' पहिल्या पावसात भान हरपून टाकणारा मातीचा सुवास कुठून येतो? – InMarathi

पहिल्या पावसात भान हरपून टाकणारा मातीचा सुवास कुठून येतो?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

यंदाचं वर्ष ‘पावसाळी’ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या वर्षात निसर्गाच एक वेगळंच रूप बघायला मिळालं. खरंतर पावसाळा हा ऋतु सगळ्यांना आवडणारा आहे, पण या वर्षातलं पावसाच रूप बघता देशातल्या अनेक भागांना पाऊस नकोसा झालाय.

पावसामुळे या वर्षात शेतमालाच सुद्धा नुकसान झालंय. अनेक शहरांना पावसाने तडाखा दिलाय.

पहिल्या पावसाची ओढ ही प्रत्येकालाच असते. शेतकरी तर चातकासारखी पावसाची वाट बघत असतो. मे महिना संपल्यानंतर जूनमध्ये मान्सून कधी येतोय याची सगळे आतुरतेने वाट बघत असतात.

 

rain inmarathi

 

मे महिन्यातला उन्हाने अंगाची काहिली झाली असते. मुंबईत तर घामाने वैताग आणलेला असतो. अशातच जून उजाडतो आणि पहिला पाऊस कधी पडतोय याची सगळे आतुरतेने वाट बघतात.

पावसाळा म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात कांदाभजी आणि गरम चहा. वर्षभरात इतर कोणत्याही वेळी हे पदार्थ खाल्ले तर त्याची एवढी मज्जा येत नाही जेवढी पावसाळ्यात येते. त्यामुळे पहिलं पाऊस हा अनेकांसाठी खास असतो.

मे महिन्यापासून आपली शॉपिंग सुरू होते. मग छत्र्या, रेनकोट आणि अशा बऱ्याच गोष्टी आपण खरेदी करतो. त्यामुळे पहिल्या पावसाची गंमत ही निराळीच असते.

 

rain marine drive mumbai inmarathi
blogs.wsj.com

 

पहिला पाऊस पडला की, मातीचा इतर सर्व सुगंधांहून वेगळा सुवास आपल्याला धुंद करून जातो. मात्र असा कुठल्याही अत्तराच्या कुपीत नसलेला हा सुगंध कसा तयार होतो, असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडलाय का? पावसाकडून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या कवींनी खूप रम्य कविता रचल्या आहेत.

मग ते ना. धो. महानोरांचे ‘जाई जुईचा गंध मातीला’ हे गीत असो किंवा शांताबाईंच्या भरून भरून आभाळ आलंय मधल्या,

‘शकुनाचा आला वारा,
माझ्या मनात ओल्या धारा,
आला वास ओला,
मातीचा सोयरा’

या ओळी असोत..

कित्येक कवींना या पावसाने, मातीच्या सुवासाने लिहितं केलंय. पण हा सुगंध मातीत कोण पेरतं हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? त्याचं उत्तर शोधायचा कधी प्रयत्न केला आहे?

 

rain-inmarathi
roadcompass.org

 

मातीचा गंध हा वेगवेगळ्या कारणांमुळे येतो.

यापैकी मातीचा एक प्रकारचा सुगंध हा विशिष्ट जीवाणूंमुळे निर्माण होतो. माती वरून कोरडी दिसत असली तरी आत थोडा ओलावा असतो. त्यात असिनोमायसेटिस नावाचे जीवाणू वेटोळे करून राहात असतात. जेव्हा जमीन वाळते तेव्हा हे जीवाणू मातीचे स्पोअर्स (बीजूक) तयार करतात.

जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा असिटिनोमायसेटिसच्या जीवाणूंचे स्पोअर्स हवेत उधळतात. पावसाच्या पाण्यातील बाष्प आणि पाऊस हे एरोसोल या एअर फ्रेशनर सारखे काम करतात.

हे एरोसोल थेट आपल्या नाकापर्यंत भिजलेल्या मातीचा सुगंध घेऊन येतात. या स्पोअर्समध्ये मातीचा सुवास असतो. हे जीवाणू जगभर आढळतात. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर गोडसर असा वास येतो त्याचा संबंध आपण पावसाशी जोडतो.

हे जीवाणू ओलाव्यात वाढतात मात्र जमीन पावसाच्या पाण्याने भिजून माती कोरडी व्हायला लागली की सुगंध हवेत सोडतात.

 

rainy-inmarathi.
steemit.com

 

पावसाच्या आम्लतेमुळेही वेगळ्या प्रकारचा वास निर्माण होतो. वातावरणातील रसायनांमुळे विशेषतः शहरी भागांतील पावसाचे पाणी काही प्रमाणात आम्लधर्मी बनते.

हे पाणी मातीवर पडल्यानंतर त्या आम्लधर्मी पाण्याशी मातीतील रसायनांची अभिक्रिया होते व सुवास निर्माण होतो. पावसाच्या पाण्यामुळे जमिनीतील माती मोकळी होते. भूगर्भातील खनिजे या पाण्याने सुटी होऊन त्यांची अभिक्रिया गॅसोलिनशी होते.

त्यामुळे अतिशय वेगळा उग्र वास येतो. बॅक्टेरिया स्पोअर्समुळे निर्माण झालेला वास हा मनाला प्रसन्नता देणारा असतो. या अभिक्रियेतून येणारा वास हा विचित्र दर्प असल्यासारखा असतो.

म्हणूनच पाऊस पडल्यावर येणारा वास हा प्रत्येक वेळी सुवास नसतो. जीवाणूंच्या स्पोअर्समुळे येणाऱ्या सुगंधासारखाच हा दर्प सुद्धा लक्षणीय असतो.

 

soil smell inmarathi

 

याशिवाय पावसामुळे तिसऱ्या प्रकारचा वासही तयार होतो. हा वास वनस्पती व झाडे जे तेल उत्सर्जित करतात त्यापासून निर्माण होतो. हे वनस्पतींनी उत्सर्जित केलेले तेल खडकावर पडते.

त्या तेलाची सेंद्रिय व इतर रसायनांशी म्हणजे गॅसोलिनशी अभिक्रिया होते आणि वायू उत्सर्जित होतो.

हा गंधही जीवाणूंच्या स्पोअर्ससारखा आनंददायी व ताजेतवाने करून सोडणारा असतो. हा त्याच्या सुगंधामुळे बाटलीत भरून विकलादेखील जातो.

 

rainfall-head-inmarathi
geek.com

 

हे काही सर्वसाधारणपणे पावसानंतर जमिनीतून येणारे वास आहेत. याशिवाय देखील इतर काही वास पावसानंतर पसरतात.

मित्रमैत्रिणींशी पावसानंतरच्या गंधांबद्दल बोलत असाल तेव्हा कदाचित तुम्हाला एक सांगायचं असेल आणि तुमच्या मित्राला काही वेगळंच वाटत असेल, पण पावसानंतर वातावरणात एक विशिष्ट सुवास भरून राहिलेला असतो यावर तुमचं निश्चितच एकमत होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?