' तुमची आयुष्यभराची पुंजी बॅंकेत लॉकरमध्ये ठेवण्यापुर्वी या खास बाबी लक्षात घेतल्या तरच निर्धास्त रहाल

तुमची आयुष्यभराची पुंजी बॅंकेत लॉकरमध्ये ठेवण्यापुर्वी या खास बाबी लक्षात घेतल्या तरच निर्धास्त रहाल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

बँक लॉकरकडे आपण एक सुरक्षित गोष्ट म्हणून पाहतो, जेथे आपल्याकडे असणाऱ्या सर्व मौल्यवान वस्तू सुरक्षित आहेत अशी आपली खात्री असते. कोणाकडे दागिने असतील, प्रोपर्टीची कागदपत्रे असतील किंवा काही महत्त्वाची अमुल्य ठेव असेल, तर तो व्यक्ती सहसा अश्या वस्तू बँक लॉकरमध्येच जमा करेल, कारण बँकेवर त्याचा पूर्ण विश्वास असतो आणि तेथे आपल्या वस्तूला काही धोका नाही असा त्याच ‘समज’ असतो. समज का?

कारण तुम्हाला वाटतं त्याप्रमाणे बँक लॉकरमध्ये तुम्ही ठेवलेल्या वस्तू तितक्या सुरक्षित नाहीत. कारण बँकेवर दरोडा पडला आणि बँक लॉकर मधल्या वस्तू चोरीला गेल्या की तुम्हाला त्याची भरपाई मिळू शकत नाही. अहो कायदाचं आहे तसा!!!

 

bank-locker-law-marathipizza01

 स्रोत

Indian Contract Act च्या Section 152 नुसार बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या कोणत्याही वस्तुची हानी झाल्यास अथवा ते गहाळ झाल्यास बँक त्यास जबाबदार राहणार नाही.

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या guidelines नुसार बँक लॉकरमध्ये असलेल्या वस्तूंची जबाबदारी बँकेची नाही, तर त्यांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे ही बँकेची जबाबदारी आहे. बँक लॉकरमध्ये काय आहे हे बँकेला ठावूक नसते, तसेच ती वस्तू बँकेच्या मालकीची देखील नसते त्यामुळे आपसूकच केवळ ग्राहकांच्या सोयीसाठी त्या वस्तूंचे संरक्षण करणे बँकेला बंधनकारक आहे.

bank-locker-marathipizza02jpg

स्रोत

या बाबतीत ग्राहक न्यायालयात दाद मागू शकतो. परंतु त्याला हे पुराव्यासकट सिद्ध करावं लागेल की संपूर्ण प्रकरणात बँकेचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे किंवा बँकेमधील कोणी व्यक्ती दरोड्याशी संबधित आहे. तरच बँकेकडून त्या व्यक्तीला नुकसानभरपाई मिळू शकते. पण हे देखील सर्वस्वी न्यायालयीन निकालावरच अवलंबून आहे.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?