' ‘हे’ पदार्थ फ्रीजमध्ये न ठेवलेत तरच उत्तम ! – InMarathi

‘हे’ पदार्थ फ्रीजमध्ये न ठेवलेत तरच उत्तम !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजकाल प्रत्येक घरात फ्रीज असतोचं. फ्रीज असला की कसलं टेन्शन नाही बुवा ! सगळ्या वस्तू त्यात ठेवल्या की जणू त्या अमर होऊन जातात असचं आपण समजतो. फळे, भाज्या, दुध असं काहीही (खाण्यायोग्यचं) आपल्या फ्रीजमध्ये भरून ठेवलेलं असतं. काही-काही घरातील फ्रीज तर इतके गच्च भरलेले असतातं की विचारायची सोय नाही ! बरं, पण या फ्रीजचा आविष्कार आपल्या मानवजातीच्या चांगलाच कामी आलायं हे देखील तितकचं खरं ! तर अश्या या बहुपयोगी असणाऱ्या स्वत:च्या फ्रीज मध्ये काय ठेवावे काय ठेवू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आज आम्ही तुम्हाला अश्या काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले नाहीत तरच उत्तम !

refrigerator-marathipizza01

स्रोत

केळी: केळी जर फ्रीजमध्ये ठेवली तर केळी पिकण्याची प्रक्रिया मंदावते आणि त्यामुळे केळ्याची साल काळी पडते. याउलट केळी फ्रिजमध्ये न ठेवता घरात इतरत्र ठेवल्यास अजून काही काळ ती चांगली राहू शकतात.

टोमॅटो: टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्यास टोमॅटोच्या चवीमध्ये फरक पडतो. Refrigeration प्रक्रिया सतत सुरु असते. त्यामुळे अस्थिर संयुगांच्या Reaction मुळे टोमॅटोची मूळ चव बिघडते.

बटाटी: बटाट्याला थंड हवामान मानवते, पण अतिथंड नाही ! फ्रीजचे तापमान अतिशय कमी असेल आणि त्यात बटाटी ठेवली गेली असतील तर बटाट्याची मूळ चव बिघडते तसेच सालीवर देखील डाग निर्माण होतात. त्यामुळे जर बटाटी फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ती प्लास्टिक पिशव्यांमध्ये घालून मगच फ्रीजमध्ये ठेवावीत.

refrigerator-marathipizza02

स्रोत

कांदे: कांदे आणि बटाटी फ्रीजमध्ये बाजूबाजूला ठेवू नयेत, कारण दोन्ही पदार्थ गॅस बाहेर सोडतात. या गॅसच्या Inter-Reaction मुळे कांदे आणि बटाटी दोन्ही खराब होण्याची शक्यता असते.

आले: आले खूप वेळ फ्रीजमध्ये ठेवले असेल तर ते कापल्यावर अनेकदा त्यावर डाग पडल्याचे दिसून येते आणि कुबट वास येतो. फ्रीजमध्ये आले ठेवल्यास त्याच्या बाहेरच्या सालीवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे जोवर आले कापून बघत नाही तोवर कळत नाही की ते खराब झाले आहे किंवा नाही.

ब्रेड: फ्रीज ब्रेडमधली आर्द्रता (moisture) शोषून घेते, ज्यामुळे ब्रेड वेळेआधीच शिळा होऊ शकतो. त्यामुळे ब्रेड ठेवायचाच झाल्यास तो प्लास्टिक पिशवीमध्ये गुंडाळून ठेवावा.

मध: मध फ्रीजमध्ये ठेवल्यास साखरेच्या स्फटिकांची प्रक्रिया जोरात सुरु होते आणि त्यामुळे मधावर द्रवसदृश्य थर जमा होतो.

refrigerator-marathipizza03

स्रोत

कॉफी: ब्रेडप्रमाणेच कॉफी फ्रीजमध्ये ठेवल्यास फ्रीज कॉफीमधली आर्द्रता (moisture) शोषून घेते, त्यामुळे कॉफीमधली चव निघून जाते.

तुळस: तुळस फ्रीजमध्ये ठेवल्यास तापमानातील फरकामुळे तिची पाने पिवळी पडतात आणि तुळस निरुपयोगी होते.

 

 जो फ्रीज नाशवंत पदार्थ टिकावे म्हणून बनवला गेला होता, तोच फ्रीज त्याचं पदार्थांच्या खराब व्हायला कारणीभूत होत असेल तर कठीण आहे रे बाबा !

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?