'स्त्रीयांनी लावलेल्या या शोधांमुळे आपलं आयुष्य सुखकर झालं आहे

स्त्रीयांनी लावलेल्या या शोधांमुळे आपलं आयुष्य सुखकर झालं आहे

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आज आपण दैनंदिन जीवनात अनेक अश्या गोष्टी वापरतो ज्यामुळे आपले जीवन अधिक सोयीस्कर झाले आहे. ह्यातील काही गोष्टी तर अश्या आहेत ज्या कदाचित नसत्या तर आपले जीवनात नेक समस्या उद्भवू शकल्या असत्या. ह्या वस्तूंचा शोध हा स्त्रियांनी लावला आहे. ह्या स्त्रियांनी लावलेल्या शोधामुळेच आज आपण एवढे आरामदायक जीवन जगू शकत आहोत.

१. कॉलर आईडी : डॉक्टर शर्ली एन. जैक्सन

 

women inventors-inmarathi09
u4uvoice.com

आपल्या फोनमधील कॉलर आयडी आणि कॉल वेटिंगच्या सुविधेचा शोध हा डॉक्टर शर्ली एन. जैक्सन ह्यांनी लावला होता. शर्ली ह्या सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होत्या आणि पीएचडी मिळविलेल्या त्या पहिल्या आफ्रिकन महिला होत्या. ७० च्या दशकात त्यांनी हा शोध लावला. त्यांच्या शोधाच्या आधारे पोर्टेबल फॅक्स, फायबर ऑप्टिक केबल आणि सोलर सेल सारख्या गोष्टींचा शोध लागला.

२. मोनोपोली : एलिजाबेथ मेगी

 

women inventors-inmarathi08
sapari.ge

हा एक खेळाचा प्रकार आहे, ह्याचा शोध एलिजाबेथ मेगी ह्यांनी १९०३ साली लावला होता. ह्याला दि लॅण्डलॉर्ड्स गेम म्हणून देखील ओळखल्या जाते. त्यांनी हा खेळ जमीन हस्तगत करण्याच्या समस्येला लक्षात घेत तयार केला होता.

३. द फायर इस्केप : एना कोल्लेनी

 

women inventors-inmarathi07
guardian.ng

ह्याचा शोध एना कोल्लेनीनावाच्या महिलेने १८९७ साली लावला होता. १९०० च्या सुरवातीला एना ह्यांच्या मॉडेलचा उपयोग अमेरिकेत अनेक ठिकाणी आगीसंबंधी सुरक्षेला लक्षात घेऊन करण्यात आला होता.

४. विंडशील्ड वाइपर : मॅरी एंडरसन

 

women inventors-inmarathi06
goodreads.com

आपण रोज कार चालवतो, पण आपल्या कार मधील विंडशील्ड वाइपरची उत्पत्ती कशी झाली असेल, त्याचा शोध कोणी लावला असेल? कदाचित ह्याचा विचारही आपण कधी करत नाही. पण ह्या विंडशील्ड वाइपरचा शोध देखील एका स्त्रीनेच लावला आहे. मॅरी एंडरसन नावाच्या महिलेने १९०५ साली ह्या विंडशील्ड वाइपरचा शोध लावला.

त्यांना हे कळाले की, ड्रायव्हरला गाडी चालविताना समोरील काच साफ करण्यासाठी परत परत गाडी थांबवून गाडीतून उतरावे लागत आहे, तेव्हा त्यांना विंडशील्ड वाइपर बनविण्याचा विचार आला, आणि अश्याप्रकारे ह्या विंडशील्ड वाइपरचा शोध लागला.

५. डिशवॉशर : जोसफिन कोचरेन

 

women inventors-inmarathi05
kidsdiscover.com

ह्याचा फायदा महिलांनाच जास्तकरून झाला आहे. जोसफिन कोचरेन नावाच्या महिलेने १८८७ साली डिशवॉशरचा शोध लावला. लग्नात खूप मोठ्या प्रमाणात भांडी निघतात आणि त्यांना स्वच्छ करण्यासाठी खूप मेहेनत करावी लागते. हे बघून त्यांना डिशवॉशर बनविण्याचा विचार आला.

६. द लाइफ राफ्ट : मारिया बेअसेली

 

women inventors-inmarathi03
engrave.in

मारिया बेअसेली नावाच्या महिलेने द लाइफ राफ्टचा शोध लावला. त्यांच्या डोक्यात एक विचार आला की, एक वस्तू असावी ज्यामुळे पाण्यात बुडालो तरी मरण्याचा धोका कमी असेल. आणि १८८२ साली त्यांनी ह्या लाइफ राफ्टचा शोध लावला. ह्यामुळे खोल पाण्यात बुडण्याचा धोका कमी होतो.

७. रेसिडेंशियल सोलर हीटिंग : डॉक्टर मारिया टॅक्स

 

women inventors-inmarathi02
premiumenergia.es

डॉक्टर मारिया टॅक्स ह्यांनी एमायटी विद्यापीठातून एका सोलर एनर्जी रिसर्च प्रोजेक्टमध्ये भाग घेतला होता आणि त्यावेळी त्यांनी सोलर हिटिंगचा शोध लावला. ह्या दरम्यान त्यांनी १९४७ साली एलेनोर रेमंड ह्यांच्या सोबत काम केले.

८. कर्लिंग आयरन : थेओरा स्टेफेंस

 

women inventors-inmarathi04
bustle.com

थेओरा स्टेफेंस ही एक आफ्रिकन हेअर ड्रेसर होती, तिने १९८० साली ह्या कर्लिंग आयरनचा शोध लावला. ह्याच्या आधारे आज आपण अगदी सहजपणे आपल्या केसांना हसे तसे वळवू शकतो, कर्ल करू शकतो.

९. वायरलेस कम्युनिकेशन : हॅडी लामार

 

women inventors-inmarathi01
newyorker.com

हॅडी लामार नावाच्या महिलेने वायरलेस कम्युनिकेशनचा शोध लावला होता. ह्या शोधणे जगात क्रांती घडवून आणली. हॅडी लामार ह्या ऑस्ट्रेलियन अभिनेत्री होत्या आणि अमेरिकेत राहत असताना त्यांनी ह्या वायरलेस कम्युनिकेशनचा शोध लावला. हा खरंच एक महत्वाचा शोध ठरला. आज अनेक सिस्टिम्स ह्यावर अवलंबून आहेत. स्पेक्ट्रमशी निगडीत सर्व यंत्रणा ह्यावर अवलंबून आहे. जीपीएस, ब्लू टूथ, सीडीएमए यंत्रणा ही देखील ह्या वायरलेस कम्युनिकेशनवर अवलंबून आहे.

१०. कम्प्युटर अल्गोरिदम : एडा किंग नोएल

 

women inventors-inmarathi
intel.com.au

एडा किंग नोएल ह्या एक अतिशय बुद्धिमान गणितज्ञ होत्या. त्यांनी मॅथेमॅटिकल अल्गोरिदमचा वापर करून मशीनला प्रोग्राम करण्याचा मार्ग शोधून काढला. म्हणजेच त्यांनी पहिला कम्प्युटर प्रोग्राम तयार केला.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?