिवासी समाजातील, दलित समाजातील युवक युवतींना या नक्षलवादात ओढले जाते. बऱ्याचदा जबरदस्ती करून त्यांना नक्षलवादी होण्यास भाग पाडलं जातं.

त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत त्यांचा वापर जिवंत हत्यार म्हणून केला जातो, एक सैनिक म्हणून केला जातो. असाच मग हा सैनिक एकतर पोलिसांच्या हातून मारला जातो नाहीतर नक्षली स्वतः त्याची हत्या करून टाकतात.

त्याचा समोर कुठलाच उपाय उरत नाही. त्यामुळे जबरदस्तीने ती क्रांतीच्या लाल रंगाची रायफल हातात घेतो आणि लाल सलामच्या त्याचा निर्जीव देहातून घोषणा देत त्याचे मरण येण्याची वाट बघतो.

 

naxal-camp-marathipizza
dailymail.co.uk

आज नक्षलवादी चळवळ खुप मोठ्या भागावर पसरली असली तरी तिची शक्ती दिवसेंदिवस कमी होत जाते आहे. नक्षलवादी चळवळीमुळे अनेक सामान्य आदिवासी आणि सामान्य गावकरी यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यांचा घरातून जबरदस्ती तरुणांना या मृत्यूचा सापळ्यात ओढलं जातं व त्यांचा भविष्याची राख रांगोळी केली जाते.

आताच एका नक्षलग्रस्त भागातील मारल्या गेलेल्या नक्षलीच्या मुलीने एक पत्र लिहलं आहे. ते पत्र वाचल्यावर कोणीच या विनाशकारी चळवळी कडे वळणार नाही.

त्या मुलीने पत्रात म्हटले आहे की,

नक्षलवादाने गावांत गोंधळ उडाला आहे आणि सरकारच्या जितक्या विकासवादी योजना आहेत त्या पूर्ण होऊ दिल्या जात नाहीत. नक्षली आमच्याकडे पैश्याची मागणी करत आहेत. नक्षलवादी आमच्या गावात रस्ते बनू देत नाहीत. ज्यामुळे आम्हाला येण्या जाण्यात अडचण होते. नक्षली अशिक्षित आहेत आणि ते चांगले नाहीत. ते गरीबाच्या घरी जाऊन जबरदस्ती मारहाण करतात.

नक्षली समाज परिवार आणि देश्यासाठी एक कोडं आहे आणि आपल्याला सर्वांना ते संपवायचं आहे.

 

naxalites-marathipizza02
newstracklive.com

पत्र लिहणारी मुलगी नेहा कुमारी नावाच्या एका नक्षलींची मुलगी आहे, जो एका हल्ल्यात मारला गेला होता. नेहाला नक्षली विचारधारेची तीव्र चीड आहे. तिने हे सर्व एका पत्रलेखन स्पर्धेत लिहलं आहे. ज्या शाळेत नेहा शिक्षण घेत होती, आठ वर्षांपूर्वी त्याच शाळेला तिच्या पित्याने स्फोटात उडवलं होतं. नेहाचे वडील अजय यादव आज हयात नाहीत.

ते नक्षल्यांचे झोनल कमांडर होते. लोक त्यांना अजय म्हणूनच हाक मारत.

त्यांच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवलं होतं. आधी नगदी ५ लाखाचे बक्षीस नंतर २५ लाखाचे करण्याचा प्रस्ताव पोलीस दलाने वरिष्ठांना पाठवला होता. याच वर्षी मार्च मध्ये अजय आणि त्याचा दोन साथीदारांना पलामु जिल्ह्यातील मोहम्मदगंज येथे सीताचुवा जवळ त्याचाच नक्षली मित्रांनी मारून टाकलं होतं.

अजयचा भाऊ अमृत माओवादी होता. अमृतला पोलिसांनी आधीच छात्तरपूरला मारलं होतं. त्यानंतर अजय अधिक सक्रिय झाला. २०१५ मध्ये अजय यादव ने छात्तरपूरच्या काला पहाड येथे सात पोलिस अधिकाऱ्यांना लँड माईन स्फोटात उडवलं होतं.

परंतु अजयच्या या कुकर्मामुळे त्याच्या परिवाराचे भवितव्य अंधारात गेले. त्यांना आपले राहते घर गमवावे लागले. या गोष्टीचा अंत एकदम भयावह व तर्क विसंगत आहे. अजय हे कुठल्याच विचारधारेसाठी नाहीतर पैश्यासाठी करत होता. मीडिया रिपोर्ट्स नुसार तो फक्त स्वतःचा विचार करायचा, कुटुंबाचा सुद्धा त्याने विचार केला नाही. त्याच्या स्वार्थी प्रवृत्तीमुळे त्याचा अंत झाला. परंतु यामुळे त्याचा परिवाराच्या हाती काय आले?

जे घर होते ते सुद्धा हातातून गेलं. यामुळे नेहा कुमारीच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. तिचं नक्षलींचा धिक्कार करणं त्या लोकांसाठी एक सूचना आहे की हा मार्ग योग्य नाही. यातून व्यक्ती सर्वस्व गमावतो, जसं तिने गमावलं होतं.

 

letter-inmarathi
dnaindia.com

येणारी पिढी नक्षलवाद्यांमध्ये राहून काम करणाऱ्यांना कधीच माफ करणार नाही. त्या मुलीची माफक अपेक्षा असलेला विकास जो एक सुसंस्कृत समाज घडवणार असतो, जो त्या मुला- मुलींच्या स्वप्नांना नवीन दिशा देणार असतो, तोच नक्षलवादी त्यांचा पर्यंत पोहचू देत नाहीत. यामुळे अश्या कित्येक नेहा कुमारी तयार होत आहेत, ज्या अश्या छोट्या प्रयत्नांतुन का होईना पण नक्षलवादाचा हिडीस चळवळी विरुद्ध आवाज उठवत आहेत. नक्षलीकडुन होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत आहेत.

आता आपल्या भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे की त्या नक्षलवाद्यांचा मुलांना “नक्षली” म्हणून हिणवले गेले जाऊ नये. आपण त्यांचा आधार बनणं गरजेचं आहे. त्यांना शिक्षण देऊन सुशिक्षित बनवणं गरजेचे आहे.

अश्या पीडितांचे विचात समाजातल्या त्या लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे जे नक्षलींच्या खोट्या क्रांतीच्या स्वप्नांना व अश्वासनांना बळी पडतात. आपल्या अनंत अडचणीचं भांडवल नक्षलीना करू देतात व देश विघातक कृत्य करण्याकडे वळतात. याबरोबरच विकास गंगा वंचित जनापर्यंत पोहचवून त्यांचा अडचणी सोडवल्या गेल्या पाहिजेत.

त्यांना रोजगार उपलब्ध केला पाहिजे जेणेकरून असे नक्षली भविष्यात तयार होणे थांबेल व अश्याच एखादया नेहा कुमारीच्या वाट्याला हे दुःख येणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?