' अर्ध्या जगावर राज्य करणा-या या राजाच्या कबरीचे गुपित आजही उलगडलेले नाही – InMarathi

अर्ध्या जगावर राज्य करणा-या या राजाच्या कबरीचे गुपित आजही उलगडलेले नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

=== 

चंगेज खान हे नाव आज इतिहासात अजरामर झाले आहे. एक माणूस ज्याने अर्ध्या विश्वावर विजय मिळवला. इतकंच नाही तर तो जगातला सर्वात क्रूर आणि साहसी लढवय्या सेनानी होता. त्याचा शौर्याचा व क्रौर्याचा गाथा आज ही सर्वत्र चर्चिल्या जातात.

ज्या भागातून चंगेज खान आणि त्याचं सैन्य मार्गक्रमण करायचं तो भाग स्मशानभूमीत परावर्तित व्हायचा. तो एक मंगोल शासक होता पण त्याने अर्ध्या आशियावर म्हणजे त्या वेळच्या अर्ध्या जगावर तलवारीने विजय मिळवला होता व सत्ता स्थापन केली होती.

 

 

इतिहासात याहून मोठा पराक्रम गाजवणारा व एवढ्या मोठया भागाला अधिपत्याखाली आणणारा कुठलाच सेनानी जन्माला आला नाही.

जगभरातील मोठे राजे महाराजे, सुल्तान यांनी त्यांच्या मृत्यनंतर आठवण म्हणून खूप मोठे मकबरे, समाध्या बांधायचे आदेश देऊन ठेवले होते. तसं त्यांनी त्यांचा मृत्यू नाम्यात लिहून ठेवलं होतं.

आश्चर्याची गोष्ट आहे की चंगेज खानने आपल्या मृत्यूनाम्यात त्याच्या मृत्यूनंतर त्याची कोणतीही खूण पृथ्वीवर ठेवायची नाही असं म्हटलं होतं.

त्याने त्याच्या साथीदारांना आदेश दिला होता की जेव्हा त्याचं निधन होईल तेव्हा त्याला अश्या ठिकाणी पुरावं ज्याबद्दल कोणाला ठाऊक नसेल. त्याला गाडल्यावर त्याच्या सैनिकांनी घोड्यांना पळवून जमीन सपाट करून घेतली. जेणेकरून कोणाला समजणार नाही.

 

changez-khan-inmarathi

 

मंगोलियामध्ये राहणाऱ्या चंगेज खानचा मृत्यू होऊन ८ पेक्षा जास्त शतकं उलटली आहेत. परंतु अजूनही त्याची कबर वा कुठलीच निशाणी सापडली नाही.

नॅशनल जियोग्राफिकने सॅटेलाईटच्या माध्यमातून त्याच्या कबरीला शोधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्या हाती निराशा आली. मजेदार गोष्ट ही आहे की एकीकडे विदेशी लोकांना चंगेज खानच्या कबरीचा शोध घ्यायचा होता.

त्यासाठी ते वेगवेगळे उपकरणं व तंत्रज्ञान वापरत होते. तर दुसरीकडे मंगोलियाच्या लोकांचा मात्र याला विरोध होता. ते तसं करण्यासाठी तयार नव्हते.

त्यांच्या मते चंगेज खानची कबर खोदल्यास जग नष्ट होईल. लोकांनी याचा अनुभव एकदा घेतला आहे, म्हणून त्यांच्या मनात ती भीती निर्माण झाली.

असं म्हटलं जातं की सोव्हिएत संघाने चौदाव्या शतकातील तुर्की – मंगोलशासक तैमुर लंग याच्या कबरीला उघडलं होतं. तेव्हा नाझी सैनिकांनी त्यांना पळवून लावलं होतं.

यामुळे इच्छा नसतांना देखील सोविएत संघाला दुसऱ्या महायुद्धात उतरावं लागलं होतं. यामुळे त्या लोकांना असं वाटतं की चंगेज खानच्या कबरीला पुन्हा बाहेर काढण्यात येऊ नये.

काही जाणकार लोक याला चंगेज खान प्रति लोकांच्या मनातील भावना मानतात. चंगेज खानची अशी इच्छा होती की त्याची कुठलीच आठवण पृथ्वीवर राहू नये. त्यामुळे लोक आजही त्याच्या भावनेचा सन्मान करत आहेत.

 

changez-inmarathi

 

ज्या लोकांना चंगेज खानची कबर शोधण्याची इच्छा होती त्या लोकांसाठी हे कार्य सोपे नव्हते. चंगेज खानची प्रतिमा एकतर जुन्या नाण्यावर आढळते अथवा वोडक्याच्या बॉटलवर.

बाकी असं कुठलंच निशाण नाही, जिथे त्यांना मदत मिळू शकेल. रकबेच्या हिशोबाने मंगोलियाचे आकारमान इतकं मोठं आहे की त्यात ७ ग्रेट ब्रिटन समावतील.

