' देश विदेशातला ख्रिसमस - मेरी ख्रिसमस!

देश विदेशातला ख्रिसमस – मेरी ख्रिसमस!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

डिसेंबर सुरु झाला रे झाला की वेध लागतात ते ख्रिसमसच्या सुट्टीचे! ख्रिसमस / नातळ / ख्रिस्ती नववर्ष अश्या अनेक नावाने हा उत्सव ओळखला जातो. उत्सव म्हणलं की ओघओघाने आली सजावट, मग सजावटीची धूमधाम करायला आपण भारतीय लोक कुठे कमी पडतो का? – बिलकुल नाही!

पण आपल्या एक गम्मत म्हणून जर जगभरात ख्रिसमस कसा साजरा होतो ते बघायचं झालं तर?

christmas-marathipizza00

स्रोत

आम्ही आहोत ना?

जगभरातल्या १० अश्या ख्रिसमस उत्सवांबद्दल काही अश्या परंपरा की तुम्हाला ऐकूनच मजा येईल!

ऑस्ट्रेलिया मध्ये, सांताक्लॉज हा सर्फिंग बोर्डवरून येतो.

 

surfsanta

स्रोत

डिसेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात ऐन उन्हाळा असतो. आता उन्हाळ्यात सांता बर्फाच्या गाडीवरून येऊ शकत नाही नं. म्हणून हा सांता समुद्रावरून सर्फिंग सूट मध्ये सर्फिंग बोर्डवरून येतो. बघा म्हणजे सर्फिंग बोर्ड वरून “जिंगल बेल जिंगल बेल…” Cool न?

 

ऑस्ट्रिया मध्ये युवकवर्ग Krampus सारखी वेशभूषा करून लहान मुलांना घाबरवत रस्त्यांवरून फिरतात.

 

krampus

स्रोत

Krampus म्हणजे अर्धा शेळी आणि अर्धा राक्षस जो बदमाश आणि त्रास देणाऱ्या मुलांना शिक्षा देतो. तर युवकवर्ग अशाने लोकांना घाबरवतो. म्हणजे पोट्ट्यासोट्ट्याना वळण ही लागतं आणि धम्माल ही येतेच!

 

झेक रिपब्लिक मध्ये, स्त्रिया चेरीच्या झाडाची फांदी पाण्यात बुडवून ठेवतात. जर ती बहरली तर पुढच्याच वर्षी लग्न करतात.

 

cherry

स्रोत

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्त्रिया चेरीच्या झाडाची फांदी पाण्यात बुडवून ठेवतात आणि ती बहरण्याची वाट बघतात. ती बहरली की पुढच्या वर्षी लग्न करतात. म्हणजे हे बरंय!

 

डेन्मार्कमध्ये चावट Elf, Nisse लोकांच्या खोड्या काढतात.

 

nisse

स्रोत

Elf लोकांसाठी डेन्मार्क मधले लोक घराबाहेर लापशी किंवा सांज्याची एक वाटी ठेवतात. त्यांना ते एवढं आवडतं की जर elves ना ते दिलं नाही तर ते घरातील मुलांचे गिफ्ट्स चोरतात. अर्थात Elf आणि Nisse हि दोन्ही काल्पनिकच आहेत.

 

फ्रांस मध्ये तर लहान मुले आपले बुट शेकोटीपाशी ठेवतात आणि त्यांचा सांता – पेरे नोएल उपहारांनी भरतो.

 

france

स्रोत

फ्रांसचा सांता ख्रिसमसला सगळ्यांना खेळणी आणि फळे देतो असा नावलौकिक आहे. तो शेकोटीजवळ ठेवलेल्या लहान मुलांच्या बुटांमध्ये गिफ्ट्स ठेवतो.

 

ग्रेट ब्रिटन मध्ये लोक सांताक्लॉज ला पत्र लिहितात.

 

xmas-fireplace

स्रोत

लहान मुले सांताक्लॉज ला पत्रे लिहितात आणि टपालात टाकण्याऐवजी ते शेकोटीच्या मागे टाकतात. आणि ते पत्र सांता वाचून आपल्या अडचणी दूर आणि आपल्या मागण्या पूर्ण करेल अशी भाबडी आशा बाळगतात. ते पत्र दुसऱ्या दिवशी तिथे नसतं पण ते खरच सांतामामाकडे पोहोचतं की नाही हे कुणालाच कळत नाही!

 

नॉर्वे देशात लोक झाडू चेटकिणी पासुन घरात लपवून ठेवतात.

 

witch-riding-broomstick

स्रोत

नॉर्वे देशात चेटकिणी झाडू वरून फिरतात. उडण्यासाठी मंतरलेला झाडू वापरतात. आपल्या घरातला झाडू घेऊन कुणी चेटकीणीने घेऊन फिरू नये म्हणून नॉर्वे देशातील लोक झाडू लपवून ठेवतात.

 

मेक्सिको देशात लोक वर्ष संपत आलं म्हणून घरातल्या ताट आणि डिश फोडतात.

 

plates

स्रोत

मेक्सिकोच्या रस्त्यांवर लोक हातात पेटता कंदील घेऊन मेरी आणि जोसेफ ह्यांच्यासाठी निवारा शोधतात. असं करतांना प्रत्येक दरवाजा ठोठावून तिथे जागेसाठी विचारतात आणि त्यानंतर चर्चपाशी जाऊन चीनी मातीच्या ताटल्या फोडून वर्ष संपलं असं जाहीर करतात.

 

Micronesia देशात ख्रिसमसला एकमेकांना साबण देतात.

 

soap

स्रोत

इथे दोन साबणांचा बॉक्स गिफ्ट म्हणून ख्रिसमसला एकमेकांना देणे हा एक रिवाज आहे. चर्च मधली प्रार्थना संपल्यावर एकमेकांना साबण दिला जातो. साबणांची भेट एक मौल्यवान भेटवस्तू समजली जातोते.

 

भारतात ख्रिसमस साठी आंब्याच्या व केळीच्या झाडाला सजवलं जातं.

 

banana

स्रोत

भारतात प्रामुख्याने हिंदू समाज आहे, त्यातही ख्रिसमस जिथे साजरा होतो तिथे केळीचं झाड सजवलं जातं. कधीकधी आंब्याच्या झाडाच्या पानांनी घरात सजावट करतात.

काय मग? पुढल्या वर्षीचा नाताळ कुठल्या देशात साजरा करताय?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 46 posts and counting.See all posts by abhidnya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?