'महाराष्ट्राच्या उद्योग जगात एक scam घडून गेलाय - आणि आपल्याला कळालं पण नाही

महाराष्ट्राच्या उद्योग जगात एक scam घडून गेलाय – आणि आपल्याला कळालं पण नाही

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

महाराष्ट्राच्या उद्योग जगात एक मोठा scam घडून गेलाय. कोणत्याही नव-उद्योजकाच्या मस्तकात तिडीक जाईल असा. पण ना माध्यमांना खंत ना कार्यकर्त्यांना सोयरसुतक.

काय घडलं माहितीये?

महाराष्ट्र सरकारने “महाराष्ट्र स्टार्टअप वीक” नावाच्या उपक्रमाची घोषणा केली. आत्ता नव्हे – कितीतरी महिन्यांपूर्वी.

किती जणांनी जाहिराती, अवेअरनेस कॅम्पेन बघितलं सांगा बरं? भल्या मोठ्या “मेक इन महाराष्ट्र” इव्हेन्ट्स करताना, हजारो कोटींचे तथाकथित कॉन्ट्रॅक्टस करताना – ज्याचा सामान्य उद्योजकांशी काहीही संबंध नसतो – ढोल बडवून बडवून जाहिरातबाजी होते. पण तळागाळातल्या उद्योजकांना –

“सुरुवातीच्या काळात मदतीचा हात, गरजेनुसार फंडिंग, योग्य तज्ज्ञांचं मार्गदर्शन”

देणाऱ्या “स्टार्टअप वीक”चं आयोजन केलं जातं, तेव्हा त्याची अजिबातच जाहिरात होत नाही! त्रोटक बातम्या – त्या पण प्रामुख्याने इंग्रजी वृत्तपत्रांत – येतात बस्स.

 

maharastra-startup-week-inmarathi
technologyforyou.org

तर असा हा उपक्रम राबवून झाला. त्यासाठी नावनोंदण्या झाल्या.

आणि दोन दिवसांपूर्वी निवडलेल्या “स्टार्ट अप्स” ची यादी जाहीर झाली.

कोण होतं यादीत?

स्किलसीखो.कॉमचे संस्थापक, कुणाल गडहिरे, ह्यांनी दिलेली माहिती बघा :

===

महाराष्ट्र राज्य शासनाकडून आयोजित महाराष्ट्र स्टार्टअप वीकमध्ये , पार्टनर कंपन्यांकडून आपल्याच पोर्टफोलिओ मधील आणि ओळखीतल्या स्टार्टअप निवडण्याचा, निवडप्रक्रियेत नियम धाब्यावर बसवण्याचा, आणि महाराष्ट्राबाहेरील ३२ स्टार्टअप्सना निवडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

१] टाटा ट्रस्टच्या ” सोशल अल्फा ” या संस्थेची महाराष्ट्र स्टार्टअप वीक साठी स्ट्रॅटेजी पार्टनर म्हणून निवड करण्यात आली होती. यासोबत आणखी संस्था सुद्धा पार्टनर म्हणून आहेत.

२] १९ जून रोजी या कार्यक्रमांतर्गत निवडण्यात आलेल्या १०० स्टार्टअपची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

३] निवडण्यात आलेल्या १०० स्टार्टअप पैकी तब्बल ३२ स्टार्टअप्स हे महाराष्ट्राबाहेरच्या राज्यांतील आहेत. कर्नाटक, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, इत्यादी राज्यांमध्ये रजिस्टर असलेले स्टार्टअप येथे निवडण्यात आलेले आहे. या यातील

४] महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या स्टार्टअपमध्ये मराठी उद्योजकांच्या स्टार्टअपची संख्या हि कमी आहे.

५] सरकारी नियम डावलून सात वर्षांपेक्षा जास्त कालावधी असलेल्या स्टार्टअपची निवड करण्यासोबतच, याआधीच नामांकित कंपन्यांकडून इन्क्युबेशन, मेन्टॉरिंग मिळवलेल्या, करोडो रुपयांची फंडिंग मिळवलेल्या स्टार्टअप्सची निवड केलेली आहे.

