' नखावर असलेलं अर्धचंद्र तुमच्या आरोग्याबद्दल देतंय महत्वाची माहिती, वाचा… – InMarathi

नखावर असलेलं अर्धचंद्र तुमच्या आरोग्याबद्दल देतंय महत्वाची माहिती, वाचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

आपला चेहरा, आपल्या कपाळावरच्या आठ्या तसेच आपल्या हातावरच्या रेषा आपलं भविष्य वर्तवत असतात, म्हणूनच या तिन्ही गोष्टी कालांतराने बदलतात त्याचं कारण हेच असतं की आपलं नशीब सुद्धा बदलत असतं!

 

jyotish inmarathi

पण जसं या हातावरच्या रेषा काहीतरी सांगत असतात तसंच तुमच्या बोटांची नखं सुद्धा काहीतरी सांगत असतात हे तुम्हाला ठाऊक आहे का?

या गोष्टीचा तुम्ही कधी विचार देखील केला नसेल, पण हो, ही नखं सुद्धा खूप महत्वाचं असं काहीतरी दर्शवत असतात!

नखं हा महिलांचा अत्यंत आवडता विषय. आपलं सौंदर्य खुलवणा-या नखांची रंगरंगोटी, त्याचा आकार यांबाबत महिला सजग असतात, मात्र सौंदर्यापलिकडे ही नखं आपल्या आरोग्याचा लेखाजोगा मांडतात.

आपल्या नखांकडे जर कधी आपण निरखून पाहिलं तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारची काही चिन्हे आढळतात. या सगळ्या चिन्हांमध्ये उठून दिसणार चिन्ह म्हणजे आपल्या नखांच्या तळाशी असणारे अर्धचंद्र.

ही अर्धगोलाकृती चिन्हे अर्धचंद्रासारखे दिसतात म्हणून त्यांना मराठीत अर्धचंद्र अस म्हटलं जातं.

 

nails inmarathi

 

अनेकांच्या नखाच्या रंगापेक्षा वेगळे उठून दिसणारे काहीसे पांढरट हस्तिदंती रंगाचे आणि पूर्णपणे विकसित दिसणारे असे अर्धगोल असतात. याचं स्वरूप व्यक्तीपरत्वे बदलत ही जातं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

काय दर्शवतात हे अर्धचंद्र? या चिन्हांचा काही खास किंवा वेगळा अर्थ होतो का? याबाबत फारशी  माहिती तुम्ही ऐकली नसेल.

काही व्यक्तींच्या नखांवर ही चिन्हे अजिबात आढळत नाही. मात्र काही व्यक्तींच्या नखावर अशी चिन्हे स्पष्टपणे उठून दिसतात. याचा खरंच काही अर्थ होतो का याचं उत्तर होकारार्थी द्यावं लागेल.

 

nail-inmarathi

 

ज्योतिषशास्त्र, पामिस्ट्री अशा गूढ शास्त्रांमध्ये आणि देशोदेशीच्या आरोग्यशास्त्रांमध्ये या अर्धचंद्राकृती चिन्हांचा वापर करून व्यक्तीच्या स्वभावाबद्दल, भविष्याबद्दल, आरोग्याबाबत प्रश्नांची उकल केली जाते.

जाणून घेऊया या चिन्हांबाबत असलेली रंजक माहिती..

१. लॅटीन भाषेत “लुनुला” इंग्रजी मध्ये “क्रीसेंट व्हाईट” किंवा “लिटील मून” या नावाने ओळखली जाणारी अर्धचंद्राकृती चिन्हे हर एक व्यक्तीच्या नखांवर असतात. मात्र अनेकदा त्वचेच्या आवरणाखाली झाकली गेली असल्यामुळे दिसत नाहीत.

ही चिन्हे वातावरण, व्यक्तीची जडणघडण, व्यक्तीचा आहार, पालनपोषण अशा कारणांमुळे विकसित होतात किंवा अजिबात होत नाहीत. मात्र काही व्यक्तींच्या नखांवर ती स्पष्टपणे दिसून येतात.

