' मद्याचे परीक्षण करताना डोळ्यांवर पट्टी का बांधतात? : मानसशास्त्राचे रंजक उत्तर – InMarathi

मद्याचे परीक्षण करताना डोळ्यांवर पट्टी का बांधतात? : मानसशास्त्राचे रंजक उत्तर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

वाईन हे द्राक्षांपासुन बनवले जाणारे मद्य जगभरात लोकप्रिय आहे. हजारो वर्षांपासुन या मद्याचे उत्पादन केले जात असल्याचे अनेक पुरावे अस्तित्त्वात आहेत.

नियमित कमी प्रमाणात वाईनचे सेवन अनेक आजारांवर गुणकारक असल्याचे मानले जाते. हे मद्य कोणतीही कृत्रिम पोषकतत्त्वे व आम्ले न वापरता फक्त द्राक्षे आंबवुन तयार केले जाते.

 

tea wine01-marathipizza
punchdrink.com

 

द्राक्षांच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार विविध प्रकारच्या वाईनस् बनवल्या जातात.

या मद्यनिर्मितीच्या प्रक्रियेत जरा अनोखा आणि कुतूहलाचा विषय ठरते ती चवीच्या परीक्षणाची क्रिया. ज्यात डोळे बांधुन चवीचे परीक्षण केले जाते. या अनोख्या क्रियेमागे काही वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय कारणे आहेत.

आपल्याला चव कळते ती स्वादग्रंथींमध्ये असणाऱ्या संवेदन पेशींमुळे. आपली जीभ, घसा आणि तोंडामधील त्वचेत जवळपास पाच हजार स्वादग्रंथी असतात आणि प्रत्येक ग्रंथीमध्ये पन्नास ते शंभर संवेदन पेशी असतात.

या पेशी पाच मुलभुत चवींपैकी एका चवीचे प्रतिनिधीत्त्व करतात. चव ओळखण्याचे कार्य या पेशी तसेच तोंडातील द्रव्य आणि जिभेवर होणाऱ्या रासायनिक व भौतिक क्रिया करतात. तसेच पदार्थाचे तापमान व एकुण चव यांचे ज्ञान त्या पदार्थाच्या तोंडातील स्पर्शाच्या संवेदनांद्वारे होत असते.

वाईनची चव ही मेंदुतील सर्व संवेदकांचे मिळुन एक आकलन असते. जेव्हा आपण वाईन चाखतो तेव्हा आपल्या मेंदुतील संवेदना क्षमतांवर अतिरीक्त ताणाची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे मद्यातील विविध चवी आणि सुगंध नेमकेपणाने ओळखणे अवघड ठरते. अशावेळी मेंदु पूर्वी घेतलेल्या मद्याच्या वा इतर चवींच्या आकलनावर अवलंबुन राहतो व त्यानुसार निर्णय घेतो.

 

wine-blind-inmarathi
ohfun.net

 

जर व्हाईट वाईनमध्ये लाल रंग मिसळुन ती चाखायला दिली तर बरेच लोक तीची चव आणि सुगंधावरून ती रेड वाईन असल्याचा निष्कर्ष काढतात. यावरून आपल्याला चवी ओळखताना मेंदूची होणारी गल्लत लक्षात येते.

वरील क्रिया ही मेंदुतील अलफक्टरी बल्ब या भागाशी निगडीत आहे. हा भाग भावना व आठवणींना कारणीभुत असतो.  एखादा सुवास, रंग किंवा चव या भागास कार्यान्वित होण्यास भाग पाडू शकतो. त्यामुळे एखाद्या विशिष्ट रंग वा चवीचे आकलन होताना भूतकाळातील आठवणींचा व भावनांचा त्यात सहभाग असतो. या भावना किंवा आठवणी मद्याचे परीक्षण करताना अडथळा ठरतात.

मद्याचे चवीचे परीक्षण करताना ते अधिकाधिक काटेकोर होण्यासाठी परीक्षण करणाऱ्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते.

या पद्धतीमुळे मद्याचा रंग, पोत, किंमत अशी कोणतीच दृश्य माहिती मेंदुला मिळत नाही. त्यामुळे त्या माहितीशी आधारीत आठवणींवर अवलंबुन न राहता मेंदु इतर संवेदना क्षमतांवर अधिक लक्ष केंद्रित करतो.

या क्रियेमुळे स्वादग्रंथींवर सर्व लक्ष केंद्रित होऊन चवीचे अधिक योग्य परीक्षण होते.

 

Wine taste better with age.Inmarathi1
nzwine.com

 

थोडक्यात डोळ्यावर पट्टी बांधुन मद्य चाखल्याने त्याच्या चवीचे आकलन भुतकाळातील आठवणी व भावनांच्या आधारे न होता संवेदन व बौद्धिक क्षमतांच्या आधारे होते. तसेच या पद्धतीमुळे मेंदुमध्ये नवनवीन चवींच्या ज्ञानाची भर पडते. त्यामुळे व्यक्तीच्या चव घेण्याच्या व त्याबद्दल विचार करण्याच्या क्षमतेचा सतत विकास होत राहतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?