६] टाटा ट्रस्ट च्या सोशल अल्फा या संस्थेकडून, थेट फंडिंग मिळवलेल्या चार – स्टार्टअप्सची सुद्धा निवड केली आहे. या पाच संस्थासहित एकूण पंधराहून जास्त स्टार्टअप्सनि इन्वेस्टर्सकडून फंडिंग मिळवलेली आहे. अनेक स्टार्टअप्सनी मिळवलेली हि फंडिंग करोडो रुपयांच्या घरात आहे. काही स्टार्टअप्सना कार्क्रमातील इन्व्हेस्टमेंट पार्टनर असलेल्या Indian Angel Network कडून किंवा त्यांच्या नेटवर्क मधून आधीच फंडिंग मिळालेली आहे.

७] महाराष्ट्रातून निवड करण्यात आलेले जवळपास सर्व स्टार्टअप्स हे मुबंई, मुंबई उपनगर , पुणे आणि अपवादात्मक एक – दोन स्टार्टअप नाशिकमधील आहेत. नाशिकमधील स्टार्टअप्स हे सुद्धा TCS Foundation ने सुरु केलेल्या Digital Impact Square कडून इन्क्युबेट करण्यात येत असलेले आहेत.

या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमधील स्टार्टअप्सना निवडण्यात आलेल्या स्टार्टअप्स मध्ये स्थान नाहीये.

 

Startup-inmarathi
majhavidarbha.com

तब्बल साडेतीन वर्ष महाराष्ट्राची स्टार्टअप पॉलिसी जाहीर करण्यास उशीर केल्यानंतर राज्य शासनाकडून या महाराष्ट्र स्टार्टअप वीकचे आयोजन करण्यात आले होते. स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून आयोजित हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. मात्र तरीही त्यात महाराष्ट्राबाहेरील स्टार्टअप्सना प्राधान्याने निवडण्यात आलेले आहे. यातील बहुतांश स्टार्टअप ना त्यांच्या राज्यांकडून आधीच सपोर्ट मिळालेला आहे. अनेक स्टार्टअप हे या कार्यक्रमाच्या विविध पार्टनर्सच्या पोर्टफोलिओ मधील स्टार्टअप्स आहेत.

ज्या स्टार्टअप्सना आधीच इन्क्यूएबेशन, मेन्टॉरिंग, आणि फंडिंग अशा तिन्ही गोष्टी मिळालेल्या आहेत, ज्यांची उलाढाल कोटींच्या घरात आहे किंवा करोडो रुपयांची फंडिंग त्यांनी मिळवलेली आहे, त्यांच्या त्यांच्या राज्य शासनाकडून आधीच त्यांना सपोर्ट मिळत असताना पुन्हा महाराष्ट्र राज्य शासनाकडून त्यांना का निवडण्यात आले आहे ?

निवड करण्यात आलेल्या स्टार्टअप्सपैकी २४ बेस्ट स्टार्टअप्स ना राज्य शासनाकडून १५ लाख रुपयांपर्यंतचे कॉन्ट्रॅकट दिले जाणार आहे. याचा उद्देश हा आहे कि त्या स्टार्टअप्स ना कन्सेप्ट ऑफ प्रूफ साठी योग्य मदत आणि मार्गदर्शन मिळावे. पण वर म्हटल्याप्रमाणे अनेक स्टार्टअप्स ना आधीच इन्क्युबेशन पासून फंडिंग सुद्धा मिळालेली आहे. मग हि संधी महाराष्ट्रातील असे स्टार्टअप्स, ज्यांना अशा प्रकारची संधी, मार्गदर्शन आणि फंडिंग अद्यापही मिळालेली नाही, त्यांना मिळायला नको होती का ?

आज स्टार्टअप महाराष्ट्र यात्राच्या माध्यमातून, मराठी मुलांचे अनेक कल्पक आणि उत्तम दर्जाचे स्टार्टअप्स कनेक्ट होत आहेत. ते स्टार्टअप्स अशा संधीची अनेक वर्षांपासून वाट पाहत आहे. त्यांना का डावलण्यात आले ?

महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमांमध्ये या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या बातम्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आली नाहीत आणि या कार्यक्रमाची माहिती संपूर्ण राज्यामध्ये व्यवस्थित पोहचावी यासाठी योग्य तेवढे प्रयत्न का करण्यात आले नाहीत ?

