' कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री असं काय बोलले की पाकिस्तानला आनंदाचं भरतं आलंय? – InMarathi

कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री असं काय बोलले की पाकिस्तानला आनंदाचं भरतं आलंय?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक : अहमद शेख 

===

काश्मीर म्हटलं की काय आठवतंय तर आंतकवाद, दगडफेक, काश्मीरी पंडितांवरील अत्याचार! आणि हेच आपलं दुर्दैव आहे. धरतीवरच्या स्वर्गाची खरी ओळख ही अशा प्रकारे पुसली जाणं म्हणजे भारतासाठी धोक्याची घंटा आहे. भारताच्या या मुकूटाचा अशा प्रकारे अपमान करण्याचं काम नेहमीच होत आलंय. सध्या हे पाप केलंय एका काँग्रेसी नेत्यानं.

काश्मीरला घेऊन संपूर्ण काँग्रेसचीच भूमिका नेहमी वादग्रस्त आणि पाकिस्तानी धार्जिणे राहिलेली आहे. त्यामुळे त्यांचे नेतेतरी काय वेगळे गुण उधळणार !

काँग्रेसच्या सैफुद्दीन सोज नावाच्या एका वरिष्ठ नेत्याने एक पुस्तक लिहीलं कश्मीर-ग्लिम्प्सेज ऑफ हिस्ट्री एँन्ड द स्टोरी ऑफ स्ट्रगल. या पुस्तकात त्यांनी पाकिस्तानच्या तात्कालिन राष्ट्राध्यक्ष मुशर्रफच्या विधानाचं समर्थन केलंय. मुशर्रफच्या म्हणण्यानुसार काश्मीरमधील जनतेला स्वातंत्र्य हवंय. या विधानाचं सोज यांनी आपल्या या कसल्यातरी पुस्तकाच्या माध्यमातून केलंय. आता हे पुस्तक किती लोक वाचतील माहीती नाही पण सैफुद्दीन सोज यांना त्यांच्या थर्ड क्लास मानसिकतेनं प्रसिध्दी मात्र मिळवून दिली.

 

saifuddin-soz-inmarathi
dnaindia.com

काँन्ट्रोव्हर्सी करताना देखील काँग्रेसी नेते अक्कल वापरण्यात शून्य आहेत. काश्मीरचा प्रश्न नुकताच पेटलेला असताना अशावेळी या वादाला तोंड फोडणाऱ्यांचं तोंड का फोडू नये असा प्रश्न माझ्या सारख्या सर्वसामान्य भारतीय नागरिकाला पडतो, जाणीवपूर्वक सडेतोड मत मांडतोय कारण ती आजची गरज आहे .

ह्या पाक आणि चीनी धार्जिण्या काँग्रेसींमुळे आधीच बराचसा भाग आपण गमावून बसलोय, परंतु आता एक इंचभर जमीनीवरसुध्दा पाणी सोडायला आम्ही तयार नाही आहोत हे ठणकावून सांगीतलं पाहिजे.

खरंतर, एखाद्यानं असहिष्णुता वगैरेला घेऊन काही मत व्यक्त केलं आणि त्यांना कोणी ट्रोल करत पाकिस्तानात निघून जा असं भाष्य केलं तर पूर्वी मला राग येत असे, कारण प्रत्येकाचं आपलं वयक्तिक मतं असतं. परंतु या प्रकणात आवर्जून सांगावसं वाटतयं की अशा प्रकारच्या मानसिकतांना आपण देशाबाहेर हद्दपार केलं पाहिजे मग ते पाकिस्तानात जाऊन राहू द्या नाहीतर चीनमध्ये .आणि हा सल्ला देण्याचा माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भागतर आहेच शिवाय मी हे माझं कर्तव्य समजतो.

आता आपण या विकृत मानसिकतेला जरा समजून घेऊयात.

काँग्रेसी नेत्यांनी अगदी नेहरूंपासून आत्तापर्यंत सर्वांनी काश्मीर मुद्दा सतत धुमसत ठेवला. साठ वर्षांच्या काळात जर राजकीय इच्छाशक्ती असती तर शंभरवेळा काश्मीर प्रश्न निकाली काढता आला असता. परंतु काश्मीरच्या काँग्रेसी नेत्यांच्या आणि पर्यायानं तिथल्या मतांच्या लांगूलचालनापायी काँग्रेसनं कधी हे पाऊल उचललंच नाही. यासीन मलिकसारखा हरामखोर विद्रोही, सेपरेटिस्ट काँग्रेसच्या काळात भारत सरकारची सुरक्षा वापरून फुटीरतावादी भाषणं करायचा.

