' तरुण-तरुणींना लाजवेल अशी तब्येत वाढत्या वयात हवीये? आहारातून घ्या हे पदार्थ! – InMarathi

तरुण-तरुणींना लाजवेल अशी तब्येत वाढत्या वयात हवीये? आहारातून घ्या हे पदार्थ!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वाढत्या वयासोबत आजारही वाढत जातात, कारण उतरत्या वयासोबत तुमचे शरीरही बदलत जाते, ते कमकुवत होत जाते. त्यामुळे ह्या वयात शरीराची जास्त काळजी घ्यावी लागते.

 

hrithik roshan inmarathi

तिशीनंतर हाडे ठिसूळ होणे, केस गळती होणे अशा सामान्य समस्या होतात. पण त्यासोबतच ब्लड प्रेशर, हृदय रोग, मधुमेह ह्यासारखे आजार देखील होऊ शकतात. हे सर्व आपल्या चुकीच्या जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे होते.

 

Nandana-Sen at 50 InMarathi

 

जर तुम्ही देखील वयाची पस्तिशी-चाळीशीओलांडली असेल तर अश्या चुका करू नका. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी खालील काही पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करून घ्या…

 

प्रोटीनयुक्त आहार :

 

good food-inmarathi

शरीरात प्रोटीन्सची खूप गरज असते. प्रोटीन्स आपल्या शरीरातील कमकुवत स्नायुंना मजबूत करण्याचे काम करतो. त्यामुळे आपल्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थ असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे स्नायू बळकट होतात आणि ज्या स्नायूंना इजा पोहोचली असेल असे स्नायू रीडेव्हलप होतात.

धान्य-कडधान्ये :

 

good food-inmarathi01

वयाची ४० शी ओलांडल्यावर शरीरात अनेक प्रकरच्या कमतरता जाणवू लागतात. शरीरातील ह्या कमतरतेला भरून काढण्यासाठी तुमच्या आहारात मोठ्याप्रमाणात धान्य असणे आवश्यक आहे.

===

हे ही वाचा सुंदर दिसायचंय? या अत्यंत सहज करता येण्यासारख्या १० ब्युटी टिप्स ट्राय कराच!

===

धान्य हे शरीरासाठी अत्यंत पोषक असते. जसे की ओट्स, जव, चणे, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी धान्य-कडधान्याचा आपल्या आहारात समावेश करा. ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्लुटेन असते ज्यामुळे मधुमेह सारखे आजार होण्याची शक्यता कमी असते.

बदाम खा :

 

good-food-inmarathi02.jpg

बदामात फायबर, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात. ह्याव्यतिरिक्त मधुमेहाच्या रोगींसाठी देखील बदाम खूप फायद्याची ठरू शकते. वयाच्या ४० वर्षानंतर हाड कमकुवत व्हायला लागतात. बदामाने तुमची हाडे आणि स्नायू मजबूत होतील.

 

Shilpa-Shetty Inmarathi

 

बदामात अनेक प्रकारच्या आजारांपासून रक्षण करण्याचे गुणधर्म असतात, तसेच ह्यामुळे केस गळती देखील थांबते.

मसुरची डाळ :

good food-inmarathi03

मसुरची डाळ ही प्रोटीनयुक्त असते. तसेच ती पचण्यास देखील हलकी असते. वयाच्या ४० व्या वर्षानंतर पचनक्रिया मंदावते, कमकुवत होते. त्यामुळे अश्याप्रकारच्या डाळी खाव्या, जेणेकरून त्याचा तुमच्या शरीराला फायदा होईल आणि त्या पचण्यासही जड जाणार नाही.

दही :

 

curd-InMarathi

निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीरात गुड बॅक्टेरिया असणे आवश्यक असते. त्यामुळे आपल्या आहारात अश्या पदार्थांचा समावेश करायला हवा ज्यांच्यात हे गुड बॅक्टेरिया असतील. दह्यात हे गुड बॅक्टेरिया भरपूर प्रमाणात असतात, ह्याचे सेवन केल्याने शरीरातील कमतरता दूर होतात.

म्हणून रोज आपल्या आहारात एक वाटी दह्याचा समावेश करा. जर साखर किंवा मिठाशिवाय दह्याचे सेवन केले तर त्याच्या तुम्हाला अधिक फायदा मिळेल.

कच्च्या भाज्या आणि कच्च्या फळांचा आहारात समावेश :

 

vegetables-marathipizza

 

वाढत्या वयातही तुम्हाला जर निरोगी राहायचे असेल तर तुमचा आहार चांगला असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही कच्च्या भाज्या आणि कच्च्या फळांचा आहारात समावेश करायला हवा.

ह्यामुळे तुमचे अन्न पचण्यास मदत होईल. तसेच कच्च्या भाज्या आणि फळांमध्ये अनेक पोषकतत्व असतात ज्यामुळे तुमच्या शरीराला पोषकता मिळत असते. त्यामुळे तुमच्या आहारात कच्च्या भाज्या आणि कच्च्या फळांचे असणे आवश्यक आहे.

===

हे ही वाचा हे पदार्थ ‘रिकाम्या पोटी’ खाताय? त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात!

===

जर तुम्हालाही अनिल-माधुरी सारखं वाढत्या वयातही तरुण दिसायचं आणि राहायचं असेल तर ह्या काही टिप्स नक्की वापरा आणि नियमित व्यायाम करा…

 

Madhuri-Dixit-5 inmarathi

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?