महाराष्ट्रातील उद्योग संस्था, रोल मॉडेल असणारे मोठे उदयोजक, नेटवर्किंग संस्था यांनी एकत्र येऊन या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. मी सातत्याने प्रयत्न करत आहेच.

===

“फालतुगिरी” हा तसा उथळ शब्द आहे. पण हा शब्दसुद्धा वरील प्रकाराला व्यवस्थित डिफाइन करू शकत नाही, इतका चीड आणणारा प्रकार आहे हा.

ज्यांना कोट्यवधींची फंडिंग मिळाली आहे, मेंटरींग-हॅन्ड होल्डिंग सपोर्ट मिळाला आहे, ज्यांची सुरुवात होऊन गेली आहे आणि आता फक्त स्वतःला एस्टॅब्लिश करायचं आहे – अश्यांनाच पुन्हा निवडण्यात काय पॉईंट आहे? मुंबई-पुणे हाच आणि इतकाच आमचा महाराष्ट्र आहे का? एकीकडे मुंबई पुण्यातील गर्दीला नावं ठेवायची, तळागाळातील “रुरल” लोक आळशी असतात-उद्यमी नसतात असा र्हेटरीक रुजवत रहायचा – दुसरीकडे सरकारी रिसोर्स मात्र मोजक्याच “खास लोकांच्या खास माणसांसाठी” राखून ठेवायचे.

तुम्हाला बॉटम ऑफ पिरॅमिड ला कधी उभं राहूच द्यायचं नाहीये हे एकदाचं डिक्लेयरच करून टाका ना!

आधुनिक सरंजामशाहीच राबवायची आहे – सांगून टाका आम्हाला!

तसंही नवउद्योजक सरकार मदत करेल ह्या आशेवर नाहीतच. असतील तर त्यातून चटकन बाहेर पडावं. मुद्दा सरकारच्या आणि “आतल्या” लोकांच्या nexus चा आहे.

आम्ही जनतेसाठी फार फार काहीतरी करत असतो पण “साला पीपलच युजलेस आहेत” हे नंतर आम्हालाच सांगायला याल तेव्हा लाज वाटू द्या म्हणावं जरा. “नोकरी देणारे व्हा”, “प्रस्थापित मार्ग सोडून विचार करा” वगैरे पोपटपंची करण्याआधी हे स्वतःचं “कर्तृत्व” बघा म्हणावं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 186 posts and counting.See all posts by omkar

3 thoughts on “महाराष्ट्राच्या उद्योग जगात एक scam घडून गेलाय – आणि आपल्याला कळालं पण नाही

 • June 25, 2018 at 11:08 am
  Permalink

  मी स्वतः नोंदणी केली होती स्टार्टअप वीक मध्ये पण आमच्या स्टार्टअप ची निवड नाही करण्यात आली

  Reply
 • June 25, 2018 at 11:54 am
  Permalink

  खूप छान लिहिलंस मित्रा. खरच जा स्टार्टअप वीक स्टार्ट होण्याआधीच मी हा( बाळबोध) प्रश्न विचारला होता की ज्यांची उलाढाल ही 25 करोड पर्यंत आहे ते कसे काय स्टार्टअप मध्ये येतात.
  माझी वार्षिक सरासरी 12 लाख पण जात नाहीये पण प्रोजेक्ट मध्ये हजार कोटींची क्षमता आहे, सध्या शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींवर, सेंद्रिय शेती मध्ये माझ्या या स्टार्टअप मुळे खुप फायदा होत आहे, होणार आहे.
  तुझा हा लेख वाचुन खूपच हायसे वाटले, नाहीतर आपले selection झाले नाही म्हणून अत्यंत वाईट वाटत होते आणि खूप घृणा आणि रागही आला होता, या अशा चुकीच्या प्रणालीवर. तुझे कोटी कोटी आभार.
  सरकारने अशा उपक्रमांत एवढी नीच पातळी का गाठावी, आणि ज्याची समाजाला, गरजूंना आवश्यकता आहे त्यांना न देता अशा मोठया, प्रस्थापित आणि माहितीतील कंपन्यांना(स्टार्टअप????) देऊन त्यांना बहुतेक पूढील वाटचालीसाठी कोटींची उड्डाणे घ्यायची असतील बहुतेक. Because इंडिया इज शायनिंग ……!!
  DNI@VA
  +91 9209200090

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?