 

yasin-malik-inmarathi
indianexpress.com

सरकार बदलंल आणि याची सारी सुरक्षा काढून घेण्यात आली.जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या नावानं हा संपूर्ण खोऱ्यात भारताविरूध्द बोंबलत फिरायचा, हुर्रियत आणि जमात उद दावा सारख्या संघटनांना सक्रीय करण्यामागं काँग्रेसचाच हात होता हे काही वेगळं सांगायला नको.

महबूबा मुफ्ती सरकारला भाजपनं सोडचिठ्ठी दिल्यानंतर नेमकं हे पुस्तक चर्चेला आलंय हे विशेष. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता काश्मीर खोऱ्यात राज्यपाल राजवट लागू झाली आणि सर्व सुत्र पर्यायानं केंद्र सरकारच्या हातात आली. आता या फुटीरतावादी काँग्रेसींना असुरक्षितता भासू लागली आणि त्याचं पर्यावसन झालं या वादाच्या मुद्द्यामध्ये.

वेगळ्या स्वतंत्र काश्मीरची स्वप्न दाखवून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा आणि त्यातून काही सुरक्षा मिळते का पाहण्याचा हा केविलवाणा प्रयत्न म्हणावा लागेल.

केवळ आणि केवळ असुरक्षिततेपोटी आणि पाकिस्तानी पुळचट स्तुतीसाठी अशी विधानं किंवा लेखन हे फुटीरतावादी नेहमी करत असतात.त्यामुळं असा लोकांकडून आणखी काय अपेक्षा ठेवावी? परंतु केंद्र सरकारने राज्यपाल राजवट लागू केल्यापासून जी काही वेगवान कारवाई सुरू केलीय त्यात सोज सारखे असंख्य फुटीरतावादी काँग्रेसी दळून निघणार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं त्यामुळे आता अशा लोकांना पळवायची गरज नाहीये, काळ सांगेलच हे लोक स्वत:च पळून गेले.

या लोकांनी लक्षात ठेवावं की आता ज्या काही वेगवान हालचाली काश्मीरमध्ये सुरू आहेत त्यात तुमची पोळीतर भाजणार नाहीच पण जी काही कुरणं तुम्हाला काँग्रेसींनी गेल्या साठ वर्षांत चरण्यासाठी रिकामी सोडली होती, ती आता सीलबंद नक्की होणार.

 

crpf-in-kashmir-inmarathi
jagran.com

हा असेतुहिमाचल पूर्ण भारत एक होता एक आहे आणि एक राहिल यात काही शंका नाही. या अखंड भारतासाठी अनेक क्रांतीविरांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी आपल रक्त भारतमातेच्या चरणी वाहिलं आणि हजारो विरांच्या बलिदानानंतरही या देशाचे दोन तुकडे झालेच, नव्हे केले गेले. इतक्यावरच समाधानी न राहाता हे लोक आता या उर्वरित देशाचे देखील तुकडे करण्याठी कमी करणार नाहीत हे आपण सर्वसामान्य जनतेनं समजून घेतलं पाहिजे.

ज्यांच्या खांद्यावर डोळे झाकून मागच्या साठ वर्षांपासून देश सांभाळण्याची जबाबदारी दिली. त्यांनी मुळात कधीच आपलं कर्तव्य पार पाडलं नाही उलट इथल्या जनतेचा विश्वासघात केला.

परंतु काळ बदललाय, आज कोणीही सत्तेत असला तरी सामान्य जनता त्यावर करडी नजर ठेवून आहे. एका साध्या विधानावर इतका ऊहापोह कसा काय होऊ शकतो असं आपल्याला वाटेल परंतु अशा गोष्टीच नजरेआड केल्यामुळे हे दिवस आपण पाहतोय. आता मात्र डोळ्यात तेल घालून आपल्या सिमांचं रक्षण करण्याची गरज निर्माण झालीय आणि त्यामुळे कुणी काश्मीरला घेऊन वादग्रस्त ब्र जरी काढला तरी त्याची तासण्यात येईल हे लक्षात ठेवा.

जरी काश्मीर आज धुमसत असला तरी त्याला लवकरच आम्ही त्याला या भारतभूवरील स्वर्ग करू, ही माझ्यासारख्या सर्वसामान्याची भावना आज देशातल्या प्रत्येक नागरिकाची होईल हे ही तितकंच सत्य.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?