 

nail trauma inmarathi

२. या अर्धचंद्राकृती चिन्हांचा सर्वात मोठा उपयोग निरनिराळ्या आरोग्यशास्त्रात व्यक्तीचे आरोग्य कशा प्रकारचे आहे हे ठरवण्यासाठी करतात.  हाताच्या १० ही बोटांच्या नखांवर दिसणारे हस्तिदंती रंगाचे पांढरे स्वच्छ अर्धगोल हे व्यक्तीच्या चांगल्या आरोग्याचं द्योतक मानलं जातं.

असे विकसित अर्धचंद्र व्यक्तीच्या थायरॉईड ग्लँडचं आरोग्य चांगलं आहे हे सांगतात. याउलट पिवळसर, निळसर दिसणारे अर्धचंद्र व्यक्तीला डायबेटीस असल्याची शक्यता दर्शवतात.

लाल दिसणारे अर्धचंद्र हे हृदयाचे आरोग्य बिघडल्याचे लक्षण मानले जाते.

संपूर्णपणे काळ्या रंगाचे अर्धचंद्र हे व्यक्तीला अत्यंत गंभीर स्वरूपाचे आजार आहे असे दर्शवतात.

अर्थात हे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत खरे असेल असे नाही. ढोबळ मानाने जर नखांवरची अर्धचंद्राकृती चिन्हे स्वच्छ पांढऱ्या रंगाची न दिसता पिवळसर, निळसर, लालसर किंवा संपूर्णपणे काळी अशी दिसत असतील तर व्यक्तीने याबाबत जरूर एकदा वैद्यकीय सल्ला घ्यावा.

 

nails-circles-inmarathi

 

३. प्रत्येक नखाच्या तळ भागाशी अशी चिन्हे असतील असे नाही. सामान्यतः दोन्ही हातांच्या सर्व बोटांवर अथवा किमान ७ ते ८ बोटांच्या नखांवर अशी अर्धचंद्रे असणं उत्तम आरोग्याचं लक्षण मानलं जातं.

४. जर व्यक्तीच्या सर्व बोटांवर अशी स्वच्छ पांढऱ्या रंगाचे अर्धगोल असतील तर ते व्यक्तीची पचनक्रिया उत्तम असण्याचे लक्षण मानले जाते. तसेच अशा व्यक्ती इतर व्यक्तींपेक्षा जास्त उत्साही असतात.

याउलट जर पिवळसर आणि नीट न विकसित झालेले अर्धगोल व्यक्तीच्या सुस्त आणि आळशी स्वभावाची झलक मानतात. असे अर्धचंद्र हातावर अजिबात न दिसणे म्हणजे व्यक्तीची पचनसंस्था नीट काम करीत नाही असा त्याचा अर्थ होतो.

५. हा मानवी त्वचेच्या आवरणाखालचा ५ वा ६ वा थर असतो त्यामुळे दिसण्यास तो पूर्णपणे फिक्कट दिसतो. कधी कधी तो त्वचेच्या आवरणाखाली झाकला देखील जातो. नखांचा शेवटचा भाग असल्याने हा नाजूक असतो.

६. ज्योतिष शास्त्रामध्ये आणि पामिस्ट्री मध्ये देखील अशा अर्धचंद्रांना अनन्यसाधारण महत्व आहे. असे मानले जाते की हाताच्या ८ किंवा १० ही बोटांच्या नखावर अशा प्रकारची चिन्हे असणारी व्यक्ती भाग्यवान असते.

 

circles-inmarathi

 

अशा व्यक्तीला सुरुवातीला आयुष्यामध्ये खूप परिश्रम घ्यावे लागतात. मात्र अशा व्यक्ती आयुष्याच्या उत्तर काळात त्यांच्या कर्तृत्वाने जीवन भरभराटीला आणतात. अशा व्यक्तीच्या नशिबात जोडीदाराचे सुख देखील चांगले असते असे काही ज्योतिषी मानतात.

अशा रीतीने व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा आणि आरोग्याचा लेखाजोखाच या अर्धगोलाकार चिन्हांच्या द्वारे एकंदर दाखविला जातो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?