हॉटेल ग्राहकांना दिलेली “जबरदस्त ऑफर” आली अंगलट, सगळ्यांसाठी मोठी शिकवण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

अति हुशारी किंवा अति उत्साह हा कसा अंगावर बेतू शकतो ह्याचा प्रत्यय नुकताच चीनच्या एका रेस्टॉरंट मालकाला आला आहे. म्हणजे ऑफर देणे वगैरे हे तर रेस्टॉरंटमध्ये चालूच असते, तशी ती मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते.

पण चीनच्या एका रेस्टॉरंट मालकाने अशी ऑफर दिली की अखेर त्याला त्याचं रेस्टॉरंट बंद करून घरी बसावे लागले.

ह्या रेस्टॉरंटची आणि त्याच्या ऑफरची सर्वत्र चर्चा सुरु होती.

 

chinese restarant-inmarathi
scmp.com

चीन येथील ‘JIAMENER’ हे रेस्टॉरंट नुकतच दोन आठवड्यांआधी सुरु झालं आणि नाईलाजाने ते बंदही करावं लागलं. आणि ह्याचं कारण म्हणजे येथील फूड ऑफर. ह्या रेस्टॉरंटच्या मालकाने रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर काढली.

केवळ १३०० रुपयांत महिनाभर अनलिमिटेड जेवणाची ऑफर दिली.

 

chinese restaurant-inmarathi01
grubstreet.com

जेव्हा तिथल्या लोकांना ह्या रेस्टॉरंटमधल्या ऑफर बद्दल कळालं तेव्हा अनेक ग्राहकांच्या भुवया उंचावल्या.

सगळेच एवढे उत्साहित झाले की त्या रेस्टॉरंटसमोर ग्राहकांच्या लांबचलांब रांगा लागल्या. म्हणजे जेवढे दिवस हे रेस्टॉरंट खुले होते तेवढे दिवस येथे लोकांनी गर्दी केली.

१४ दिवसांपर्यंत ह्या रेस्टॉरंटमध्ये लोकांनी १३०० रुपयांत अनलिमिटेड जेवणाचा आस्वाद घेतला.

 

chinese restaurant-inmarathi03
nationalgeographic.com

ह्या दरम्यान ह्या रेस्टॉरंटमध्ये दर दिवसाला ५०० हून जास्त लोक पोटभर जेवून गेले. त्यासाठी रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांना २० तास काम करावे लागले. १०-१० तासाच्या शिफ्टमध्ये त्यांना काम करावे लागले.

एवढं करूनही ह्या रेस्टॉरंटला अमाप नुकसान झाले.

ह्या ऑफर दरम्यान लोकांना जी कार्ड देण्यात आली होती, ती त्या लोकांनी आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांना देखील दिली!

म्हणजे एकाच कार्डावर अनेकांनी अनलिमिटेड जेवणाचा फायदा घेतला. आणि त्याचा अतिशय वाईट असा परिणाम ह्या रेस्टॉरंटच्या व्यवसायावर झाला.

 

chinese restaurant-inmarathi02
northchina.co.uk

पण ही ऑफर देणाऱ्या रेस्टॉरंटच्या मालकाला कदाचित हे माहितच नव्हते की त्याने किती मोठी समस्या स्वतःवर ओढवून घेतली आहे.

त्याने भलेही मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून ही ऑफर दिली असली तरी ती आता त्याच्यावरच उलटली. त्याची ही आयडिया अत्यंत चुकीची ठरली असून त्याचा खूपच वाईट परिणाम ह्या रेस्टॉरंटवर झाला.

कमाई व्हावी व्यवसाय वाढवा म्हणून जरी ही ऑफर देण्यात आली असली तरी त्याचा अगदीच उलट परिणाम बघायला मिळाला. आणि अखेर हे रेस्टॉरंट बंद करावं लागलं.

 

chinese restaurant-inmarathi
inc.com

दोन आठवडे ह्या रेस्टॉरंटच्या समोर असलेली रांग बघून, काही इतर रेस्टॉरंटने देखील अशी ऑफर ठेवण्याचा विचार केला होता.

पण जेव्हा त्यांना ही सर्व हकीगत कळाली की, कश्याप्रकारे ही आयडिया फ्लॉप झाली आहे, तेव्ह त्यांनी असा प्रयत्न करण्याचा विचार सोडून दिला.

व्यवसाय वाढविण्यासाठी अनेकजण अश्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी काढत असतात. पण एकदा ह्याचा परिणाम काय काय होऊ शकतो, ह्यावर ग्राहक कश्याप्रकारे प्रतिसाद देतील – हे देखील एकदा तपासून घ्यायला हवे.

अनेक कंपनी ह्यासाठी आधी छोट्या प्रमाणावर टेस्ट करतात – आपली आयडिया जोखून बघतात.

आपल्या चायनीज रेस्टोरंट मालकाला ही गोष्ट फार उशिरा, खूप मोठं नुकसान सहन केल्यावर उमगली. आपलंही नुकसान होण्याआधीच हा धडा आपण सर्वांनी घ्यायला हवा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “हॉटेल ग्राहकांना दिलेली “जबरदस्त ऑफर” आली अंगलट, सगळ्यांसाठी मोठी शिकवण!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?