' पाककडे आहेत भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे. तरीही पाकला भारताची भीती का? – InMarathi

पाककडे आहेत भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे. तरीही पाकला भारताची भीती का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत आणि पाकिस्तान यांचं वैर हे जगप्रसिद्ध आहे. या वैरातून चालणाऱ्या कुरघोड्या, युद्ध, सीमेवरील गोळीबार, आंतरराष्ट्रीय स्तरावरील वादविवाद हे नेहमीच चर्चेत असतात. भारत आणि पाकिस्तान या देशांचे वैर तर आहेच पण एकमेकांशी स्पर्धा देखील प्रचंड तीव्र आहे.

यातूनच या देशांनी आण्विक शस्त्रास्त्र तयार केली आहेत. दिवसेंदिवस दोन्ही देश स्वतःच अणुतंत्रज्ञान विकसित करत आहेत.

परंतु सध्याच्या घडीला, नवीन आलेल्या अहवालानुसार पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त आण्विक शस्त्रास्त्रे आहेत. तरीसुद्धा याबद्दल भीती बाळगण्याची गरज भारताला नाही. असं का ते आपण जाणून घेणार आहोत.

भारताकडे आण्विक शस्त्रास्त्रांचा समाधानकारक साठा आहे, पाकिस्तानचा नवीन आण्विक शस्त्रास्त्र तयार करण्याचा वेग जरी जास्त असला तरी भारताला स्वत:च्या आण्विक शक्तीवर संपुर्ण विश्वास आहे.

आज भारताकडे स्वतःचे १३०-१५० आण्विक शस्त्रास्त्रे आहेत या तुलनेने अधिक १४०-१५० शस्त्रास्त्रे पाकिस्तानकडे आहेत. स्टोकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटय़ूटने जाहीर केलेल्या ताज्या अहवालात ही माहिती दिली आहे.

 

missile-inmarathi

त्या रिपोर्टनुसार भारत आणि पाकिस्तान त्यांचा आण्विक शस्त्रास्त्रांच्या निर्मिती बरोबर नवीन जमिनी, समुद्री आणि हवाई मिसाईल डिलिव्हरी सिस्टम तयार करत आहे. चीन एकीकडे त्यांच्या डिलिव्हरी सिस्टमचे नुतनीकरण करत आहे व त्यांचा जवळच्या आण्विक हत्यारांचे आकारमान वाढवत आहे.

हे ही वाचा – भारत – पाकिस्तान संबंध सुधारण्याच्या मार्गावर? याचं उत्तर येणारा ‘काळच’ देईल!

तरी पाकिस्तान आणि चीनच्या एकत्र धोक्याकडे दुर्लक्ष करून भारताला चालणार नाही. भारताने युद्धजन्य परिस्थितीत एका विश्वसनीय आण्विक हल्ला रोखून धरण्याची एक आण्विक डेटोरेंट सिस्टम तयार केली आहे जी महाभयंकर संहार होण्यापासून देशाला वाचवू शकते.

आण्विक शस्त्रास्त्रांची संख्या हा खरा प्रश्न नाही. भारताने कधीही आण्विक शस्त्रास्त्रे प्रथम न वापरण्याचा करार केला आहे. भारताने आण्विक शस्त्रास्त्रांची व NC3 ( Nuclear Command, Control and Communication) ची विश्वसनीयता आणि टिकाऊ क्षमता वाढवण्यासाठी व प्रति हल्ला करण्याची मजबूत तयारी केली असल्याचं मत जाणकाराने मांडलं आहे.

 

agni six surya missile india

 

जाणकारांच्या म्हणण्यानुसार भारतासाठी आण्विक शस्त्रास्त्रे हे युद्ध करण्यासाठी नसून तर स्वसंरक्षणासाठी आहे. त्यांचे हत्यारे हल्ला झालाच तर तो रोखण्यासाठी आणि झालेल्या हल्ल्याचे शत्रूला तीव्र प्रत्युत्तर देता यावे यासाठी आहे.

भारताने आपली पहिली आंतरराष्ट्रीय बॉलिस्टिक मिसाईल आता वापरात आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या न्यूक्लिअर मिसाईलची रेंज ५००० ते ८००० कि.मी पर्यंत आहे. संपूर्ण चीन आणि त्याची महत्वपूर्ण शहरं या मिसाईलच्या टप्प्यात आहे. आणि – संपूर्ण पाकिस्तानसुद्धा!

म्हणजेच पाकिस्तानातील कोणताही भूभाग भारताच्या टप्प्यावर आहे.

आणि म्हणूनच पाकिस्तान प्रचंड तणावाखाली आहे. आपल्यापेक्षा अधिक अण्वस्त्रं असूनही दबावात आहे.

अर्थात,युद्धजन्य परिस्तिथीतच या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. जर चीनने भारतावर अणुहल्ला केला तर हे तंत्रज्ञान भारत वापरेल कारण भारत हा शांततेचा पुरस्कर्ता आहे.

परंतु सध्यस्थिती जवळ असलेल्या आण्विक आणि लष्करी सिद्धतेपेक्षा चीन व भारताने आपले प्रश्न शांतता व चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यावर भर दिला आहे.

 

Nuclear-energy-marathipizza

 

आजच्या घडीला कोणालाही युद्ध परवडण्यासारखे नाही. प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या विकसित व्हायचं आहे. देशातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करायचा आहेत. त्यासाठी सर्व देश सातत्याने प्रयत्न करत आहेत.

अमेरिका आणि उत्तर कोरिया या देशांतील प्रमुखांची भेट हे ह्याचंच द्योतक आहे. सध्यातरी विकास हाच सर्व देशांचा अजेंडा असल्याने जगभर शांतता नांदत आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?