आता एवढ्या मोठ्या देशात ज्या गोष्टीचा नामोनिशाण नाही अश्या कबरीचा शोध घेणे म्हणजे निव्वळ मूर्खपणाचे आहे. भरीस भर मंगोलिया एक मागास देश आहे. तिथल्या पहाडी भागात तर रस्ते देखील नाहीत.

९० च्या दशकात जपान आणि मंगोलियाने एकत्र येत चंगेज खानच्या कबरीला शोधण्याच्या प्रोजेक्टला हाती घेतलं. त्या प्रोजेक्टचे नाव गुरवान गोल होते. या प्रोजेक्ट मध्ये त्यांनी चंगेज खानचे जन्मठिकाण खेनती शहरात संशोधन केले होते.

परंतु या कालावधीतच मंगोलियात झालेल्या लोकशाही क्रांतीमुळे तेथील कम्युनिस्ट शासन जाऊन लोकशाही शासनव्यवस्था रुजली होती. नव्या सरकारने “गुरवान गोल” प्रोजेक्ट बंद केला.

मंगोलियाच्या ऊलांबटोर विद्यापीठाच्या डॉ दीमजाव एर्डेनबटर यांनी २००१ साली जिंगणू राज्यांचा कबरीचे खोदून, निरीक्षण करून याबाबतीत संशोधन करण्याचा प्रयत्न करत आहेत. असं म्हटलं जातं की जिंगणू राजे मंगोलांचे पूर्वज आहेत.

स्वतः चंगेज खानने या गोष्टीचा उल्लेख केला होता. त्यामुळे राजाच्या कबरीवरून अंदाजा लावला जात आहे की चंगेज खानचा मकबरा यांच्या मकबऱ्या प्रमाणेच असावा.

 

tomb-inmarathi

 

जिंगणू राजांच्या कबरी २० मीटर खोल आहेत. एका मोठ्या खोली सारख्या त्या आहेत. ज्यात खूप अनमोल वस्तूंचा साठा आहे. यात चिनी रथ, अनमोल धातू, रोमन काचेच्या वस्तू अश्या गोष्टींचा समावेश आहे.

असं म्हटलं जातं की चंगेज खानची कबर पण अशीच मौल्यवान धातू व जडजवाहीरातने भरलेली असेल. मंगोलिया मध्ये प्रचलित आख्यायिकांनुसार चंगेज खानला खेनती पहाडांच्या बुरखान खालडून नामक शिखरावर पुरण्यात आले आहे.

स्थानिक अख्यायिकेनुसार शत्रूंपासून स्वयं रक्षणासाठी तो तिथे लपला असावा आणि मेल्यावर त्याला तिथेच पूरण्यात आलं असेल. परंतु जाणकार लोक ही गोष्ट फक्त कथा असल्याचं म्हणतात.

ऊलांबटोर विद्यपीठात इतिहास शिकवणारे सोडनॉम सोलोमॉन म्हणतात की मंगोलियन लोक आपल्या पर्वतांना पवित्र मानतात. परंतु याचा अर्थ असा होत नाही की चंगेज खानला तिथेच पुरलं असेल.

या पहाडांवर राज परिवाराशिवाय इतर कोणालाच जायला परवानगी नाही. तो भाग मंगोलियन सरकारने संरक्षित केला आहे. युनेस्कोने सुद्धा त्याला जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे.

परंतु कोणीच आजवर सिद्ध करू शकत नाही की तिथे खरंच चंगेज खानची कबर आहे का नाही. चंगेज खान एक वीर व क्रूर यौद्धा होता. ज्याला तलवारीच्या बळावर विश्व विजय मिळवायचा होता. त्याने हजारो लोक कापले त्यामुळे अनेकांना तो राक्षस वाटायचा. पण तो मंगोल लोकांसाठी हिरो होता.

त्याने मंगोलियाला पुर्व आणि पाश्चात्य देशांशी जोडलं. सिल्क रोड तयार होण्याची संधी दिली. त्यानेच मंगोल लोकांना धर्म स्वातंत्र्य शिकवलं. त्याने त्याचा शासनकाळात कागदी चलन सुरू केले. टपाल सुरू केले. चंगेजखानने मंगोलियात सभ्य समाजाची निर्मिती केली.

 

Genghis-Khan-inmarathi

मंगोलियन लोक चंगेज खानचं नाव खूप आदराने घेतात. त्यांच्या मतानुसार चंगेज खानला स्वत:च नाव अमर करायचं होतं त्यासाठी त्याने त्याची कुठलीच निशाणी न ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

त्याला लोकांच्या मनात अमर व्हायचं होत, त्याला मकबरा बांधणं सहज शक्य होतं तरी ते त्याने केलं नाही. अस देखील लोक म्हणतात. तरी अजूनही त्याचा कबरीचा शोध सुरू आहे, जे मंगोल लोकांना या कारणामुळे आवडत नाही. त्यांच्या मते काळाच्या पडद्याआड गेलेल्या पात्राला पुन्हा रंग भूमीवर आणण्यात अर्थ नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?